
चालू घडामोडी | भारताचे 3 रे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण ?
Who is the 3rd Chief of Defence Staff of India ?
📚 Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मे 2026 मध्ये भारताचे 3 रे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
- जनरल अनिल चौहान
- जनरल मनोज पांडे
- एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी
- लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी
उत्तर : लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी
📰 बातमी काय ?
• भारत सरकारने लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (Lt Gen NS Raja Subramani) यांची भारताचे 3 रे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.

🧐 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (CDS) पदाबद्दल IMP माहिती :
1) स्वरूप - CDS हे भारतीय सशस्त्र दलातील (भूदल सेना, नौदल आणि हवाई दल) सर्वोच्च मानाचे लष्करी पद आहे.
• हे पद तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि देशाचे राजकीय नेतृत्व यांच्यातील एक मुख्य दुवा म्हणून काम करते.
2) पदाची निर्मिती -
• कारगील युद्धादरम्यान समोर आलेल्या समन्वय त्रुटींवर उपाय म्हणून 'कारगील पुनरावलोकन समिती', 1999 (Kargil Review Committee 1999) आणि 'शेकतकर समिती', 2016 (Shekatkar Committee 2016) यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे डिसेंबर 2019 मध्ये या पदाची निर्मिती करण्यात आली.
3) पहिले CDS -
• भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी जानेवारी 2020 मध्ये देशाचे पहिले CDS म्हणून पदभार स्वीकारला होता.
4) दर्जा आणि मान -
• CDS हे 4-स्टार (Four-Star) लष्करी अधिकारी असतात.
• त्यांचा दर्जा तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या समकक्ष असला, तरी ते सर्व प्रमुखांमध्ये 'प्रथम' (First Among Equals) मानले जातात.
5) वैधानिक स्थान -
• हे पद घटनात्मक (Constitutional) नाही.
• याची निर्मिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे झाली असून, भारताच्या अग्रक्रमता तक्त्यामध्ये (Order of Precedence) या पदाचा 12 वा क्रमांक लागतो.
⏳ पात्रता, कार्यकाळ आणि नियुक्ती प्रक्रिया (Eligibility & Tenure) :
1) नियुक्ती प्राधिकरण -
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांची नियुक्ती पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील 'कॅबिनेटची नियुक्ती समिती' (ACC - Appointments Committee of the Cabinet) करते.
2) पात्रता - तिन्ही दलांमधील कोणताही सेवाभावी किंवा निवृत्त 3-स्टार अधिकारी (लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल, व्हाईस ॲडमिरल) किंवा 4-स्टार अधिकारी (जनरल, एअर चीफ मार्शल, ॲडमिरल) ज्यांचे वय 62 वर्षांपेक्षा कमी आहे, ते या पदासाठी पात्र असतात.
3) कार्यकाळ - या पदासाठी निश्चित वर्षांचा कार्यकाळ ठरलेला नाही, परंतु CDS म्हणून काम करण्याची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे.
⚙️ मुख्य भूमिका आणि जबाबदाऱ्या (Roles & Responsibilities) :
1) प्रशासकीय प्रमुख - CDS हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'लष्करी व्यवहार विभागाचे' (DMA - Department of Military Affairs) प्रमुख असतात आणि या विभागाचे 'सचिव' (Secretary) म्हणून काम पाहतात.
2) दुहेरी सल्लागार भूमिका -
• CDS हे संरक्षण मंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार म्हणून काम करतात.
• तसेच पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील 'न्यूक्लियर कमांड ऑथॉरिटी' चे (Nuclear Command Authority - NCA) लष्करी सल्लागार असतात.
3) COSC चे स्थायी अध्यक्ष - ते 'चीफ ऑफ स्टाफ कमिटी' (COSC) चे स्थायी अध्यक्ष (Permanent Chairman) म्हणून काम पाहतात, ज्यामुळे धोरणात्मक नियोजनात सातत्य राहते.
4) आर्थिक आणि धोरणात्मक नियंत्रण - ते संरक्षण खरेदी परिषदेचे (Defence Acquisition Council - DAC) सदस्य असतात आणि पंचवार्षिक संरक्षण भांडवली खरेदी योजना लागू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
5) एकत्रित समन्वय (Jointness) - लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात ऑपरेशन, लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि प्रशिक्षण यामध्ये 'जॉइंटनेस' (एकत्रित समन्वय) वाढवणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.
👮🏻♂️ भारताचे आत्तापर्यंत चे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) :
पहिले CDS - जनरल बिपीन रावत
दुसरे CDS - जनरल अनिल चौहान
तिसरे CDS - लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी → भारताचे 3रे CDS
• पदाचा दर्जा → तिन्ही दल प्रमुखांमध्ये 'First among equals'.
• नियुक्ती समिती → Appointments Committee of the Cabinet (अध्यक्ष: पंतप्रधान)
• वयोमर्यादा → नियुक्तीवेळी 62 वर्षांपेक्षा कमी वय; निवृत्तीचे कमाल वय 65 वर्षे.
• संबंधित समित्या → कारगील पुनरावलोकन समिती (1999) आणि शेकतकर समिती (2016).
• प्रशासकीय पद → लष्करी व्यवहार विभागाचे (DMA) सचिव.


























