
चालू घडामोडी | जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन

World Book and Copyright Day
📚 Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन केव्हा साजरा केला जातो ?
(NTPC 2021)
1. 19 जानेवारी
2. 23 एप्रिल
3. 27 एप्रिल
4. 13 मे
उत्तर : 23 एप्रिल
📰 बातमी काय ?
• संपूर्ण जगभरात 23 एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन' (World Book and Copyright Day) म्हणून साजरा केला जातो.
• या दिवसाला " आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन " असेही म्हणतात.
📖 जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल रोजी का साजरा करण्यात येतो ?
• 23 एप्रिल या तारखेला विल्यम शेक्सपियर (William Shakespeare), मिगुएल डी सर्व्हेंटेस (Miguel de Cervantes) आणि इंका गार्सिलासो डे ला वेगा (Inca Garcilaso de la Vega) या लेखकांचा मृत्यू झाला.
• 23 एप्रिल हा जगातील तीन महान लेखकांचा पुण्यतिथी दिवस आहे.
• या दिवसाचे साहित्यिक महत्त्व लक्षात घेऊन, 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन म्हणून साजरा करण्यात येतो

🤔 पहिला जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
🧐 जागतिक पुस्तक दिनाची सुरुवात कोणत्या संस्थेने केली ?
• पहिला जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 1995 रोजी साजरा करण्यात आला.
• जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने म्हणजेच युनेस्कोने (UNESCO) केली.
• पुस्तके वाचण्याची सवय वाढवण्याच्या आणि कॉपीराइट अधिकारांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने युनेस्कोने (UNESCO) 1995 मध्ये पॅरिस येथे झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
• UNESCO चा फूल फॅार्म United Nations Educational, Scientific and Cultural Organization असा आहे.
• युनेस्को (UNESCO) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते.
📖 'जागतिक पुस्तक राजधानी' (World Book Capital) म्हणजे काय ?
• हा युनेस्को (UNESCO) या आंतरराष्ट्रीय संघटनेद्वारे दिला जाणारा एक मानाचा दर्जा (Title) आहे.
• उद्दिष्ट - जगभरात वाचन संस्कृती वाढवणे, पुस्तकांचा प्रसार करणे आणि साक्षरतेला प्रोत्साहन देणे.
• कालावधी - हा दर्जा एका वर्षासाठी दिला जातो. त्याची सुरुवात दरवर्षी 23 एप्रिल (जागतिक पुस्तक दिन) रोजी होते आणि पुढील वर्षीच्या 22 एप्रिलला ती संपते.
• निवडलेले शहर वर्षभर विविध आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने, साहित्यिक कार्यक्रम आणि वाचन मोहिमा राबवते.
🧐 युनेस्कोने 2026 साठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित केले आहे ?
• युनेस्कोने, 2026 या वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून मोरोक्को देशातील रबात (Rabat) या शहराला घोषित केले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Book and Copyright Day
• ‘जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन’ → 23 एप्रिल
• दुसरे नाव → आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन
• सुरुवात करणारी संस्था → UNESCO
• पहिला जागतिक पुस्तक दिन → 23 एप्रिल 1995
23 एप्रिल का निवडला? → तीन महान लेखकांच्या पुण्यतिथीमुळे
1. विल्यम शेक्सपियर
2. मिगुएल डी सर्व्हेंटेस
3. इंका गार्सिलासो डे ला वेगा



















