
चालू घडामोडी | महिला संचलित बचत गटांसाठी 'SHG बचत खाते'.
IPPB has launched a dedicated Self Help Group (SHG) Savings Account
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - बॅंकिंग
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी सुरू केलेल्या विशेष डिजिटल बचत खात्याची कमाल मर्यादा किती रुपये ठेवण्यात आली आहे ?
- 2 लाख रुपये
- 5 लाख रुपये
- 7 लाख रुपये
- 10 लाख रुपये
उत्तर : 2 लाख रुपये
📰 बातमी काय ?
• इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने ग्रामीण भागातील महिला संचलित बचत गटांना (Self Help Groups - SHGs) एक विश्वासार्ह आणि परवडणारी बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक समर्पित 'SHG बचत खाते' (SHG Savings Account) सुरू केले आहे.
🧐 'SHG बचत खाते' (SHG Savings Account) काय आहे ?
• इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने ग्रामीण भागातील महिला संचलित बचत गटांसाठी परवडणारी बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक समर्पित 'SHG बचत खाते' (SHG Savings Account) सुरू केले आहे.
• मुख्य उद्देश: ग्रामीण महिलांच्या बचत गटांना देशाच्या औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडणे.
• हा उपक्रम 'राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' (NRLM) आणि 'नाबार्ड' (NABARD) च्या आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
'SHG बचत खात्याची' प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features of the Account):
1) शून्य शिल्लक खाते (Zero Balance) - हे खाते सुरू करण्यासाठी सुरुवातीला कोणत्याही पैशांची (Initial Deposit) गरज नाही, तसेच खात्यात दरमहा किमान शिल्लक रक्कम (Monthly Average Balance - MAB) ठेवण्याची सक्ती नाही.
2) मर्यादा (Balance Limit) - या खात्यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रूपयां पर्यंतची रक्कम ठेवता येऊ शकते.
3) मोफत व्यवहार (Free Transactions)- बचत गटांना खात्यात पैसे भरण्यासाठी (Deposit) किंवा खात्यातून पैसे काढण्यासाठी (Withdrawal) कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
4) व्याज परतावा - बचत खात्याच्या नियमांनुसार दर तिमाहीला (Quarterly) व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाईल.
5) महिन्याला एक फिजिकल स्टेटमेंट मोफत मिळेल.
6) खाते बंद करणे किंवा क्यूआर (QR) कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही छुपे शुल्क नसेल.
7) डिजिटल ऑन-बोर्डिंग - गावातील पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) यांच्या मदतीने बचत गटांचे खाते जागेवरच डिजिटल पद्धतीने उघडून दिले जाईल.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
🏛️ मालकी - ही बँक 100% भारत सरकारच्या मालकीची संस्था आहे.
⛳️ मंत्रालय - हे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या (Ministry of Communications) टपाल विभागांतर्गत (Department of Posts) काम करते.
✍️ स्थापना - या बँकेची अधिकृत सुरुवात 1 सप्टेंबर 2018 रोजी झाली.
👷♀️ नेटवर्क आणि मनुष्यबळ - देशातील सुमारे 1,65,000 पोस्ट ऑफिसचे जाळे याद्वारे वापरले जाते, ज्यापैकी 140,000 कार्यालये ग्रामीण भागात आहेत.
• तसेच 3,00,000 टपाल कर्मचारी (पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक) याद्वारे घरपोच बँकिंग (Doorstep Banking) सेवा देतात.
✍️ भाषा- ही बँक 13 प्रादेशिक भाषांमध्ये बँकिंग सेवा पुरवते.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• SHG बचत खाते → महिला बचत गटांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) सुरू केलेले विशेष खाते.
• खात्याचे वैशिष्ट्य → झिरो बॅलन्स खाते, कोणतेही मासिक किमान शिलकीचे बंधन नाही
• खात्याची मर्यादा → कमाल 2 लाख रुपये
• IPPB ची स्थापना → 1 सप्टेंबर 2018
• मालकी → 100% भारत सरकार
• मंत्रालय → केंद्रीय दळणवळण मंत्रालय (Ministry of Communications)














