
चालू घडामोडी | ‘नशा मुक्त भारत अभियान 2.0’ अॅप
Nasha Mukt Bharat Abhiyaan (NMBA) 2.0 App
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे चर्चेत असलेले ‘नशा मुक्त भारत अभियान (NMBA) 2.0 App’ कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ?
1. गृह मंत्रालय
2. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय
3. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
4. शिक्षण मंत्रालय
उत्तर : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय
📰 बातमी काय ?
• केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने (Ministry of Social Justice and Empowerment) देशातील अंमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'नशा मुक्त भारत अभियान (NMBA) 2.0' या अद्ययावत अॅपचा सुरू केले.
🧐 नशा मुक्त भारत अभियान (NMBA) 2.0 App नेमकं काय आहे ?
• NMBA 2.0 App हे ‘नशा मुक्त भारत अभियान’ (Nasha Mukt Bharat Abhiyaan) अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी तयार केलेले केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
• हे ॲप National Action Plan for Drug Demand Reduction (NAPDDR) अंतर्गत अमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती मोहिमेचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, रिपोर्टिंग आणि समन्वय सुधारण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
• मुख्य उद्देश - याचा मुख्य उद्देश अमली पदार्थांच्या मागणीमध्ये घट (Drug Demand Reduction) करणे, व्यसनमुक्ती सेवा सुलभ करणे आणि अभियानाचे रिअल-टाइम निरीक्षण (Real-Time Monitoring) मजबूत करणे हा आहे.
🎯 नशा मुक्त भारत अभियान (NMBA) 2.0 App का महत्त्वाचे आहे ? / वैशिष्ट्ये (Key Features) :
1) e-Pledge (ई-शपथ) -
सामान्य नागरिक अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सामील होण्यासाठी अॅपद्वारे थेट डिजिटल शपथ घेऊ शकतात.
2) 'नशा मुक्ती मित्र' नोंदणी -
या मोहिमेत जो नागरिक स्वयंसेवक म्हणून काम करेल, त्याला अॅपद्वारे 'नशा मुक्ती मित्र' म्हणून डिजिटल प्रमाणपत्र आणि बॅज दिला जाईल.
3) रिअल-टाइम मॉनिटरिंग मजबूत होणार -
पूर्वी माहिती संकलन व अहवाल प्रक्रियेला वेळ लागत होता.
आता संस्थांना तत्काळ माहिती अपलोड करता येईल, त्यामुळे कामकाजावर प्रभावी नियंत्रण राहील.
4) अनुदान ट्रॅकर (Anudan Tracking) -
व्यसनमुक्ती केंद्रांना (GIAs - Grant-in-Aid Institutions) मिळणाऱ्या सरकारी निधीचे (अनुदानाचे) रिअल-टाइम ट्रॅकिंग या अॅपद्वारे केले जाईल, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि पारदर्शकता येईल.
5) नजीकचे व्यसनमुक्ती केंद्र शोधणे -
युजर्स अॅपमधील जीपीएस (GPS) द्वारे त्यांच्या जवळील अधिकृत व्यसनमुक्ती केंद्र थेट शोधू शकतात.
6) मानसिक आरोग्य सेवांशी जोडणी -
हे हे ॲप National Action Plan for Drug Demand Reduction (NAPDDR) अंतर्गत अमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती मोहिमेचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, रिपोर्टिंग आणि समन्वय सुधारण्यासाठी तयार करण्यात आले आहे.प MANAS हेल्पलाइनसारख्या मानसिक आरोग्य सेवांशी जोडले गेले आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसोबत मानसिक आरोग्य सहाय्यही मिळू शकते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
• 2026 → NMBA 2.0 App लॅान्च
• मंत्रालय → सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय
• संबंधित योजना → NAPDDR (National Action Plan for Drug Demand Reduction)
• मुख्य उद्देश → अमली पदार्थांच्या मागणीत घट व व्यसनमुक्ती
• महत्त्वाचे फीचर → e-Pledge, 'नशा मुक्ती मित्र' नोंदणी, हेल्पलाइन, नजीकचे व्यसनमुक्ती केंद्र शोधणे, रिअल-टाइम मॉनिटरिंग
• मानसिक आरोग्य जोडणी → MANAS Support Services

























