
चालू घडामोडी | जनुकीय बदल केलेले डास म्हणजे काय ?
What are Genetically Modified Mosquitoes ?
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच कोणत्या देशात झालेल्या ऐतिहासिक संशोधनानुसार, जनुकीय बदल केलेल्या (GM) डासांनी मानवी शरीरात मलेरियाचा संसर्ग रोखण्यात मोठे यश मिळवले आहे ?
- केनिया
- युगांडा
- टांझानिया
- नायजेरिया
उत्तर : टांझानिया
📰 बातमी काय ?
• टांझानियामध्ये (Tanzania) झालेल्या एका महत्त्वाच्या संशोधनात Genetically Modified (GM) Mosquitoes म्हणजेच जनुकीय बदल केलेले डास मलेरिया रोखण्यात प्रभावी ठरत असल्याचे आढळले आहे.
• जैवतंत्रज्ञानातील (Biotechnology) हा शोध विज्ञान आणि आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड मानला जात आहे.

🦟 Genetically Modified (GM) डास म्हणजे काय ?
• सोप्या भाषेत सांगायचे तर, हे असे डास आहेत ज्यांच्या शरीरातील DNA (जनुकीय रचना) वैज्ञानिकांनी जाणीवपूर्वक बदलली आहे.
• यामध्ये डासांच्या शरीरात विशेष जीन्स (Genes) टाकले जातात, ज्यामुळे ते मलेरिया पसरवणारे वाहक (Carrier) राहात नाहीत.
• म्हणजे डास चावतील, पण ते मलेरिया पसरवू शकणार नाहीत.
🧐 Genetically Modified डास तयार कसे केले जातात ?
👉 शास्त्रज्ञांनी हे डास तयार करण्यासाठी खालील प्रगत जैव-तांत्रिक पद्धतींचा वापर केला आहे:
1) जीन ड्राईव्ह यंत्रणा (Gene Drive Mechanism) -
सामान्यतः निसर्गात पालकांकडून पुढील पिढीकडे एखादे जनुक जाण्याची शक्यता 50% असते.
परंतु, 'जीन ड्राईव्ह' तंत्रज्ञानामुळे हा बदल पुढील पिढीतील 90% पेक्षा जास्त डासांमध्ये हस्तांतरित होतो.
ज्यामुळे संपूर्ण जंगलातील डासांची प्रजाती वेगाने बदलून जनुकीय बदल केलेले डासांमध्ये होऊ शकते.
2) अँटी-पॅरासाईट रेणू (Anti-Parasite Molecules) -
डासांच्या आतड्यात (Midgut) विशिष्ट प्रतिपिंडे (Antibodies) तयार करणारी जनुके जोडली जातात.
जेव्हा डास मानवी रक्त शोषून घेतो, तेव्हा हे रेणू सक्रिय होतात आणि मलेरियाच्या परजीवींचा (Parasites) डासाच्या पोटातच नायनाट करतात.
3) वंध्यत्व जनुके (Suppression Genes) -
डासांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी डासांमधील 'doublesex' जनुकांना लक्ष्य केले जाते, ज्यामुळे मादी डास वंध्य (Sterile) बनतात आणि डासांची संख्या झपाट्याने कमी होते.
🎯 प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features) :
1) टप्प्याटप्प्याने चाचणी (Phased Testing) - सुरक्षेचा उपाय म्हणून संशोधक 'स्प्लिट जीन ड्राईव्ह' (Split Gene Drive) चा वापर करतात, जेणेकरून डास निसर्गात सोडण्यापूर्वी त्यांच्या प्रभावाची सुरक्षित चाचणी घेता येईल.
2) विशिष्ट प्रजाती लक्ष्य (Target Specificity) - हे तंत्रज्ञान अत्यंत अचूक आहे. हे केवळ मलेरिया पसरवणाऱ्या विशिष्ट प्रजातीलाच (उदा. Anopheles gambiae) लक्ष्य करते, ज्यामुळे इतर उपयुक्त कीटकांना कोणतीही इजा होत नाही.
3) पर्यावरणीय टिकाऊपणा - रासायनिक कीटकनाशकांप्रमाणे हे पाण्यात वाहून जात नाही. जोपर्यंत डासांची लोकसंख्या जिवंत आहे, तोपर्यंत निसर्गात हे 'जीन ड्राईव्ह' कार्य करत राहते.
🤝 या संशोधनाचे महत्त्व (Significance) काय ?
• वास्तविक पडताळणी - टांझानियामधील अभ्यासाने हे सिद्ध केले की हे डास केवळ प्रयोगशाळेतच नव्हे, तर प्रत्यक्ष वातावरणातील (Real-world) वन्य मलेरिया परजीवींविरुद्धही पूर्णपणे प्रभावी आहेत.
• दुर्गम भागात पोहोच - दुर्गम आणि ग्रामीण भागात जिथे औषधे आणि रुग्णालये पोहोचू शकत नाहीत, तिथे हे स्वतःहून पसरणारे डास मलेरियाचा नायनाट करू शकतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• चर्चेत तंत्रज्ञान → Genetically Modified (GM) Mosquitoes
• उद्देश → मलेरिया प्रसार थांबवणे
• मुख्य परजीवी → Plasmodium
• तंत्रज्ञान → CRISPR-Cas9
• Gene Drive → पुढील पिढीत 90% गुणधर्म पसरवते
• अभ्यासक देश → टांझानिया
• मुख्य फायदा → मलेरिया नियंत्रण + दुर्गम भागात उपयोग






















