
चालू घडामोडी | 'भारत सागरी विमा संकोष' म्हणजे काय ?
What is 'Bharat Maritime Insurance Pool'?
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'इंटरनॅशनल ग्रुप ऑफ प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी' या गटांनी भू-राजकीय तणावामुळे विमा संरक्षण नाकारल्यास, भारतीय सागरी व्यापार सुरक्षित ठेवण्याचे काम खालीलपैकी कोण करेल ?
- जागतिक बँक
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
- भारत मॅरिटाइम इन्शुरन्स पूल
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
उत्तर : भारत मॅरिटाइम इन्शुरन्स पूल
📰 बातमी काय ?
• केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘भारत सागरी विमा संकोष’ (Bharat Maritime Insurance Pool - BMI Pool) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
⚓'भारत सागरी विमा संकोष'(‘भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल’) म्हणजे नेमके काय ?
• 'भारत सागरी विमा संकोष' ही एक देशांतर्गत सागरी विमा यंत्रणा आहे.
• मुख्य उद्देश - जागतिक युद्ध, निर्बंध किंवा समुद्री अस्थिरतेच्या काळातही भारताचा सागरी व्यापार खंडित होऊ नये आणि परदेशी विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
• यामध्ये - जहाजे, मालवाहतूक, युद्धजन्य जोखीम, अपघात किंवा नुकसान यांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल.
• केंद्र सरकारकडून 12,980 कोटी रुपयांची सार्वभौम हमी (Sovereign Guarantee) दिली जाणार आहे.
'भारत सागरी विमा संकोष' ही योजना सुरू करण्याची गरज का पडली ?
• सध्या भारत विदेशी सागरी विमा संस्थांवर अवलंबून आहे.
• 'इंटरनॅशनल ग्रुप ऑफ प्रोटेक्शन अँड इंडेम्निटी' (International Group of Protection and Indemnity Clubs) सारख्या परदेशी गटाकडून आपण विमा घेतो.
• परंतु युद्ध, भू-राजकीय तणाव, आर्थिक निर्बंध (Sanctions) यामुळे विमा सेवा महाग किंवा बंद होण्याचा धोका असतो.
• म्हणून भारताने स्वतःची विमा क्षमता विकसित करण्याचा निर्णय घेतला.
🚢 कोणत्या जोखमींना संरक्षण मिळणार ?
1) जहाजांचे नुकसान (Hull & Machinery) - जहाज आणि यंत्रसामग्रीच्या नुकसानीसाठी विमा.
2) माल संरक्षण (Cargo Insurance) - वाहतुकीदरम्यान माल खराब किंवा नष्ट झाल्यास संरक्षण.
3) युद्धजन्य जोखीम (War Risk) - संघर्ष क्षेत्रातून जाणाऱ्या जहाजांसाठी विमा संरक्षण.
4) तृतीय पक्ष संरक्षण व नुकसान भरपाई - तेलगळती, जहाजाचे अवशेष हटवणे, मालाचे नुकसान, कर्मचाऱ्यांची दुखापत आणि त्यांना मायदेशी परत आणणे, जहाजांच्या टक्करीमुळे उद्भवणारे दायित्व यांसारखे तृतीय-पक्ष दायित्व.
🛳️ कोणत्या जहाजांना या योजनेचा लाभ मिळेल ?
👉 या योजनेचा लाभ-
• भारतीय ध्वज असलेली (Indian Flagged)
• भारताच्या नियंत्रणाखालील जहाजे
• आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून भारतीय बंदरांवर माल आणणारी किंवा भारतातून परदेशात माल घेऊन जाणारी कोणतीही जहाजे.
• यामध्ये जगातील अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक सागरी मार्गांतून (Volatile Maritime Corridors) होणाऱ्या वाहतुकीचाही समावेश आहे.
🏛️ योजना कोण राबवणार ?
• या पूलचे सदस्य असलेल्या विमा कंपन्यांद्वारे पॉलिसी जारी केल्या जातील, योजनेची एकत्रित विमा क्षमता सुमारे 950 कोटी रुपये असेल.
• नव्याने तयार करण्यात आलेली Governing Body देखरेख करेल.
🎯 भारत मॅरिटाइम इन्शुरन्स पूल (BMI Pool) चे सामरिक व आर्थिक महत्त्व :
1) आर्थिक सुरक्षा -
भारताचा 70% पेक्षा जास्त व्यापार (वजनानुसार) आणि 95% व्यापार (मूल्यानुसार) सागरी मार्गाने होतो, त्यामुळे या क्षेत्राचे संरक्षण करणे देशासाठी आवश्यक आहे.
2) आत्मनिर्भर भारत - युनायटेड किंगडम, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या विकसित देशांच्या धर्तीवर भारताने हे पाऊल उचलले असून, हे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला बळ देणारे आहे.
3) ऊर्जा आणि व्यापार प्रवाहाची सुरक्षा (Protection Against Sanctions) -
• परदेशी कव्हरेज नाकारल्यास संरक्षण : जेव्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय गट किंवा P&I (Protection and Indemnity) क्लब्स एखाद्या देशावर लादलेल्या एकतर्फी निर्बंधांमुळे (Unilateral Sanctions) विमा कव्हरेज काढून घेतात, तेव्हा भारताचा व्यापार धोक्यात येऊ शकतो.
• अखंडित पुरवठा साखळी : अशा आणीबाणीच्या परिस्थितीत 'BMI पूल' भारताचे सुरक्षा कवच म्हणून काम करेल. यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव किंवा निर्बंधांचा भारताच्या ऊर्जा (क्रूड ऑईल, गॅस) आणि इतर महत्त्वाच्या व्यापारी आयातीवर कोणताही परिणाम होणार नाही.
4) परकीय चलनाची बचत (Forensic Exchange / Forex Conservation) -
• प्रचंड प्रीमियमचा आउटफ्लो रोखणे: सध्या भारतीय जहाजे आणि मालवाहतुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा विमा प्रीमियम आंतरराष्ट्रीय समूहांना (जसे की लंडन-आधारित पी अँड आय क्लब्स) परकीय चलनात दिला जातो.
• देशांतर्गत निधी संवर्धन : या विम्याचे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर (भारतातच) केल्यामुळे, प्रीमियमच्या रूपाने देशाबाहेर जाणारा प्रचंड परकीय चलनाचा साठा (Foreign Exchange Outflow) भारतातच राहील, ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• उपक्रम → Bharat Maritime Insurance Pool
• मंजुरी → केंद्रीय मंत्रिमंडळ
• मुख्य उद्देश → सागरी व्यापारासाठी स्वदेशी विमा संरक्षण
• सार्वभौम हमी → ₹ 12,980 कोटी
• विमा प्रकार → जहाजांचे नुकसान, माल संरक्षण, युद्धजन्य जोखीम तृतीय पक्ष संरक्षण व नुकसान भरपाई
• मुख्य उद्देश → परदेशी विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणे





















