
चालू घडामोडी | वीर महाराणा प्रताप
Maharana Pratap
📚 Subject : GS - इतिहास - मध्ययुगीन भारत (मुघल कालखंड)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मेवाडचे थोर राजे महाराणा प्रताप हे खालीलपैकी कोणत्या राजपूत राजघराण्याशी संबंधित होते ?
- चौहान घराणे
- कछवाह घराणे
- सिसोदिया घराणे
- राठोड घराणे
उत्तर : सिसोदिया घराणे
⛳️ जन्म, घराणे आणि प्रारंभिक जीवन (Birth & Early Life)
• जन्म - 9 मे 1540 रोजी राजस्थानमधील कुंभलगढ किल्ला येथे झाला.
• राजघराणे - ते प्रसिद्ध सिसोदिया राजपूत घराण्याचे (Sisodia Rajput Dynasty) वंशज होते.
• माता-पिता - ते मेवाडचे शासक महाराणा उदयसिंग द्वितीय (Udai Singh II) आणि महारानी जयवंता बाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते.
• राज्यारोहण - वडिलांच्या निधनानंतर 1572 मध्ये महाराणा प्रताप मेवाडच्या राजसिंहासनावर आरूढ झाले.

✍️ मुघल सत्तेला प्रतिकार आणि हल्दीघाटीचे युद्ध (The Resistance) :
• अखंड संघर्ष - मुघल सम्राट अकबरचे सार्वभौमत्व किंवा अधीनता स्वीकारण्यास महाराणा प्रताप यांनी स्पष्ट नकार दिला आणि मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
⚔️ हल्दीघाटीचे ऐतिहासिक युद्ध (Battle of Haldighati) :
• हल्दीघाटीचे ऐतिहासिक युद्ध 18 जून 1576 रोजी मेवाडचे महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये झाले.
• मुघल सम्राट अकबरचे सेनापती आंबेरचे राजा मानसिंग यांच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्य लढले.
• हे युद्ध राजस्थानमधील राजसमंद जवळील 'हल्दीघाटी' या अरावली पर्वतरांगांमधील खिंडीत लढले गेले.
• परिणाम - महाराणा प्रताप आणि त्यांच्या सैन्याने मुघलांशी अत्यंत शौर्याने लढा दिला, मात्र या युद्धात मुघल सैन्याचे पारडे जड राहिले आणि महाराणा प्रताप यांना माघार घ्यावी लागली.



🎠 चेतकची स्वामितीभक्ती -
• या युद्धात महाराणा प्रताप यांचा अत्यंत एकनिष्ठ आणि प्रिय अश्व (घोडा) 'चेतक' याने स्वतःचे प्राण धोक्यात घालून महाराणा प्रतापांचे प्राण वाचवले, ज्यामुळे चेतक इतिहासात अजरामर झाला.

🌴 कठीण जीवन आणि स्वाभिमान -
• मुघलांच्या बलाढ्य सैन्यापुढे शरण न जाता त्यांनी आपल्या कुटुंबासह जंगलात आणि पर्वतांमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगणे पसंत केले, परंतु आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही.
⛳️ पुन्हा सत्ता प्रस्थापित केली -
• हल्दीघाटीच्या युद्धानंतरही महाराणा प्रताप यांनी मुघलांसमोर शरणागती पत्करली नाही.
• त्यांनी गनिमी कावा युद्धपद्धतीचा वापर केला आणि 1579 नंतर पश्चिम मेवाडवर पुन्हा आपले नियंत्रण प्रस्थापित केले.
• नवीन राजधानी - 1585 मध्ये महाराणा प्रताप यांनी डुंगरपूरजवळ 'चावंड' (Chavand) येथे मेवाडची नवीन राजधानी स्थापन केली.
📜 निधन -
• 19 जानेवारी 1597 रोजी एका शिकार करत असताना झालेल्या जखमांमुळे या महान योद्धाचे निधन झाले.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : वीर महाराणा प्रताप
• जन्म → 9 मे 1540, कुंभलगढ किल्ला (राजस्थान)
• राजघराणे → सिसोदिया राजपूत घराणे
• मेवाडचे राजे बनले → वर्ष 1572 मध्ये
• हल्दीघाटीचे युद्ध → महाराणा प्रताप विरुद्ध मुघल सेनापती राजा मानसिंग (1576)
• घोड्याचे नाव → चेतक
• निधन → 19 जानेवारी 1597





















