
चालू घडामोडी | संवैधानिक विरुद्ध असंवैधानिक संस्था | वैधानिक विरुद्ध अवैधानिक संस्था
(Constitutional vs Non-Constitutional Bodies)
(Statutory vs Non-Statutory Bodies)
📚 Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतातील खालीलपैकी कोणती संस्था संवैधानिक (Constitutional) नाही ?
1. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG)
2. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC)
4. वित्त आयोग (Finance Commission)
उत्तर : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC)
संवैधानिक किंवा असंवैधानिक संस्था यावर MPSC, तलाठी भरती मध्ये याआधी प्रश्न विचारले आहे का?
🏛️ संवैधानिक विरुद्ध असंवैधानिक संस्था
(Constitutional vs Non-Constitutional Bodies)
🧐 संवैधानिक संस्था (Constitutional Bodies) म्हणजे काय ?
1) व्याख्या -
• ज्या संस्थांची स्थापना थेट भारतीय संविधानानुसार झाली आहे आणि ज्यांचा उल्लेख संविधानातील विशिष्ट कलमांमध्ये (Articles) आढळतो, त्यांना संवैधानिक संस्था म्हणतात.
2) वैशिष्ट्य -
• या संस्थांमध्ये किंवा त्यांच्या अधिकारात कोणताही बदल करायचा असल्यास संसदेला संविधान दुरुस्ती (Constitutional Amendment) करावी लागते.
3) उदाहरणे -
• भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India): संविधानाचे कलम 324
• केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC): संविधानाचे कलम 315
• भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG): संविधानाचे कलम 148
• वित्त आयोग (Finance Commission): संविधानाचे कलम 280
🤔 असंवैधानिक संस्था (Non-Constitutional / Extra-Constitutional Bodies) म्हणजे काय ?
1) व्याख्या -
• ज्या संस्थांचा उल्लेख भारताच्या मूळ संविधानात किंवा कोणत्याही घटनात्मक कलमामध्ये नाही, त्यांना असंवैधानिक (किंवा संविधानेत्तर) संस्था म्हणतात.
2) वैशिष्ट्य:
• यांच्या निर्मितीसाठी संविधान दुरुस्तीची गरज नसते.
• या संस्था संसदेच्या कायद्याने किंवा सरकारच्या आदेशाने बनतात.
3) उदाहरणे -
• नीती आयोग (NITI Aayog)
• राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC)
• केंद्रीय माहिती आयोग (CIC)
🏛️ वैधानिक विरुद्ध अवैधानिक संस्था (Statutory vs Non-Statutory / Executive Bodies)
🧐 वैधानिक संस्था (Statutory Bodies) म्हणजे काय ?
1) व्याख्या -
• ज्या संस्थांची स्थापना संसदेमध्ये किंवा राज्य विधीमंडळात विशेष कायदा (Act / Statute) पास करून केली जाते, त्यांना वैधानिक किंवा कायदेशीर संस्था म्हणतात.
2) वैशिष्ट्य -
• या संस्था संविधानात नसतात, पण त्यांना कायद्याचे पूर्ण संरक्षण आणि अधिकार असतात.
• संसदेने कायदा बदलल्यास या संस्था रद्द किंवा बदलता येतात.
3) उदाहरणे -
• राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC): 'मानवाधिकार संरक्षण कायदा, 1993' (Protection of Human Rights Act, 1993) अंतर्गत स्थापना.
• भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI): 'सेबी कायदा, 1992' (SEBI Act, 1992) अंतर्गत स्थापना.
• राष्ट्रीय हरित लवाद (NGT): 'राष्ट्रीय हरित लवाद कायदा, 2010' अंतर्गत स्थापना.
🤔 अवैधानिक / कार्यकारी संस्था (Non-Statutory / Executive Bodies) म्हणजे काय ?
1) व्याख्या -
• ज्या संस्था संसदेच्या कोणत्याही कायद्याविना, केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका आदेशाद्वारे किंवा ठरावाद्वारे (Cabinet/Executive Resolution) तयार केल्या जातात, त्यांना अवैधानिक किंवा 'कार्यकारी संस्था' म्हणतात.
2) वैशिष्ट्य -
• यांच्या मागे ना संविधानाचे कलम असते, ना संसदेचा कायदा.
• सरकार आपल्या एका आदेशाने या संस्था कधीही बरखास्त करू शकते.
3) उदाहरणे -
• नीति आयोग (NITI Aayog):
• नीति आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावाने झाली आहे.
• यासाठी संसदेत कोणताही कायदा केलेला नाही.
✍️ नोट - नीति आयोग ही असंवैधानिक (Non-Constitutional) आणि अवैधानिक संस्था (Non-Statutory) संस्था आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
1) संवैधानिक संस्था (Constitutional Bodies)
• आधार → थेट भारतीय संविधानात उल्लेख
• बदल कसा? → संविधान दुरुस्ती (Constitutional Amendment) आवश्यक
• उदा. → निवडणूक आयोग, वित्त आयोग, नियंत्रक व महालेखापरीक्षक, UPSC
2) असंवैधानिक संस्था (Non-Constitutional Bodies)
• संविधानात उल्लेख नसतो
• उदा. → नीति आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

1) वैधानिक संस्था (Statutory Bodies)
• आधार → संसदेच्या/विधीमंडळाच्या कायद्याने (Act) स्थापना
• बदल कसा? → संबंधित कायद्यात दुरुस्ती करून
• उदा. → राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, SEBI
2) अवैधानिक संस्था (Non-Statutory)
• आधार → केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका आदेशाद्वारे किंवा ठरावाद्वारे
• उदा. → नीति आयोग























