National Panchayati Raj Day
📚 Subject : GS - राज्यशास्त्र - पंचायतराज, घटनादुरुस्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता ?
- 1992
- 2000
- 2010
- 2015
उत्तर : 2010
📰 बातमी काय ?
• भारतामध्ये 24 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्यात आला.
• वर्ष 2026 मध्ये भारताच्या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या या ऐतिहासिक टप्प्याला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत.
💡 संकल्पना स्पष्टता : पंचायती राज म्हणजे काय ?
• गावपातळीवरील किंवा स्थानिक पातळीवर असलेल्या स्थानिक स्वराज्य व्यवस्था, ज्यामध्ये स्थानिक नागरिक स्वतःच्या विकासाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, तिला पंचायती राज व्यवस्था म्हणतात.
• यामुळे लोकशाहीचे विकेंद्रीकरण (Decentralisation) मजबूत होते आणि स्थानिक समस्या स्थानिक पातळीवर सोडवता येतात.
🧐 राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणजे काय ?
• हा दिवस 73 वी घटनादुरुस्ती कायदा, 1992 (73rd Constitutional Amendment Act) लागू होऊन पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
• 24 एप्रिल 1993 पासून 73 वी घटनादुरुस्ती (1992) कायदा लागू झाला.
• 24 एप्रिल हा दिवस भारताच्या राजकीय इतिहासातील 'विकेंद्रीकरणाचा' सुवर्णक्षण मानला जातो.
• मुख्य उद्देश - ग्रामीण विकेंद्रीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि ग्रामीण विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करणे.
✅ पहिला पंचायती राज दिन केव्हा साजरा झाला ?
• पहिला अधिकृत राष्ट्रीय पंचायती राज दिन 2010 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.

✍️ राष्ट्रीय पंचायती राज दिन 2026 थीम काय ?
• या वर्षीची थीम “सशक्त पंचायत, सर्वांगीण विकास” (Sashakt Panchayat, Sarvangeen Vikas) ही आहे.
यामध्ये ई-ग्राम स्वराज (e-Gram Swaraj) च्या माध्यमातून डिजिटल गव्हर्नन्स मजबूत करणे आणि 2047 पर्यंत 'विकसित भारत' चे स्वप्न साकारण्यावर भर दिला आहे.

🧐 73 वी घटनादुरुस्ती काय आहे ?
• 73 वी घटनादुरुस्ती कायदा, 1992 हा भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारा महत्त्वाचा कायदा आहे.
• या दुरुस्तीमुळे भारताची शासनव्यवस्था केंद्र – राज्य या दोन स्तरांपासून बहुस्तरीय (Multi-level Governance) झाली.
• ही दुरुस्ती राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांतील (Directive Principles of State Policy) कलम 40 ला प्रत्यक्ष स्वरूप देते.
🎯 73 व्या घटनादुरुस्तीची महत्त्वाची वैशिष्ट्ये :
1) संविधानात भाग IX जोडला :
या दुरुस्तीने संविधानात भाग IX (Part IX) समाविष्ट करण्यात आला.
यात कलम 243 ते 243-O पर्यंत पंचायती राज व्यवस्थेची रचना, अधिकार आणि निवडणूक प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
2) 11वे परिशिष्ट (11th Schedule) :
या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत 11वे परिशिष्ट जोडण्यात आले,
यामध्ये 29 विषय पंचायती राज संस्थांकडे सोपविण्यात आले.
उदाहरणार्थ - जमीन सुधारणा, लघु सिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, पशुसंवर्धन इत्यादी.
3) ग्रामसभा – लोकशाहीचा पाया :
कलम 243A अंतर्गत ग्रामसभा ही पंचायती राज व्यवस्थेची मूलभूत एकक मानली गेली.
ग्रामसभेत गावातील सर्व नोंदणीकृत मतदार सहभागी होतात. त्यामुळे ग्रामसभा ही भारतातील प्रत्यक्ष लोकशाहीचे (Direct Democracy) एकमेव उदाहरण आहे.
4) त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था :
कलम 243B आणि 243C नुसार पंचायत व्यवस्था तीन स्तरांवर राबवली जाते:
1. ग्रामपंचायत (Village Level)
2. पंचायत समिती / मध्य स्तर (Block/Mandal Level)
3. जिल्हा परिषद (District Level)
📌 अपवाद - 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना मध्य स्तर (पंचायत समिती) ठेवणे बंधनकारक नाही. लोकसंख्या कमी असल्यामुळे ते मध्य स्तर गाळू शकता.
5) आरक्षण व्यवस्था (कलम 243D) :
SC/ST आरक्षण - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते.
महिलांसाठी आरक्षण - किमान 1/3 (33%) जागा महिलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले. यात SC/ST महिलांसाठी उप-आरक्षण देखील समाविष्ट आहे.
(नोंद: महाराष्ट्रात महिलांसाठी आरक्षण 50% आहे.)
📌 सध्याची स्थिती: सध्या भारतात पंचायती राज संस्थांमध्ये एकूण प्रतिनिधींपैकी 49.75% महिला प्रतिनिधी आहेत.
6) पंचायतांचा कार्यकाळ आणि विसर्जन (कलम 243E):
कलम 243E नुसार पंचायतांचा कार्यकाळ 5 वर्षे निश्चित करण्यात आला आहे.
जर पंचायत मुदतपूर्व विसर्जित झाली, तर 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.
नवीन पुनर्रचित पंचायत केवळ उर्वरित काळासाठीच (Remainder Term) अस्तित्वात राहते.
7) दोन स्वतंत्र वैधानिक संस्थांची स्थापना :
राज्य निवडणूक आयोग (SEC) - कलम 243K अंतर्गत पंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला.
राज्य वित्त आयोग (SFC) - कलम 243-I नुसार, पंचायतींची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर वाटपाच्या शिफारशींसाठी दर 5 वर्षांनी राज्यपालांद्वारे राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते.
✍️ राज्य वित्त आयोगाचे काम -
पंचायतांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे
कर वाटपाबाबत शिफारस करणे
अनुदानासंबंधी सूचना देणे
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
राष्ट्रीय पंचायती राज दिन → 24 एप्रिल
संदर्भ → 73 वी घटनादुरुस्त (1992), अंमलबजावणी → 24 एप्रिल 1993
पहिल्यांदा साजरा → 2010
भाग IX → कलम 243 ते 243-O → पंचायती राज व्यवस्थेची रचना, अधिकार आणि निवडणूक प्रक्रिया
11वे परिशिष्ट → पंचायती राज संस्थांकडे सोपविण्यात आलेले 29 विषय
