
चालू घडामोडी | इंग्रजी भाषा दिन
English Language Day
📚 Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'इंग्रजी भाषा दिन' खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
1. हर्बर्ट स्पेन्सर
2. स्टीफन हॉकिंग
3. विल्यम शेक्सपियर
4. अल्बर्ट आईन्स्टाईन
उत्तर : विल्यम शेक्सपियरचा (William Shakespeare)
🧐 'इंग्रजी भाषा दिन' केव्हा साजरी करण्यात येतो ?
• दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस 'इंग्रजी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
• इंग्रजी भाषा ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी आणि बोलली जाणारी भाषा आहे.
• आज इंग्रजी भाषेने जगभरातील शब्द, संकल्पना आणि सांस्कृतिक गोष्टींवर प्रभाव टाकला आहे.
• इंग्रजी भाषेची लोकप्रियता आणि तिच्या वैशिष्ट्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
🤔 'इंग्रजी भाषा दिन' कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
• प्रसिद्ध इंग्रजी कवी आणि लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या सन्मानार्थ इंग्रजी भाषा दिन साजरा केला जातो.
• इंग्रजी भाषेला समृद्ध करण्यात शेक्सपियरने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
• 23 एप्रिल हा दिवस 'इंग्रजी भाषा दिन' म्हणून निवडण्यात आला कारण या दिवशी विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी दोन्ही आहे.
• विल्यम शेक्सपियर यांचा जन्म 23 एप्रिल 1564 रोजी झाला तर त्यांचे निधन 23 एप्रिल 1616 रोजी झाले.

🏛️ 'इंग्रजी भाषा दिनाची स्थापना कोणी आणि केव्हा केली ?
• संयुक्त राष्ट्राने( United Nations) 2010 मध्ये इंग्रजी भाषा दिनाची स्थापना केली.
• संयुक्त राष्ट्रांनी इंग्रजी भाषेच्या संस्कृती, इतिहास आणि कामगिरीचा सन्मान करण्यासाठी
• तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 6 अधिकृत भाषांना (अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश) समान रीतीने प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : English Language Day
• ‘इंग्रजी भाषा दिन’ → 23 एप्रिल
• सन्मानार्थ → विल्यम शेक्सपियर
• विल्यम शेक्सपियर जन्म → 23 एप्रिल 1564
• विल्यम शेक्सपियर निधन → 23 एप्रिल 1616
• स्थापना वर्ष → 2010 (संयुक्त राष्ट्र)
• मुख्य उद्देश → इंग्रजी भाषेचा इतिहास, संस्कृती आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी


















