
चालू घडामोडी | 'जननी' प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
Union Health Ministry Launches JANANI Platform
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या 'JANANI' या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?
1. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पुरवणे
2. माता, गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या संपूर्ण आरोग्य प्रवासाची डिजिटल देखरेख सुनिश्चित करणे
3. संस्थात्मक प्रसूती वाढवण्यासाठी गरीब महिलांना थेट रोख आर्थिक लाभ देणे
4. लहान मुलांना आणि गरोदर महिलांना घातक आजारांपासून वाचवण्यासाठी डिजिटल लसीकरण नियंत्रण करणे
उत्तर : माता, गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या संपूर्ण आरोग्य प्रवासाची डिजिटल देखरेख सुनिश्चित करणे
📰 बातमी काय ?
• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माता आणि बाल आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्यावर डिजिटल देखरेख ठेवण्यासाठी 'जननी' (JANANI - Journey of Antenatal, Natal and Neonatal Integrated Care) नावाचा एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.

🧐 'जननी' (JANANI) प्लॅटफॉर्म काय आहे ?
• JANANI फूल फॅार्म - Journey of Antenatal, Natal and Neonatal Integrated Care
'जननी' हे एक सेवा-केंद्रित डिजिटल व्यासपीठ असून, ते महिलांच्या प्रजननक्षम वयादरम्यान (Reproductive Age) त्यांच्या डिजिटल आरोग्य विषयक नोंदींचे सर्वसमावेशक निरीक्षण आणि जतन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
✍️ अपग्रेडेड आवृत्ती - हा प्लॅटफॉर्म आधीपासून कार्यरत असलेल्या Reproductive and Child Health (RCH) पोर्टलची अत्याधुनिक आणि सुधारित आवृत्ती आहे.
🔗 आरोग्य साखळी नियंत्रण - यामध्ये गरोदरपणातील काळजी (Antenatal Care), प्रसूती (Delivery), प्रसूतीनंतरची काळजी (Postnatal Care), नवजात बालकाची काळजी आणि कुटुंब नियोजन या सर्व टप्प्यांचे अखंड निरीक्षण आणि वेळेवर उपचार सुनिश्चित केले जातात.
🎯 प्रमुख वैशिष्ट्ये आणि तांत्रिक जोडणी
• माता आणि बाल आरोग्य कार्ड आणि अलर्ट्स - या प्लॅटफॉर्मद्वारे क्यूआर-कोड युक्त (QR-enabled) डिजिटल माता आणि बाल आरोग्य कार्डे दिली जातात.
• तसेच हाय-रिस्क (उच्च जोखीम) गरोदरपणाच्या बाबतीत सिस्टीमद्वारे ऑटोमेटेड अलर्ट्स पाठवले जातात.
➜ ✍️ नोंदणी आणि ओळख : लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ABHA (Ayushman Bharat Health Account), आधार (OTP आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे) तसेच मोबाईल नंबर यांसारख्या युनिक आयडेंटिफायर्सचा वापर केला जातो, ज्यामुळे संपूर्ण भारतात लाभार्थ्यांचा माग काढणे सोपे होते.
➜ 🔗 इतर योजनांशी जोडणी : हा प्लॅटफॉर्म 'U-WIN' (लसीकरण प्लॅटफॉर्म) आणि 'POSHAN' (पोषण अभियान) यांच्याशी जोडला गेला आहे. स्थलांतरित लोकांना देखील याचा सहज लाभ घेता यावा म्हणून वेब आणि मोबाईलद्वारे 'स्वयं-नोंदणी' (Self-registration) सुविधा दिली आहे.
➜ ⛳️ सध्याची कामगिरी : या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 1.34 कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून, यात 30 लाखांहून अधिक गरोदर महिलांचा समावेश आहे. तसेच 30 लाख डिजिटल MCH कार्डे जनरेट करण्यात आली आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• JANANI चे पूर्ण नाव → Journey of Antenatal, Natal and Neonatal Integrated Care.
• मंत्रालय → केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW).
• मुख्य उद्दिष्ट → डिजिटल आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून माता आणि बाल मृत्यूदर कमी करणे व आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारणे.






















