
चालू घडामोडी | महानदी

Mahanadi River
📚 Subject : GS - भूगोल - नदी प्रणाली
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे चर्चेत असलेला महानदी जलविवाद न्यायाधिकरण कोणत्या दोन राज्यांमधील पाणीवाटप वादाशी संबंधित आहे ?
- महाराष्ट्र – कर्नाटक
- तेलंगणा – आंध्र प्रदेश
- बिहार – झारखंड
- ओडिशा – छत्तीसगड
उत्तर : ओडिशा – छत्तीसगड
📰 बातमी काय ?
• अलीकडे महानदी जलविवाद न्यायाधिकरणाने (Mahanadi Water Disputes Tribunal) ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांना परस्पर सामंजस्याने पाणीवाटपाचा तोडगा काढण्याचा अंतिम इशारा दिला आहे.
• दोन्ही राज्यांमध्ये महानदीच्या पाण्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे.
• विशेषतः छत्तीसगडमध्ये धरणे व बॅरेज बांधकामामुळे ओडिशाला पाणी कमी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🌊 महानदी नदीप्रणाली (The Mahanadi River System)
• महानदी (Mahanadi) ही पूर्व-मध्य भारतातील एक महत्त्वाची हंगामी (Seasonal) नदी असून तिला त्या भागाची जीवनवाहिनी मानले जाते.
• ती मुख्यतः छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांतून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात मिळते.
⛰️ महानदीचा उगम (Origin) कुठे होतो ?
1) उगम - महानदीचा उगम छत्तीसगड राज्यातील धमतरी (Dhamtari) जिल्ह्यातील सिहावा (Sihawa) पर्वताच्या रांगांमध्ये, फर्शिया गावाजवळ होतो
हा भाग समुद्रसपाटीपासून सुमारे 442 मीटर उंचीवर आहे.
2) एकूण लांबी - या नदीची एकूण लांबी अंदाजे 851 किमी ते 900 किमी दरम्यान आहे.

🧐 महानदीच्या उपनद्या कोणत्या ?
• डाव्या काठाच्या उपनद्या : शिवनाथ, हसदेव, मांड आणि इब
• उजव्या काठाच्या उपनद्या : जोंक, ओंग आणि तेल
✍️ प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्ये :
1) हिराकुड धरण (Hirakud Dam) -
• ओडिसामधील संबलपूरजवळ स्थित असलेले हे धरण जगातील सर्वात लांब मातीचे धरण (Earthen Dam) आहे.
• हिराकुड धरणाची लांबी एकूण 26 किमी आहे
• हे स्वातंत्र्यानंतरचे भारतातील पहिले मोठे बहुउद्देशीय खोरे प्रकल्प आहे.
2) हिराकुड जलाशय - संपूर्ण क्षमतेने भरल्यावर 784 चौरस किमी क्षेत्रावर पसरलेले हे आशियातील सर्वात मोठे कृत्रिम तलाव (Artificial Lake) आहे.
3) सातकोसिया घळई (Satkosia Gorge) - पूर्व घाटाचा (Eastern Ghats) भाग पोखरून महानदीने तयार केलेली ही 64 किमी लांब अत्यंत अरुंद आणि खोल घळई (Gorge) आहे, जी दाट जंगलांनी वेढलेली आहे.
4) हंगामी विसर्ग (Seasonal Discharge) - पावसाळ्यात या नदीचा पाण्याचा विसर्ग तब्बल 20 लाख क्युसेकपर्यंत पोहोचतो, परंतु उन्हाळ्यात ही नदी केवळ एका अरुंद प्रवाहासारखी दिसते.
5) त्रिभुज प्रदेश (Delta) - ओडिसामध्ये बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी ही नदी ब्राम्हणी नदीसोबत एकत्रितपणे एक विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश (Delta) तयार करते.
💰महानदीचे आर्थिक महत्त्व (Significance) :
🌾 कृषी समृद्धी - महानदीचे खोरे सुपीक जमिनीसाठी आणि समृद्ध शेतीसाठी प्रसिद्ध आहे. हे खोरे सुमारे 80,000 चौरस किमी एवढ्या लागवडीयोग्य क्षेत्राला पाणी पुरवते.
💧 जलसंपत्ती क्षमता - या खोऱ्याची वार्षिक भूपृष्ठ जलक्षमता 66.9 अब्ज घनमीटर (Cubic km) आहे, ज्यापैकी 50 अब्ज घनमीटर पाणी वापरण्यायोग्य आहे.
⚡️ जलविद्युत क्षमता - 60% लोड फॅक्टरवर या खोऱ्याची जलविद्युत निर्मिती क्षमता 627 मेगावॅट (MW) एवढी निश्चित करण्यात आली आहे.
💡 संकल्पना स्पष्टता : आंतरराज्य नदी जलविवाद आणि 'जलविवाद न्यायाधिकरण काय आहे ?
• जेव्हा एकाच नदीचे पाणी दोन किंवा अधिक राज्यांमध्ये वाटपाबाबत वाद निर्माण होतो, तेव्हा केंद्र सरकार आंतरराज्य नदी जलविवाद कायदा, 1956 (Inter-State River Water Disputes Act, 1956) अंतर्गत एका तात्पुरत्या 'जलविवाद न्यायाधिकरणाची' (Tribunal) स्थापना करते.
• या न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम आणि दोन्ही बाजूंना बंधनकारक असतो.
✍️ उदाहरणार्थ -
1) कावेरी नदी वाद → कर्नाटक – तमिळनाडू
2) कृष्णा नदी वाद → महाराष्ट्र – कर्नाटक – तेलंगणा – आंध्र प्रदेश
3) महानदी वाद → ओडिशा – छत्तीसगड
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : महानदी
• महानदी → पूर्व-मध्य भारतातील महत्त्वाची हंगामी नदी
• उगम → सिहावा पर्वतरांग, धमतरी जिल्हा, छत्तीसगड
• संगम → बंगालचा उपसागर
• महत्त्वाचे धरण → हिराकूड धरण (संबलपूर, ओडिशा)
• जलविवाद → ओडिशा – छत्तीसगड
















