
चालू घडामोडी | प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III
Pradhan Mantri Gram Sadak Yojana-III (PMGSY-III)
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्रीय मंत्रिमंडळाने मुदतवाढ दिलेल्या 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-टप्पा 3' (PMGSY-III) ची अंमलबजावणी कोणत्या केंद्रीय मंत्रालयामार्फत केली जाते ?
1. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
2. ग्रामीण विकास मंत्रालय
3. पंचायती राज मंत्रालय
4. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
उत्तर : ग्रामीण विकास मंत्रालय
📰 बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III (PMGSY-III) ला मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.
• या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रलंबित रस्ते प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
• तसेच ग्रामीण बाजारपेठा, शाळा आणि रुग्णालयांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

🛣️ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) म्हणजे काय ?
• ग्रामीण भागांना सर्व ऋतूंमध्ये (All-Weather Roads) रस्ते संपर्क उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची ही एक प्रमुख योजना आहे.
1) योजनेची सुरुवात - मूळ PMGSY योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू झाली.
• पहिल्या टप्प्यात ही योजना, 100% केंद्र पुरस्कृत योजना (Centrally Sponsored Scheme) म्हणून सुरू करण्यात आली.
2) मंत्रालय - पंतप्रधान ग्राम सडक योजना, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालया (Ministry of Rural Development) अंतर्गत राबविण्यात येते.
3) तिसरा टप्प्या (Phase-III) -
• तिसऱ्या टप्प्याची (Phase-III) सुरुवात जुलै 2019 मध्ये करण्यात आली होती.
• पहिल्या दोन टप्प्यांत नवीन रस्ते जोडणीवर भर होता, मात्र तिसऱ्या टप्प्यात (Phase-III) अस्तित्वात असलेल्या मुख्य ग्रामीण मार्गांचे (Through Routes) आणि दुव्यांचे मजबुतीकरण आणि सुधारणा (Upgradation) करण्यावर भर आहे.
🧐 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III (PMGSY-III) चे उद्दिष्टे (Aims) :
• व्याप्ती - एकूण 1,25,000 km ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण करणे.
• जोडणी - ग्रामीण वस्त्यांना ग्रामीण कृषी बाजार (GrAMs), उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांशी जोडणे.
• आर्थिक विकास - शेतीमाल आणि बिगर-शेती उत्पादनांच्या वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे.
🎯 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III (PMGSY-III) चे प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features of Extension) :
1) नवीन मुदत -
• मैदानी भागातील रस्ते आणि पुलांसाठी मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
• डोंगराळ भागातील पुलांसाठी ही मर्यादा मार्च 2029 पर्यंत असेल.
2) सुधारित निधी -
• मूळ 80,250 कोटी रुपयांवरून अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून ती आता 83,977 कोटी रुपये करण्यात आली आहे.
3) नवीन मोठे पुल - मंजूर रस्त्यांच्या जोडणीसाठी आवश्यक असलेल्या 161 नवीन मोठ्या पुलांसाठी अंदाजे 961 कोटी रुपये मंजुरी देण्यात आली आहे.
4) हरित रस्ते (Green Roads) - रस्ते बांधणीत प्लास्टिक कचरा आणि 'कोल्ड मिक्स' तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-III (PMGSY-III)
• PMGSY प्रारंभ (पहिला टप्पा ) → 25 डिसेंबर 2000
• मंत्रालय → केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय
• PMGSY-III प्रारंभ (तिसरा टप्पा ) → जुलै 2019
• मुख्य उद्देश → ग्रामीण रस्त्यांचे उन्नतीकरण
• लक्ष्य → 1.25 लाख किमी रस्ते
• नवीन मुदत → मार्च 2028
• सुधारित निधी → ₹83,977 कोटी

















