
चालू घडामोडी | भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद

India-Africa Forum Summit
📚 Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मे 2026 मध्ये भारतामध्ये 'चौथी भारत–आफ्रिका फोरम शिखर परिषद' आयोजित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, या मंचाची 'पहिली' शिखर परिषद केव्हा आणि कोठे आयोजित करण्यात आली होती ?
- 2008 – नवी दिल्ली (भारत)
- 2011 – अदिस अबाबा (इथिओपिया)
- 2015 – जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)
- 2000 – कैरो (इजिप्त)
उत्तर : 2008 – नवी दिल्ली (भारत)
📰 बातमी काय ?
• भारताने मे 2026 च्या अखेरीस चौथ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेचे (IAFS 2026) यजमानपद स्वीकारण्याची तयारी केली आहे. 2015 नंतर म्हणजेच एका दशकाहून अधिक काळानंतर या परिषदेचे आयोजन केले जात आहे.
🌍 भारत–आफ्रिका फोरम शिखर परिषद म्हणजे नेमकी काय ?
• सोप्या भाषेत सांगायचे तर, भारत आणि आफ्रिकन देश एकत्र येऊन भविष्यातील सहकार्याचा रोडमॅप ठरवण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते.
• व्यासपीठ : भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद (India-Africa Forum Summit) हे भारत सरकार आणि आफ्रिकन युनियन (AU) सदस्य देशांमधील संबंध दृढ करणारे अधिकृत आणि उच्च-स्तरीय संस्थात्मक व्यासपीठ आहे.
📜 भारत–आफ्रिका फोरम शिखर परिषदांचा इतिहास काय आहे ?
1)पहिली परिषद - या परिषदेची सुरुवात 2008 मध्ये नवी दिल्ली येथे झाली.
पहिल्या परिषदेत 14 आफ्रिकन देश सहभागी झाले होते आणि त्या वेळी अन्नधान्य व तेलाच्या वाढत्या किमतींवर चर्चा झाली.
2) दुसरी परिषद - 2011 मध्ये इथिओपियाची राजधानी अदीस अबाबा येथे.
3) तिसरी परिषद - 2015 मध्ये नवी दिल्ली
4) चौथी परिषद - आता 2026 मध्ये चौथी परिषद भारतात
🧐 ‘South-South Cooperation’ म्हणजे काय ?
• भारत आणि आफ्रिका हे दोघेही विकसनशील प्रदेश असल्यामुळे अनेक समस्या समान आहेत—जसे की रोजगार, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास.
• त्यामुळे एकमेकांच्या अनुभवातून शिकणे, तंत्रज्ञान आणि विकास मॉडेल्सची देवाणघेवाण करणे, एकमेकांसोबत सहकार्य वाढवण्यावर भर दिला जातो.
• यालाच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‘South-South Cooperation’ असे म्हटले जाते, म्हणजे विकसनशील देशांमधील सहकार्य.
🎯 या परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे ?
• पूर्वी भारत–आफ्रिका संबंध मुख्यतः व्यापार आणि कर्ज (Line of Credit) यापुरते मर्यादित होते.
• बदलते स्वरूप : हे संबंध आता केवळ 'देणारा आणि घेणारा' (Donor-Recipient) असे न राहता, 'भागीदार आणि • गुंतवणूकदार' (Partner-Investor) या नवीन आर्थिक धर्तीवर विकसित होत आहेत.
• आता भारत या संबंधांना आणखी व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे.
✍️ जसे की -
• शिक्षण क्षेत्रात सहकार्य,
• आरोग्य सुविधा,
• कौशल्य विकास,
• औद्योगिक गुंतवणूक,
• संरक्षण आणि समुद्री सुरक्षा - यांसारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर भर दिला जात आहे.
• याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे - झांझिबारमध्ये सुरू करण्यात आलेला IIT मद्रासचा कॅम्पस.
🤝 भारतासाठी आफ्रिका इतका महत्त्वाचा का आहे ?
• आफ्रिका हा केवळ एक खंड नाही, तर भारतासाठी भविष्यातील महत्त्वाचा आर्थिक आणि रणनीतिक भागीदार मानला जातो.
• आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात खनिजे, ऊर्जा संसाधने, आणि विशाल बाजारपेठ उपलब्ध आहे.
• भारतासाठी हे महत्त्वाचे आहे कारण भारतीय कंपन्यांना नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात.
• त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक मंचांवर आफ्रिकन देशांची संख्या जास्त असल्याने राजनैतिकदृष्ट्याही आफ्रिका भारतासाठी महत्त्वाचा भागीदार आहे.
🎯 2026 ची परिषद इतकी महत्त्वाची का मानली जाते ?
• सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक आर्थिक अस्थिरता वाढताना दिसत आहे.
• अशा परिस्थितीत भारताला स्थिर संसाधने, नवीन बाजारपेठा आणि विश्वासार्ह भागीदारांची गरज आहे.
आफ्रिका या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
• म्हणूनच भारत आता ‘भागीदारी आणि गुंतवणूक’ (Partner–Investor Model) या नविन मॅाडेल वर भर देत आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : India–Africa Forum Summit
• पहिली परिषद → 2008, नवी दिल्ली
• चौथी परिषद → 2026, भारत
• मुख्य उद्देश → भारत–आफ्रिका सहकार्य मजबूत करणे
• महत्त्वाची संकल्पना → South-South Cooperation
• विशेष उदाहरण → IIT Madras Campus, झांझिबार (देश -टांझानिया)






















