
चालू घडामोडी | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Rashtrasant Tukadoji Maharaj
📚 Subject : GS - इतिहास - महाराष्ट्रातील संत
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'ग्रामगीता' हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या संतांनी लिहिला आहे ?
(सरळसेवा भरती, तलाठी भरती, पोलीस भरती)
- संत गाडगेबाबा
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- संत तुकाराम
- संत एकनाथ
उत्तर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
📰 बातमी काय ?
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती दरवर्षी 30 एप्रिल रोजी साजरी केली जाते.
⛳️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म, मूळ नाव :
• जन्म - 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी एका सामान्य कुटुंबात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला.
• मूळ नाव - तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते.
त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी त्यांचे नाव 'तुकडोजी' ठेवले होते.

🧐 सामाजिक, शैक्षणिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान :
1) गुरुकुंज आश्रम -
• त्यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे 1935 मध्ये 'गुरुकुंज आश्रमा'ची स्थापना केली, जे त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे मुख्य केंद्र बनले.

2) अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ -
• ग्रामीण भागातील अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि ग्रामोद्धारासाठी त्यांनी या मंडळाची स्थापना केली.
3) खंजिरी भजन :
• तुकडोजी महाराज आपल्या हातातील 'खंजिरी' या वाद्याच्या साहाय्याने उत्कृष्ट आणि प्रबोधनपर भजने गात असत. त्यांच्या खंजिरी भजनाचा वापर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनआंदोलन उभारण्यासाठी केला.
4) 1942 चे चले जाव आंदोलन -
• 1942 चे चले जाव आंदोलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
• 1942 च्या आंदोलनात त्यांनी आपल्या भजनांच्या माध्यमातून जनतेत राष्ट्रवादाची ठिणगी पेटवली, ज्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना चंद्रपूर आणि नागपूर येथील तुरुंगात डांबले होते.

5) जपान जागतिक धर्म परिषद (1955) -
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर शांततेचा संदेश दिला.
• 1955 मध्ये जपान येथे झालेल्या 'जागतिक धर्म परिषदेत' त्यांनी हजेरी लावली होती.

📖 ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती पुणे 2017,...)
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला 'ग्रामगीता' हा ग्रंथ महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो.
• "ग्राम हाच विश्वाचा नकाशा" असे मानून त्यांनी ग्रामीण भारताच्या विकासाचे संपूर्ण सूत्र या ग्रंथात मांडले आहे.
🧐 तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत' ही पदवी कोणी दिली ?
• भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांच्या देशसेवेने आणि भजनांनी प्रभावित होऊन त्यांना 'राष्ट्रसंत' ही पदवी बहाल केली होती.
🏛️ विद्यापीठाचे नामकरण -
• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सन्मानार्थ 2005 मध्ये नागपूर विद्यापीठाचे नाव बदलून शासनाने 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ' असे करण्यात आले आहे.
निधन - 11 ऑक्टोबर 1968 रोजी मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात त्यांचे निधन झाले. त्यांचे समाधी स्थळ मोझरी येथेच आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
• मूळ नाव → माणिक बंडोजी इंगळे.
• जन्मस्थान → यावली, जिल्हा अमरावती.
• प्रसिद्ध ग्रंथ → ग्रामगीता
• राष्ट्रसंत पदवी → डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे
• निधन - 11 ऑक्टोबर 1968
• समाधी स्थळ व आश्रम → मोझरी (गुरुकुंज आश्रम), जिल्हा अमरावती.



















