
चालू घडामोडी | जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन

World Red Cross and Red Crescent Day
📚 Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वर्ष 2026 च्या 'जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिनासाठी' (World Red Cross Day) मुख्य संकल्पना (Theme) कोणती ?
- बी ह्युमन (Be Human)
- युनिटी फॉर ऑल (Unity for all)
- लव्ह अँड पीस (Love and Peace)
- किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह (Keeping Humanity Alive)
उत्तर : किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह (Keeping Humanity Alive)
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 8 मे हा दिवस जगभरातील लाखो स्वयंसेवकांच्या मानवतावादी प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी 'जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन' म्हणून साजरा केला जातो.
🧐 'जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन' कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
• 8 मे 1828 रोजी 'इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस' (ICRC) चे संस्थापक हेन्री ड्युनांट यांचा जन्म झाला होता, त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस 8 मे रोजी साजरी करण्यात येतो.
• नोबेल पुरस्कार - हेन्री ड्युनांट हे जगातील पहिले नोबेल शांतता पुरस्कार (First Nobel Peace Prize) विजेते आहेत.
• हेन्री ड्युनांट आणि फ्रेडरिक पासी (Frédéric Passy) यांना दोघांना मिळून 1901 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.

🤔 उगमाचे कारण :
• 1859 मधील 'सोल्फेरिनोच्या युद्धातील' (Battle of Solferino) भीषणता पाहिल्यानंतर, ड्युनांट यांनी युद्धग्रस्त लोकांना मानवतावादी मदत देणाऱ्या संस्थेची सनद मांडली.
• यातूनच 1863 मध्ये 'ICRC' ची स्थापना झाली आणि पुढे प्रसिद्ध 'जिनेव्हा कराराचा' (Geneva Conventions) पाया रचला गेला.

⛳️ चिन्हे/प्रतीके -
• या जागतिक चळवळीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रेड क्रॉस (Red Cross), रेड क्रेसेंट (Red Crescent) आणि रेड क्रिस्टल (Red Crystal) या तीन अधिकृत चिन्हांचा वापर केला जातो.

⛳️ रेड क्रॉस चळवळीची '7 मूलभूत तत्त्वे' (7 Fundamental Principles):
जागतिक स्तरावर काम करताना ही संघटना एकूण 7 महत्त्वाच्या तत्त्वांचे पालन करते.
• मानवता (Humanity)
• निष्पक्षता (Impartiality)
• तटस्थता (Neutrality)
• स्वातंत्र्य (Independence)
• स्वयंसेवा (Voluntary Service)
• एकता (Unity)
• सार्वत्रिकता (Universality)
🌐 रेड क्रॉस चळवळीचा जागतिक प्रभाव (Global Activities)
• ✍️ ही संस्था जगातील सर्वात मोठी मानवतावादी नेटवर्क मानली जाते, ज्याची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
• आपत्ती निवारण मोहिमा (Disaster Relief) आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत.
• निर्वासितांना (Refugees) मदत आणि युद्धक्षेत्रात मानवतावादी साहाय्य पुरवणे.
• रक्तदान मोहिमा (Blood Donation Drives) आणि आरोग्य जागरूकता मोहीम राबवणे.
🇮🇳 इंडियन रेड क्रॉस सोसायटी (Indian Red Cross Society - IRCS) :
• 🏛️ स्थापना - 1920 मध्ये भारतात या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था आपत्ती निवारण आणि आरोग्य सेवेचे काम करते.
• ✍️ प्रशासकीय प्रमुख - भारताचे राष्ट्रपती हे या संस्थेचे पदसिद्ध 'अध्यक्ष' (President) असतात,
• केंद्रीय आरोग्य मंत्री हे या संस्थेचे 'चेअरमन' (Chairman) म्हणून काम पाहतात.
🧐 'जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन' 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• ‘Keeping Humanity Alive’ (मानवता जिवंत ठेवणे).
• ही संकल्पना आपत्कालीन परिस्थिती, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान करतो आणि मानवता, निष्पक्षता व तटस्थतेच्या मूल्यांचा प्रसार करतो.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• 8 मे → जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट दिन.
• सन्मानार्थ → हेन्री ड्युनांट (जन्म : 8 मे 1828)
• हेन्री ड्युनांट → पहिले नोबेल शांतता पुरस्कार विजेते (1901)
• 3 अधिकृत चिन्हे → रेड क्रॉस, रेड क्रिसेंट आणि रेड क्रिस्टल.
• 1920 → इंडियन रेड क्रॉस सोसायटी (IRCS) स्थापना
• IRCS चे पदसिद्ध अध्यक्ष → भारताचे राष्ट्रपती
• थीम 2026 → Keeping Humanity Alive



















