
चालू घडामोडी | पहिल्या पानिपतच्या लढाईला 500 वर्षे पूर्ण
500 Years of the First Battle of Panipat
📚 Subject : GS - इतिहास
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , रेल्वे भरती, SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 21 एप्रिल 2026 रोजी ऐतिहासिक 'पानिपतच्या पहिल्या युद्धाला' 500 वर्षे पूर्ण झाली. हे युद्ध बाबर आणि खालीलपैकी कोणामध्ये झाले होते ?
- बहादूर शाह
- इब्राहिम लोदी
- राणा सांगा
- शेरशाह सुरी
उत्तर: इब्राहिम लोदी
📰 बातमी काय ?
• 21 एप्रिल 2026 रोजी पहिल्या पानिपतच्या लढाईला 500 वर्षे पूर्ण झाली.
• 21 एप्रिल 1526 रोजी झालेल्या या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला.
• या विजयामुळे दिल्ली सल्तनतीचा अंत झाला आणि भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात झाली.
⚔️ पहिली पानिपतची लढाई का झाली ?
✍️ पहिली पानिपतची लढाई ही केवळ दोन राजांमधील सत्ता संघर्ष नव्हती, तर भारताच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी घटना होती.
1) इब्राहिम लोदी -
- त्या काळात दिल्लीवर लोदी वंशाचा सुलतान इब्राहिम लोदी राज्य करत होता.
- इब्राहिम लोदीच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले पंजाबचे गव्हर्नर दौलताखान लोदी आणि इब्राहिमच लोदीचे काका आलम खान यांनी बाबरला इब्राहिम लोदीविरुद्ध मदत करण्याचे आमंत्रण दिले.

2) बाबर -
- मध्य आशियातील स्वतःचे साम्राज्य गमावल्यानंतर जहीर-उद-दीन मुहम्मद बाबर याने भारताकडे आपला मोर्चा वळवला.
- बाबरला भारतात नवीन साम्राज्य उभारण्याची संधी दिसत होती.
- त्यामुळे बाबरने भारताकडे केवळ लुटीसाठी नाही, तर कायमचे राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने पाहिले.

🧐 पहिली पानिपतची लढाई कोणात आणि कोठे झाली ?
1) सामना - ही लढाई फरगानाचा (मध्य आशिया) राजकुमार बाबर आणि दिल्लीचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतच्या मैदानावर (सध्याचे हरियाणा) झाली.
2) सैन्यबळ - लोदीकडे सुमारे 1,00,000 सैनिक आणि शेकडो युद्धहत्ती होते, तर बाबरकडे केवळ 12,000 सैनिकांची शिस्तबद्ध तुकडी होती.
- संख्याबळाने कमी असूनही तंत्रज्ञानाच्या जोरावर बाबरने हा विजय मिळवला.
🤔 मग बाबर कमी सैन्य असूनही कसा जिंकला ?
बाबरच्या विजयाचे मुख्य कारण त्याची आधुनिक युद्धकौशल्याची रणनीती होती :
1) तुलुघमा पद्धत (Tulughma Tactics) -
- यामध्ये सैन्याची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी करून शत्रूला दोन्ही बाजूंनी आणि मागून घेरले जायचे.
- यामुळे लोदीचे अवाढव्य सैन्य एकाच ठिकाणी कोंडीत सापडले.
2) रुमी पद्धत (Rumi Device) -
- ही बाबरने उघड्या मैदानावरील युद्धात वापरलेली एक ऑट्टोमन (उस्मानी) तोफखाना व्यूहरचना होती. यामध्ये अनेक तोफा एकमेकांना चामड्याच्या दोऱ्यांनी बांधलेल्या गाड्यांमागे सुरक्षित ठेवून, शत्रूवर अचानक व अचूक तोफगोळ्यांचा मारा केला जायचा.
- बाबरने उघड्या मैदानावरील युद्धात तोफखाना (Artillery) आणि मॅचलॉक (बंदुका) यांचा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर वापर केला.
3) दारूगोळा आणि तोफखान्याचा वापर -
- भारतात दारूगोळा आधीपासून उपलब्ध असला, तरी मैदानी लढाईत तोफा (Cannons) आणि मॅचलॉक बंदुकांचा (Arquebusiers) यशस्वी वापर करणारा बाबर हा पहिला आक्रमक ठरला.
- तोफांच्या आवाजामुळे लोदीचे हत्ती बिथरले आणि त्यांनी स्वतःच्याच सैन्याला चिरडले.

लढाईचे परिणाम आणि महत्त्व (Significance)
1) सुलतानशाहीचा अंत - इब्राहिम लोदी युद्धभूमीवरच मारला गेला. यासोबतच ३२० वर्षे चाललेली दिल्ली सल्तनत आणि लोदी घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
2) मुघल साम्राज्याची स्थापना - या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया घातला, ज्यांनी पुढील ३०० वर्षांहून अधिक काळ भारतावर राज्य केले आणि देशाच्या कला, संस्कृती व प्रशासनावर मोठा प्रभाव पाडला.
खानवाचे युद्ध (1527) कोणात लढले गेले ?
• या विजयानंतरही बाबरला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध सहन करावा लागला.
• सत्ता दृढ करण्यासाठी बाबरने 1527 मध्ये खानवाची लढाई लढून राणा संगा यांच्या नेतृत्वाखालील राजपूतांचा पराभव केला.
• 1530 मध्ये मृत्यू होण्यापूर्वी अवघ्या दोन वर्षांत त्याने आपले साम्राज्य बिहारपर्यंत विस्तारले.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : First Battle of Panipat
• पहिली पानिपतची लढाई → 21 एप्रिल 1526
• युद्ध कोणामध्ये ? → बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी
• ठिकाण → पानिपत, (सध्याचे हरियाणा)
• परिणाम → दिल्ली सल्तनतीचा अंत + मुघल साम्राज्याची सुरुवात
• लष्करी नवकल्पना → उघड्या मैदानावरील युद्धात तोफखाना आणि बंदुका यांचा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर वापर
• पुढील महत्त्वाचे युद्ध → खानवा युद्ध (1527) – बाबर विरुद्ध राणा सांगा




















