
चालू घडामोडी | विश्व सूत्र कलेक्शन
Vishwa Sutra Collection
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि NIFT ने संयुक्तपणे विकसित केलेल्या, भारतीय हातमागाला जागतिक ओळख देणाऱ्या ‘विश्व सूत्र’ (Vishwa Sutra) संग्रहाचे अनावरण नुकतेच कोठे करण्यात आले ?
- 61 वी फेमिना मिस इंडिया, भुवनेश्वर
- आंतरराष्ट्रीय फॅशन वीक, नवी दिल्ली
- जागतिक व्यापार परिषद, मुंबई
- 60 वा फिल्मफेअर सोहळा, गोवा
उत्तर : 61 वी फेमिना मिस इंडिया, भुवनेश्वर
📰 बातमी काय ?
• भारतीय हातमाग (Handloom) क्षेत्राला जागतिक पातळीवर नेण्याच्या उद्देशाने 'विश्व सूत्र' (Vishwa Sutra) या विशेष डिझायनर कलेक्शनचे अनावरण भुवनेश्वर येथे 61 व्या फेमिना मिस इंडिया (Femina Miss India) स्पर्धेत करण्यात आले.

🤔 'विश्व सूत्र' म्हणजे काय ?
• हा भारतीय हातमाग क्षेत्रातील एक आगळावेगळा प्रयोग आहे.
• यामध्ये भारताच्या विविध राज्यांतील 30 वेगवेगळ्या हातमाग विणकामांना (Handloom Weaves) जगातील 30 वेगवेगळ्या देशांच्या सांस्कृतिक शैली, डिझाइन आणि पेहरावांसोबत (Silhouettes) जोडून आधुनिक फॅशन स्वरूपात सादर करण्यात आले आहे.
🤝 निर्मिती आणि भागीदार :
• मंत्रालय - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय (Ministry of Textiles) अंतर्गत विकास आयुक्त (हातमाग) यांचे कार्यालय.
• शैक्षणिक भागीदार - राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (NIFT - National Institute of Fashion Technology) ही या प्रकल्पाची डिझाइन पार्टनर आहे.
• व्यासपीठ - भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 61 व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत 30 राज्यांच्या विजेत्यांनी हे कलेक्शन परिधान करून याचे जागतिक सादरीकरण केले.
🎯 प्रमुख वैशिष्ट्ये आणि नाविन्यपूर्ण जोड्या (Innovative Pairings) :
या उपक्रमात भारताचे पारंपारिक विणकाम आणि परदेशी संस्कृती यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला:
• ओडिशा इकत (Odisha Ikat) → ग्रीक शैलीसोबत
• कांचीपुरम (Kanchipuram) → नॉर्वेजियन (Norwegian) रेषांसोबत मेळ.
• मुगा सिल्क (Muga Silk) → इजिप्शियन (Egyptian) घटकांसह डिझाइन.
• पटोला (Patola) → स्पॅनिश (Spanish) संस्कृती प्रभावांसोबत.
• बनारसी (Banarasi) → युनायटेड अरब अमिराती (UAE) प्रेरित पोशाखांसोबत.

🌾 कुणबी (Kunbi) विणकाम चर्चेत का आले ?
• विजेता - कुणबी विणकाम (Kunbi Weave): 61 व्या फेमिना मिस इंडियाची विजेती साध्वी सतीश सैल हिने मध्य युरोपीय स्कर्टच्या स्वरूपात गोव्याचे पारंपारिक 'कुणबी विणकाम' परिधान केले होते.

🤔 आर्थिक आणि धोरणात्मक महत्त्व (Significance) :
1) ‘व्होकल फॉर लोकल टू ग्लोबल’ - हा उपक्रम ग्रामीण विणकर आणि महिला उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊन पारंपारिक कौशल्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, या दूरदृष्टीकोनाला बळकटी देतो.
2) 5F संकल्प (5F Vision) - हा उपक्रम थेट पंतप्रधानांच्या 5F संकल्पनेची अंमलबजावणी करतो.
Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign — अर्थात शेतापासून धाग्यापर्यंत तेथून कारखान्यापर्यंत तेथून फॅशन आणि परदेशात.
या मूल्य साखळीला चालना देत हातमाग क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत रोजगार, सांस्कृतिक उद्योगांची मजबुती आणि जागतिक वस्त्र आणि फॅशन बाजारात भारताची उपस्थिती वाढवण्यात हातमागाच्या मोलाच्या भूमिकेवरही भर देतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• विश्व सूत्र (Vishwa Sutra) → भारतीय हातमाग आधारित डिझायनर संग्रह
• मंच → 61 वी Femina Miss India, भुवनेश्वर
• 30-30 Framework → 30 राज्ये + 30 देश
• संबंधित मंत्रालय → केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय
• भागीदार संस्था → National Institute of Fashion Technology
• मुख्य उद्देश → भारतीय हातमागाला जागतिक फॅशनशी जोडणे




















