
चालू घडामोडी | सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर तात्काळ नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले
Supreme Court warns of strict action against illegal sand mining in the National Chambal Gharial Sanctuary
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर तात्काळ नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले तर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तीन राज्यांत पसरलेले आहे ?
- राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश
- उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड
- हरियाणा, पंजाब, राजस्थान
उत्तर : राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
📰 बातमी काय ?
• सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर (Illegal Sand Mining) तात्काळ नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले आहेत.
🧐 बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे काय नुकसान होते ?
• अधिवासाचा ऱ्हास (Habitat Degradation) - घडियाल (एक प्रकारची मगर) वाळूच्या किनाऱ्यावर अंडी घालतात. वाळू उपसल्याने ही ठिकाणे नष्ट होत आहेत.
• नदी प्रवाह बदलतो - अत्याधिक उत्खननामुळे नदीची नैसर्गिक रचना बदलते.
• जैवविविधतेला धोका - डॉल्फिन, कासव, मासे आणि पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होतो.
✍️ सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश (Enforcement Measures) :
👉 वाळू उपसा रोखण्यासाठी राज्यांना खालील तांत्रिक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत:
• CCTV देखरेख आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे GPS ट्रॅकिंग करण्यास
• तसेच तिन्ही राज्यांची संयुक्त गस्त (Joint Patrols) करण्यास सांगितले आहे.
• कडक अंमलबजावणी न झाल्यास तेथे निमलष्करी दल (Paramilitary Forces) तैनात केले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

🐊राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्य : महत्त्वाचे मुद्दे (Key Facts)
विस्तार आणि भौगोलिक स्थान -
1) राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्य हे भारतातील पहिले आणि एकमेव त्रि-राज्य संरक्षित क्षेत्र (Tri-state Protected Area आहे, जे राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये पसरलेले आहे.
2) व्याप्ती - चंबळ नदीच्या 600 km लांबीच्या पट्ट्यात सुमारे 5,400 sq km क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे.
चंबळ ही भारतातील सर्वात स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नद्यांपैकी एक मानली जाते.
3) परिसंस्था - हे अभयारण्य नदीच्या खोल पात्रांचे (Lotic ecosystem), वाळूचे पट्टे आणि चंबळच्या खोऱ्यांसाठी (Ravines/Beehad) प्रसिद्ध आहे.
🌳 जैवविविधता आणि महत्त्वाच्या प्रजाती :
• घडियाल (Gharial): जगातील एकूण घडियाल लोकसंख्येच्या सुमारे 90% घडियाल याच अभयारण्यात आढळतात.
• गंगा डॉल्फिन (Ganges River Dolphin): गंगा डॉल्फिन या अतिशय दुर्मिळ प्रजातीचे हे महत्त्वाचे निवासस्थान आहे.
• इतर प्रजाती : दलदलीतील मगर (Marsh crocodile), लाल मुकुट असलेला कासव (Red-crowned roof turtle), स्मूथ-कोटीड ऑटर , इंडियन स्किमर (पक्षी) आणि पक्षांच्या 330 पेक्षा जास्त प्रजातींसाठी हे महत्त्वाचे निवासस्थान आहे.
🤔 प्रकल्प, संवर्धन दर्जा आणि धोके :
• प्रकल्प - राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्य 1975 मध्ये सुरू झालेल्या 'प्रोजेक्ट क्रोकोडाईल' (Project Crocodile) चा एक महत्त्वाचा भाग आहे.
• आंतरराष्ट्रीय महत्त्व - राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्य हे एक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (Important Bird Area) असून, युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळ आणि रामसर स्थळासाठी (Ramsar Site) प्रस्तावित आहे.
• धोके - बेकायदेशीर वाळू उपसामुळे नदीच्या परिसंस्थेचे नुकसान होत आहे, ज्यामुळे घडियाल आणि डॉल्फिनच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : राष्ट्रीय चंबळ घडियाल अभयारण्य
• विस्तार → राजस्थान + मध्य प्रदेश + उत्तर प्रदेश
• भारतातील पहिले त्रिराज्यीय संरक्षित क्षेत्र
• मुख्य नदी → चंबळ नदी
• मुख्य प्रजाती → घडियाल
• जगातील सुमारे 90% वन्य घडियाल येथे आढळतात
• संबंधित प्रकल्प → Project Crocodile (1975)
• प्रमुख धोका → बेकायदेशीर वाळू उत्खनन


















