
चालू घडामोडी | IITM 'इनक्युबेशन सेंटर उद्घाटन' आणि WISE-2026 आयोजन
IITM 'Incubation Center Inauguration' and WISE-2026 organization
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2026 मध्ये हवामान तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी 'WISE-2026' राष्ट्रीय परिषद आणि पहिल्या इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आले ?
- पुणे
- मुंबई
- नागपूर
- नाशिक
उत्तर : पुणे
📰 बातमी काय ?
• 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी' (IITM), पुणे येथे हवामान, हवामान बदल आणि वातावरणीय तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी एका विशेष 'इनक्युबेशन सेंटर' चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
👨💼 प्रमुख पाहुणे - या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन डॉ. एम. रविचंद्रन (सचिव, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय) यांच्या हस्ते करण्यात आले

⛳️ WISE-2026 परिषद -
• या उद्घाटनाचे औचित्य साधून IITM ने “Weather and Climate Innovation Meet for Startups and Entrepreneurs” (WISE-2026) या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुणे येथे केले होते.
NEAT' उपक्रम आणि 'मिशन मौसम' (Strategic Framework):
1) NEAT उपक्रम - हे नवीन इनक्युबेशन सेंटर 'नॅशनल एंटरप्राइज फॉर अॅटमॉस्फेरिक टेक्नॉलॉजी' (National Enterprise for Atmospheric Technology - NEAT) या उपक्रमाचा एक भाग आहे.
2) मिशन मौसम (Mission Mausam)- NEAT उपक्रम हा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 'मिशन मौसम' या महत्त्वाकांक्षी फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आला आहे.
3) मिशन मौसमचे उद्दिष्ट - प्रगत हवामान अंदाज, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मॉडेलिंग आणि अचूक हवामान सेवांच्या माध्यमातून भारताला "हवामान-सज्ज आणि हवामान-स्मार्ट राष्ट्र" (Weather-ready and Climate-smart Nation) बनवणे हे या मिशनचे मुख्य ध्येय आहे.
🤔 इनक्युबेशन सेंटर कोणत्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण शोधांना मदत करेल ?
• हे इनक्युबेशन सेंटर मुख्यत्वे हायपरलोकल (अति-स्थानिक) हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, कृषी क्षेत्र, अपारंपरिक/अक्षय ऊर्जा, आरोग्य क्षेत्रातील हवामान बदल आणि हवामान लवचिकता तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण शोधांना (Innovations) प्रोत्साहन देईल
🧐 इनक्युबेशन सेंटर चा आर्थिक उद्देश काय ?
• 'क्लायमेट-टेक' (Climate-tech) क्षेत्रातील उद्योजकतेला चालना देणे, सरकारी आणि खाजगी भागीदारी (PPP) मजबूत करणे आणि वैज्ञानिक हवामान माहितीचे रूपांतर समाजासाठी उपयुक्त व्यावहारिक उपायांमध्ये करणे.
'IITM पुणे' बद्दल माहिती :
• IITM फूल फॅार्म - Indian Institute of Tropical Meteorology
• मराठी नाव - भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था
• IITM ही भारताची हवामान आणि वातावरणीय विज्ञानावर संशोधन करणारी सर्वोच्च संस्था आहे.
• 🏛️ मंत्रालय - ही संस्था केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Sciences) अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते.
⛳️ स्थान - पुणे, महाराष्ट्र
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
• हवामान स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर स्थान → IITM, पुणे
• उद्घाटक → डॉ. एम. रविचंद्रन (सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय).
• संबंधित मुख्य मिशन → मिशन मौसम
• मुख्य तंत्रज्ञान भर → AI-Driven मॉडेलिंग आणि हवामान लवचिकता (Climate Resilience).


















