
चालू घडामोडी | जागतिक वसुंधरा दिन
World Earth Day
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day) दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ?
1. 5 जून
2. 8 मार्च
3. 22 मार्च
4. 22 एप्रिल
उत्तर : 22 एप्रिल
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day) साजरा केला जातो.
• या दिवसाला - ‘जागतिक पृथ्वी दिन’ किंवा 'आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन' (International Mother Earth Day) असेही म्हणतात.
• उद्देश - हा दिवस हवामान बदल (Climate Change), प्रदूषण (Pollution), जैवविविधतेचा ऱ्हास (Biodiversity Loss) यांसारख्या पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
📜 जागतिक वसुंधरा दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी :
(World Earth Day - Historical Background) :
1) पहिली सुरुवात -
• 1969 मधील 'सांता बार्बरा तेल गळती' (Santa Barbara Oil Spill) च्या दुर्घटनेनंतर अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन (Gaylord Nelson) यांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती.
• या दिवसाची सुरुवात 22 एप्रिल 1970 रोजी झाली, ज्याला आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म मानला जातो.
• कायदेशीर परिणाम - 1970 मधील पहिल्या आंदोलनामुळे अमेरिकेत पर्यावरण संरक्षण कायदा आणि 'पर्यावरण संरक्षण संस्था' (EPA) ची स्थापना झाली.


2) संयुक्त राष्ट्रांची (UN) मान्यता -
• संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) 2009 मध्ये एका ठरावाद्वारे 22 एप्रिल हा दिवस अधिकृतपणे 'आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन' (International Mother Earth Day) म्हणून घोषित केला.
3) जागतिक व्याप्ती - सध्या हा दिवस जगातील 190 पेक्षा जास्त देशांमध्ये सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांद्वारे (NGOs) साजरा केला जातो.
🧐 2026 साठी जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
• 2026 या वर्षाची मुख्य संकल्पना “आमची शक्ती, आमची वसुंधरा” (Our Power, Our Planet) ही आहे.
• ही संकल्पना प्रामुख्याने सामुदायिक कृती (Community Action), नूतनीकरणक्षम ऊर्जेकडे (Renewable Energy) वाटचाल आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या घटकांची जबाबदारी निश्चित करणे यावर भर देते.

🌿 जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व काय ?
• लोकशिक्षण - शाश्वत सवयी (Sustainable Habits) आणि निसर्गाचे जतन याविषयी भावी पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी.
• धोरणात्मक बदल - नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणासाठी जागतिक स्तरावर कडक कायदे आणि धोरणे आखण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्र शासनाचे " माझी वसुंधरा 6.0 अभियान " :
• महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संरक्षणासाठी ” माझी वसुंधरा 6.0” या अभियानाच्या माध्यमातून व्यापक आणि समन्वित उपाययोजना राबविल्या आहेत.
• या अभियानात राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
• पंचमहाभूतांच्या संकल्पनेवर आधारित या योजनेत पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या घटकांचे संतुलन राखण्यावर भर दिला जातो.
• शासनाने वृक्षारोपण, जलसंधारण, सांडपाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा वापर यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Earth Day
• जागतिक वसुंधरा दिन → 22 एप्रिल
• सुरुवात → 22 एप्रिल 1970
• सुरुवात कोणी केली? → अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन
• कारण → 'सांता बार्बरा तेल गळती (1969)
• संयुक्त राष्ट्राची (UN) मान्यता - → 2009
• 2026 थीम → “Our Power, Our Planet”
• " माझी वसुंधरा 6.0 अभियान - महाराष्ट्र सरकार
















