
चालू घडामोडी | मुंबईमध्ये भारतातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्प
India’s First Pod Taxi Project in Mumbai
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मुंबईत देशातील पहिल्या चालकविरहित आणि AI-चालित 'पॉड टॅक्सी' (ARTS) प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प कोणत्या दोन प्रमुख ठिकाणांना जोडणार आहे ?
- ठाणे ते नवी मुंबई
- दादर ते कुलाबा
- बोरीवली ते अंधेरी
- कुर्ला ते वांद्रे-कुर्ला संकुल
उत्तर : कुर्ला ते वांद्रे-कुर्ला संकुल
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये भारतातील पहिल्या पॉड टॅक्सी (Pod Taxi) प्रकल्पाचे, म्हणजेच ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (ARTS) चे भूमिपूजन केले.
• मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'साठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

🧐 पॉड टॅक्सी म्हणजे काय ?
• पॉड टॅक्सी (Personal Rapid Transit) ही स्वतंत्र एलिव्हेटेड मार्गावर धावणारी, पूर्णपणे चालकविरहित आणि बॅटरीवर चालणारी आधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. हे छोटे केबिनसारखे 'पॉड्स' कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) नियंत्रित असतात.
• हे पॉड सामान्य बस किंवा मेट्रोसारखे प्रत्येक स्टेशनवर न थांबता, प्रवाशाने निवडलेल्या ठराविक थांब्यावरच ही टॅक्सी थेट (Non-stop) पोहोचते.
✍️ भारतातील पहिली पॉड टॅक्सी (Pod Taxi) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भूमिपूजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.
• मार्ग - हा प्रकल्प प्रामुख्याने कुर्ला (Kurla) आणि वांद्रे-कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex) यांना जोडणार आहे.
• अंमलबजावणी संस्था - या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority - MMRDA) द्वारे केली जात आहे.
• व्याप्ती - एकूण प्रकल्पाची लांबी सुमारे 8.85 km असेल.
• पहिला टप्पा - पहिल्या टप्प्यात कुर्ला टर्मिनल ते वांद्रे पूर्व दरम्यान 3.36 km चा मार्ग विकसित केला जाईल.
🎯 पॉड टॅक्सी प्रणालीची वैशिष्ट्ये (Key Features) :
• ड्रायव्हरलेस आणि AI-आधारित - या टॅक्सी पूर्णपणे चालकाशिवाय चालतील आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) नियंत्रित केल्या जातील.
• प्रवासी क्षमता - एका पॉडमध्ये जास्तीत जास्त 6 प्रवासी बसू शकतात.
• वेग आणि वारंवारता - कमाल वेग 40 किमी/तास असेल आणि प्रत्येक 15 सेकंदांच्या अंतराने (Headway) पॉड्स उपलब्ध असतील.
• ऊर्जा - या टॅक्सी बॅटरीवर चालणाऱ्या असून त्या एका स्वतंत्र मार्गिकेवरून (Dedicated Guideway) धावतील.
• स्टॉप - पॉड केवळ प्रवाशांनी निवडलेल्या स्थानकांवरच थांबतील, ज्यामुळे वेळ वाचेल.
✍️ मुंबई पॉड टॅक्सी प्रकल्पाचे उद्दिष्टे (Objectives) :
• लास्ट माईल कनेक्टिव्हिटी : रेल्वे स्टेशनवरून वांद्रे-कुर्ला संकुल सारख्या व्यावसायिक केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे.
• वाहतूक कोंडी कमी करणे : वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक कमी करणे.
• पर्यावरणपूरक : बॅटरीवर चालणारे वाहन असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भारतातील पहिला Pod Taxi प्रकल्प → मुंबई
• प्रणाली → Automated Rapid Transit System (ARTS)
• मार्ग → कुर्ला (Kurla) आणि वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणार
• अंमलबजावणी संस्था → मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)
• एकूण लांबी → 8.85 किमी
• पहिला टप्पा → 3.36 किमी




















