
चालू घडामोडी | 'नमस्ते' योजना
NAMASTE Scheme
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी आणि अलीकडेच प्रगती अहवालामुळे चर्चेत असलेली 'नमस्ते' (NAMASTE) योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
- ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डिजिटल सक्षमीकरण
- परदेशी पर्यटकांचे स्वागत आणि पर्यटन स्थळांचा विकास
- सेप्टिक टँक व मॅनहोलची यांत्रिक स्वच्छता आणि स्वच्छता कामगारांचे कल्याण
- प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
उत्तर : सेप्टिक टँक व मॅनहोलची यांत्रिक स्वच्छता आणि स्वच्छता कामगारांचे कल्याण
📰 बातमी काय ?
• केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने अलीकडे NAMASTE योजनेअंतर्गत मोठी प्रगती झाल्याची माहिती दिली आहे.
• या अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रोफाइलिंग, वैयक्तिक संरक्षक उपकरण (PPE) किट वाटप, आरोग्य विमा, आयुष्मान कार्ड आणि आर्थिक मदत देण्यात आली आहे.
🤔 'नमस्ते' (NAMASTE) योजना म्हणजे काय ?
• NAMASTE फूल फॅार्म : National Action for Mechanised Sanitation Ecosystem
• मराठी नाव : यांत्रिकीकृत स्वच्छता परिसंस्थेसाठी राष्ट्रीय कृती योजना
• मैला वाहून नेणे किंवा सेप्टिक टँक व मॅनहोलची हाताने केली जाणारी घातक स्वच्छता (Manual Scavenging) पूर्णपणे बंद करून, त्या जागी यांत्रिकीकरणाचा (Mechanisation/Technology) वापर करणे.
• स्वच्छता कामगारांना सुरक्षितता, सन्मान, आरोग्य सुरक्षा आणि पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रयत्न करते.
• ही योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान (Dignity), सुरक्षितता, आरोग्य संरक्षण आणि शाश्वत रोजगार सुनिश्चित करण्यावर भर देते.
🏛️ 'नमस्ते' (NAMASTE) योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत सुरू करण्यात आली ?
यांत्रिकीकृत स्वच्छता परिसंस्थेसाठी राष्ट्रीय कृती (NAMASTE) योजना जुलै 2023 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (MoSJE) आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) यांनी सुरू केली.
स्वरूप - ही एक केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Scheme) आहे (म्हणजे 100% केंद्र सरकारद्वारे वित्तपुरवठा केला जातो.)
🎯 या योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये पु़ढीलप्रमाणे आहेत -
स्वच्छतेच्या कामात शून्य मृत्यूदर गाठणे,
मानवी विष्ठेशी थेट संपर्क पूर्णपणे टाळणे,
सर्व स्वच्छता कामे कुशल कामगारांकडून सुरक्षा उपकरणांसह केली जातील याची खातरजमा करणे,
आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्सचे (ERSUs) सबलीकरण,
बचत गटांच्या माध्यमातून तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन कामगारांना सक्षम करणे.
✍️ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features):
1) कामगार सुरक्षा व आयुष्मान कार्ड :
सेप्टिक टँक साफ करणाऱ्या कामगारांची अधिकृत नोंदणी (Validation) केली जाते.
त्यांना पीपीई (PPE) किट्स आणि मोफत आरोग्य उपचारांसाठी 'आयुष्मान भारत' (Ayushman Card) अंतर्गत आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाते.
2) स्वच्छता उद्यमी योजना (SUY):
स्वच्छता कामगारांना स्वतःचे यांत्रिक क्लीनिंग वाहन किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारकडून थेट भांडवली अनुदान (Capital Subsidy) दिले जाते, जेणेकरून ते 'सॅनिप्रेन्युअर' (Sanipreneurs/स्वच्छता उद्योजक) बनू शकतील.
3) कचरा वेचकांचा समावेश (Waste Pickers) :
जून 2024 पासून घनकचरा व्यवस्थापनात (Solid Waste Management) कार्यरत असलेल्या कचरा वेचकांचाही (Waste Pickers) या योजनेत समावेश करून सामाजिक संरक्षणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
'नमस्ते' (NAMASTE) योजनेचे धोरणात्मक महत्त्व (Significance) :
• ही योजना मानवी हातांनी मैला साफ करण्याच्या ऐतिहासिक अन्यायाला पूर्णविराम देतो.
• कामगारांचा विषारी वायू आणि घातक वातावरणाशी येणारा थेट संपर्क थांबवून शहरी भागातील स्वच्छता अधिक सुरक्षित बनवतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• पूर्ण नाव → National Action for Mechanised Sanitation Ecosystem.
• योजनेचे स्वरूप → 'केंद्रीय क्षेत्र योजना' (Central Sector Scheme)
• मंत्रालये →केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय + गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय
• मुख्य उद्दिष्ट → सेप्टिक टँक आणि गटारांची मानवी हातांनी केली जाणारी धोकादायक स्वच्छता (Manual Scavenging) • पूर्णपणे बंद करून 100% यांत्रिकीकरण करणे.




















