
चालू घडामोडी | भारत-अल्जेरिया संरक्षण सहकार्य
India–Algeria Defence Cooperation
📚 Subject : GS - भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतासोबत झालेल्या पहिल्या ऐतिहासिक संरक्षण सहकार्य बैठकीमुळे चर्चेत आलेला 'अल्जीरिया' हा देश खालीलपैकी कोणत्या खंडातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे ?
- आशिया
- आफ्रिका
- युरोप
- दक्षिण अमेरिका
उत्तर : आफ्रिका
📰 बातमी काय ?
• भारत आणि अल्जीरिया दरम्यान पहिली 'संयुक्त संरक्षण सहकार्य आयोग' (Joint Commission on Defence Cooperation) बैठक नवी दिल्ली येथे पार पडली.
• 2024 मध्ये दोन्ही देशांनी स्वाक्षरी केलेल्या 'संरक्षण सामंजस्य कराराच्या' (Defence MoU) अंमलबजावणीच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.
• नियम पुस्तिका (Rules of Procedure) - भविष्यकाळातील संरक्षण धोरणे आणि आराखडा अधिक सुलभ करण्यासाठी दोन्ही देशांनी अधिकृत 'नियम पुस्तिकेवर' स्वाक्षरी केली आहे.

🧐 बैठकीतील मुख्य चर्चेचे मुद्दे :
➜ या बैठकीत दोन्ही देशांनी खालील 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे:
• लष्करी प्रशिक्षण (Military Training) - दोन्ही देशांच्या सैनिकांना प्रगत प्रशिक्षण देणे.
• संयुक्त सराव (Joint Exercises) - दोन्ही देशांच्या संरक्षण दलांमध्ये ताळमेळ वाढवण्यासाठी युद्धसराव आयोजित करणे.
• संरक्षण उद्योग सहकार्य - दोन्ही देशांमधील संरक्षण निर्मिती आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढवणे.
• वैद्यकीय सहकार्य - लष्करी वैद्यकीय क्षेत्रात (Medical Cooperation) एकमेकांना मदत करणे.
🌍 अल्जेरिया देशाबद्दल भौगोलिक माहिती (Static GK - भूगोल):
• स्थान - अल्जीरिया हा उत्तर आफ्रिकेतील (North Africa) एक महत्त्वाचा देश आहे.
ㅤㅤㅤ• या देशाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र (Mediterranean Sea) आहे.
• सीमा जोडलेले देश - अल्जीरियाच्या सीमा मोरोक्को, ट्युनिशिया, लिबिया, माली, नायजर आणि मॉरिटानिया या देशांशी जोडलेल्या आहेत.
• क्षेत्रफळाचे वैशिष्ट्य - अल्जीरिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका खंडातील सर्वात मोठा देश आहे.
• सहारा वाळवंट - अल्जीरियाचा तब्बल 80 ते 90% भूभाग हा सहारा वाळवंटाने (Sahara Desert) व्यापलेला आहे. यामुळे हा देश जगातील सर्वात मोठ्या वाळवंटी प्रदेशांपैकी एक आहे.
• आर्थिक कणा - या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने हायड्रोकार्बन म्हणजेच खनिज तेल (Oil) आणि नैसर्गिक वायू (Natural Gas) उत्पादनावर आधारित आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : अल्जीरिया
• पहिली संयुक्त संरक्षण बैठक → भारत आणि अल्जीरिया
• अल्जीरियाचे स्थान → उत्तर आफ्रिका (भूमध्य समुद्राला लागून).
• क्षेत्रफळाच्या दृष्टीने → आफ्रिका खंडातील सर्वात मोठा देश
• वाळवंटी क्षेत्र → 80 ते 90% भूभाग सहारा वाळवंटाचा भाग
• अर्थव्यवस्थेचा मुख्य स्त्रोत → हायड्रोकार्बन्स (खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन)

























