
चालू घडामोडी | केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाला भेट

Union Minister visited the State Council of Educational Research and Training (SCERT), Maharashtra
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्रीय मंत्र्यांनी नुकताच आढावा घेतलेला 'निपुण महाराष्ट्र' (NIPUN Maharashtra) हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाशी संबंधित आहे ?
- ग्रामीण तरुणांना मोफत ड्रायव्हिंग लायसन्स देणे
- प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिळवून देणे
- उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोफत संगणक वाटप करणे
- महिला बचत गटांना डिजिटल बँकिंगचे प्रशिक्षण देणे
उत्तर : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिळवून देणे
📰 बातमी काय ?
• अलीकडे केंद्रीय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी पुणे येथील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाला भेट दिली आणि महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमांचा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) च्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेतला.

🧐 बैठकीत कोणते उपक्रम चर्चेत होते ?
1) निपुण महाराष्ट्र अभियान (NIPUN Maharashtra Mission):
• 'NIPUN' फूल फॅार्म National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy
हे अभियान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (Foundational Literacy and Numeracy) विकसित करण्यासाठी राबवली जाते.
2) PM SHRI Schools :
• पूर्ण नाव: PM Schools for Rising India
• देशभरातील 14500 पेक्षा जास्त शाळांचा अपग्रेडेशन (विकास) करणे.
• या अंतर्गत शाळांना आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन दिले जाते.
• या शाळा 'राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020' च्या अंमलबजावणीसाठी प्रयोगशाळा किंवा 'मॉडेल शाळा' म्हणून काम करतील आणि इतर शाळांना मार्गदर्शन करतील.
3) राज्य अभ्यासक्रम आराखडा (State Curriculum Framework) :
• राज्यातील अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार बदलण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात येतो.
👨💻👩💻 तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर :
4) एआय साथी (AI Saathi for Educators)-
• शिक्षकांना पाठाचे नियोजन (Lesson Planning) आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन (Assessment) सोपे व्हावे, यासाठी महाराष्ट्रात विकसित करण्यात आलेल्या 'एआय साथी' या AI-आधारित साधनाचे मंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
5) डिजिटल प्लॅटफॉर्म :
• रिअल-टाइम डेटा यंत्रणा (Real-time data systems) आणि डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मच्या प्रभावी वापरावर बैठकीत भर देण्यात आला.
👷♀️ व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणावर भर (Vocational Focus) :
6) स्किल्स ऑन व्हील्स (Skills on Wheels) -
• दुर्गम आणि शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्याचे प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी 'स्किल्स ऑन व्हील्स' (फिरती कौशल्य प्रयोगशाळा) या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
7) विकसित भारत 2047 -
• महाराष्ट्राने डिजिटल आणि व्यावसायिक शिक्षणात राबवलेले सर्वोत्तम उपक्रम (Best Practices) इतर राज्यांसोबत शेअर करावेत, जेणेकरून 2047 च्या 'विकसित भारत' चे ध्येय साध्य करणे सोपे होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
आढावा बैठक → राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंमलबजावणी
ठिकाण → राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाल (SCERT), पुणे
महत्त्वाचे उपक्रम → निपुण महाराष्ट्र अभियान, PM SHRI Schools, एआय साथी
“Skills on Wheels” उपक्रम → दुर्गम आणि शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्याचे प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी
अंतिम उद्दिष्ट → विकसित भारत 2047 साठी डिजिटल व कौशल्याधारित शिक्षण मजबूत करणे


















