
चालू घडामोडी | ऑरेंज इकॉनॉमी : भारताचे नवीन डिजिटल आर्थिक मॉडेल
What is Orange Economy ?
📚 Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच आर्थिक जगतात चर्चेत आलेली 'ऑरेंज इकॉनॉमी' (Orange Economy) ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
- संत्रा आणि लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन व आंतरराष्ट्रीय निर्यात
- पेट्रोल आणि डिझेलचे साठे व त्यांचे इंधन व्यवस्थापन
- सर्जनशीलता, संस्कृती, ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंट निर्मिती
- जैविक शेती आणि ग्रामीण भागातील सिंचन पद्धती
उत्तर : सर्जनशीलता, संस्कृती, ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंट निर्मिती
📰 बातमी काय ?
• भारत अलीकडे ऑरेंज इकॉनॉमी (Orange Economy) वर भर देत आहे.
• यामध्ये सर्जनशीलता (Creativity), संस्कृती (Culture) आणि Content Creation यांना आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू बनवले जात आहे.
🍊 ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय ?
(What is Orange Economy?)
1) व्याख्या - 'ऑरेंज इकॉनॉमी' म्हणजे अशी अर्थव्यवस्था जी पूर्णपणे मानवी सर्जनशीलता (Creativity), संस्कृती (Culture), कला आणि बौद्धिक संपदेवर (Intellectual Property - IP) आधारित असते.
• याला जागतिक स्तरावर 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी' (Creative Economy) असेही म्हणतात.
2) रंगाचा संदर्भ - या संकल्पनेत 'ऑरेंज' (नारंगी) रंग वापरला जातो, कारण जागतिक संस्कृतीत नारंगी रंग हा सर्जनशीलता, नावीन्य आणि संस्कृतीचे प्रतीक मानला जातो.
3) मुख्य गाभा - देशातील कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाचे व्यापारीकरण (Monetization) करून त्याचे जागतिक स्तरावर नफा मिळवून देणाऱ्या उद्योगात रूपांतर करणे.
🎭 ऑरेंज इकॉनॉमी मध्ये समाविष्ट असणारी प्रमुख क्षेत्रे कोणती ?
(Key Sectors Included):
• चित्रपट आणि संगीत निर्मिती (Film & Music)
• ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स (Animation & VFX)
• ऑनलाईन गेमिंग (Online Gaming)
• फॅशन आणि डिझायनिंग (Fashion & Design)
• डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया कंटेंट (Digital & Social Media Content)
• अमूर्त सांस्कृतिक वारसा आणि हस्तकला (Cultural Heritage & Crafts)
💡 उदाहरणावरून समजून घेऊया :
1)चित्रपट व व्हीएफएक्स - भारताचा 'RRR' चित्रपट किंवा 'बाहुबली' सिरीज. या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर जागतिक स्तरावर भारताच्या संस्कृतीचे ब्रँडिंग करून कोट्यवधी रुपयांची परदेशी कमाई (Foreign Exchange) करून दिली. या प्रक्रियेला 'ऑरेंज इकॉनॉमी' म्हणतात.
2) कंटेंट क्रिएशन - भारतातील एखादा तरुण युट्युबवर (YouTube) विज्ञानाची किंवा भारतीय इतिहासाची माहिती देणारा डिजिटल कंटेंट तयार करतो.
त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या व्हिडिओजच्या माध्यमातून मिळणारी जाहिरातींची कमाई आणि त्यातून निर्माण होणारे रोजगार हे ऑरेंज इकॉनॉमीचे थेट उदाहरण आहे
📊 अधिकृत सरकारी व जागतिक आकडेवारी (Authentic Data & Statistics):
MPSC/UPSC मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनात (Mains Value Addition) हे आकडे वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत:
1) इंटरनेट क्रांती : भारतामध्ये सध्या 1.028 Billion (102.8 कोटी) पेक्षा जास्त इंटरनेट ग्राहक (Internet Subscribers) आहेत.
या मोठ्या डिजिटल व्याप्तीमुळे भारत जगातील सर्वात मोठी डिजिटल मनोरंजनाची बाजारपेठ बनला आहे.
2) गेमिंग क्षेत्रातील महासत्ता - सुमारे ४२.५ कोटी सक्रिय गेमर्ससह भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ऑनलाईन गेमिंग बाजार आहे.
आर्थिक वर्ष FY23 मध्ये या क्षेत्राची उलाढाल 16,428 कोटी रुपयांवर पोहोचली असून याचा वार्षिक वाढीचा दर (CAGR) 28% आहे.
3) क्रिएटर्सचा प्रभाव - भारतात सध्या २० ते २५ लाख सक्रिय कंटेंट क्रिएटर्स आहेत. हे
हे क्रिएटर्स देशातील $350 Billion ते $400 Billion (30 लाख कोटी ते 34 लाख कोटी रुपये) च्या ग्राहक खरेदीवर (Consumer Spending) प्रभाव पाडतात.
हा प्रभाव वर्ष 2030 पर्यंत $1 Trillion (85 लाख कोटी रुपये) वर पोहोचण्याचा अंदाज आहे.
4) GDP मधील योगदान- एका अधिकृत अहवालानुसार, एकट्या युट्यूब (YouTube) च्या क्रिएटिव्ह इकोसिस्टमने वर्ष 2024 मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये 16,000 कोटी रुपयां पेक्षा जास्त योगदान दिले आहे.
या एकाच प्लॅटफॉर्ममुळे भारतात 930,000 पूर्णवेळ रोजगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठबळ मिळाले आहे.
🚀 भारतासाठी या अर्थव्यवस्थेचे महत्त्व (Significance for India):
1)बौद्धिक संपदा निर्मिती (Intellectual Property - IP):
भारताकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा, कथा आणि लोककला आहेत.
ऑरेंज इकॉनॉमीच्या माध्यमातून या कथांचे जागतिक स्तरावर पेटंट किंवा कॉपीराईट करून 'ग्लोबल बौद्धिक संपदा' तयार करता येऊ शकते.
2) सॉफ्ट पॉवर (Soft Power) वाढवणे:
ज्याप्रमाणे अमेरिकेने हॉलिवूडच्या माध्यमातून आणि दक्षिण कोरियाने 'के-पॉप' (K-Pop) संगीताच्या माध्यमातून जगात आपली 'सॉफ्ट पॉवर' मजबूत केली आहे, त्याचप्रमाणे भारत आपल्या डिजिटल आणि सांस्कृतिक कंटेंटच्या जोरावर जागतिक पटलावर आपला प्रभाव वाढवू शकतो.
3) रोजगार निर्मिती:
या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि कलात्मक रोजगारांच्या (उदा. व्हिडिओ एडिटर्स, ॲनिमेटर्स, डिझायनर्स) संधी उपलब्ध होतात, जे पारंपारिक नोकऱ्यांपेक्षा वेगळ्या आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Orange Economy
• ऑरेंज इकॉनॉमी → Creativity + Culture + Intellectual Property (IP) आधारित अर्थव्यवस्था
• संबंधित क्षेत्रे → Film, Animation, VFX, Gaming, Fashion, Digital Media
• इंटरनेट सदस्य (भारत) → 1.028 अब्ज+
• गेमिंग मार्केट → भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची गेमिंग बाजारपेठ
• Gaming Industry (FY23) → ₹16,428 कोटी
• YouTube GDP योगदान (2024) → ₹16,000 कोटी+























