
चालू घडामोडी | पंतप्रधान मोदींना 'अॅग्रिकोला पदक 2026' प्रदान | FAO कडून सन्मान - संपूर्ण माहिती
PM Narendra Modi honoured with the 'Agricola Medal'
📚 Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अन्न आणि कृषी संघटनेद्वारे (FAO) नुकताच प्रदान करण्यात आलेला 'अॅग्रिकोला पदक 2026' (Agricola Medal 2026) हा सर्वोच्च बहुमान मिळवणारे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे नेते ठरले आहेत ?
- पहिले
- दुसरे
- तिसरे
- चौथे
उत्तर : दुसरे
📰 बातमी काय ?
• भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अन्न आणि कृषी संघटनेने (FAO - Food and Agriculture Organization) अत्यंत प्रतिष्ठित अशा 'अॅग्रिकोला पदक 2026' (Agricola Medal 2026) या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित केले आहे.
• ठिकाण - हा पुरस्कार इटलीची राजधानी रोम (Rome, Italy) येथील अन्न आणि कृषी संघटने च्या (Food and Agriculture Organization) मुख्यालयात प्रदान करण्यात आला.

'अॅग्रिकोला पदक' म्हणजे काय ? (Agricola Medal) :
✍️ शब्दाचा अर्थ - 'अॅग्रिकोला' (Agricola) हा एक लॅटिन शब्द असून याचा मराठीत अर्थ 'शेतकरी' (Farmer) असा होतो.
🏅सर्वोच्च सन्मान - हे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे (FAO) दिले जाणारे सर्वोच्च संस्थात्मक पदक आहे.
⛳️ स्थापना - या पदकाची स्थापना अन्न आणि कृषी संघटनेद्वारे (FAO) 1977 मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय नाणेशास्त्र पुरस्कार कार्यक्रमाचा (International Numismatic Award Program) एक भाग म्हणून राजकीय नेत्यांचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली होती.

🧐 'अॅग्रिकोला पदक' कोणाला देण्यात येते ?
• हे पदक थेट संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटने च्या महासंचालकांद्वारे (Director-General) अशा जागतिक नेत्यांना दिले जाते ज्यांनी आपल्या देशात किंवा जागतिक स्तरावर अन्न प्रणालीमध्ये (Agrifood Systems) क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी दूरदर्शी नेतृत्व आणि ठोस धोरणांची अंमलबजावणी केली आहे.
🇮🇳 'अॅग्रिकोला पदक' मिळवणारे भारतीय नेते :
आतापर्यंत फक्त दोनच भारतीय नेत्यांना अधिकृतपणे हे पदक मिळाले आहे.
1) पहिले नेते - डॉ. मनमोहन सिंग - वर्ष 2008 मध्ये, ग्रामीण कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणातील सुधारणांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2) दुसरे नेते - 'अॅग्रिकोला पदक' हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे नेते आहेत.
श्री. नरेंद्र मोदी यांना वर्ष 2026 मध्ये, गेल्या दशकातील कृषी आणि अन्न क्षेत्रातील संरचनात्मक यशासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट (Aim):
• संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शाश्वत विकास ध्येय 2 (SDG 2 - Zero Hunger / भुकेचे समूळ उच्चाटन) ची पूर्तता करण्यासाठी असाधारण जागतिक कामगिरीची दखल घेणे आणि तिला प्रोत्साहन देणे हे या पदकाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
• गरिबी निर्मूलन करणे, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, अन्न सुरक्षेचे जाळे मजबूत करणे आणि विज्ञानावर आधारित पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यांना याद्वारे गौरवले जाते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Agricola Medal 2026
• पुरस्काराचे नाव → ॲग्रिकोला पदक (2026)
• देणारी संस्था → अन्न आणि कृषी संघटना (संयुक्त राष्ट्रे)
• 'ॲग्रिकोला' शब्दाचा मूळ अर्थ → लॅटिन भाषेत 'शेतकरी'
• एकूण भारतीय मानकरी → 2
• पहिले भारतीय - डॉ. मनमोहन सिंग (2008)
• दुसरे भारतीय - श्री. नरेंद्र मोदी (2026)
• संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG) → SDG 2 - शून्य भूकमारी (Zero Hunger )



















