
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय कामगार दिन

International Workers’ Day
📚 Subject : GS - दिनविशेष, इतिहास - कामगार चळवळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो ?
1. 14 एप्रिल
2. 1 मे
3. 15 ऑगस्ट
4. 2 ऑक्टोबर
उत्तर : 1 मे
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 1 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
• हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्ष, बलिदान आणि मिळालेल्या अधिकारांच्या स्मरणार्थ पाळला जातो.
या दिवसाला International Workers’ Day / Labour Day / May Day असेही म्हणतात.
🧐 हेमार्केट घटना (Haymarket Affair) काय आहे ?
• या दिनाचा उगम अमेरिकेतील शिकागो येथील 'हेमार्केट स्क्वेअर' मधील घटनेशी जोडलेला आहे.
• औद्योगिक क्रांतीच्या काळात कामगारांना सुरक्षिततेची कोणतीही हमी नसताना दररोज 10 ते 16 तास काम करावे लागत होते. • याविरोधात '८ तासांचा कामाचा दिवस' असावा या मागणीसाठी कामगारांनी शांततापूर्ण रॅली काढली होती, ज्या दरम्यान बॉम्बफेक झाल्याने हिंसाचार उसळला होता. यात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेला हेमार्केट घटना (Haymarket Affair) म्हटले जाते.

🤔 1 मे हा कामगार दिन कोणी आणि केव्हा घोषित केला ?
• 1889 मध्ये, 'सेकंड इंटरनॅशनल' या जागतिक संघटनेने हेमार्केटमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित केला.
भारतात कामगार दिन प्रथम कधी साजरा करण्यात आला ?
• 🧐 कधी व कुठे - भारतात पहिला कामगार दिन 1 मे 1923 रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे साजरा करण्यात आला.
• 🤝 नेतृत्व - हा कार्यक्रम कम्युनिस्ट नेते आणि 'लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान'चे संस्थापक मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार (Malayapuram Singaravelu Chettiar) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.
• 🚩ऐतिहासिक महत्त्व - 1 मे 1923 च्या या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, भारतात पहिल्यांदाच कामगार आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रतीक असलेला 'लाल झेंडा' (Red Flag) फडकवण्यात आला होता.

🧐 आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• "एक निरोगी मानसिक-सामाजिक कामाचे वातावरण सुनिश्चित करणे" (Ensuring a Healthy Psychosocial Working Environment) ही आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2026 ची संकल्पना आहे.
• महत्त्व - ही थीम कामाच्या ठिकाणी वाढणारा मानसिक ताणतणाव, नैराश्य (Burnout) आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकते. तसेच मालक आणि सरकारांना शारीरिक सुरक्षेसोबतच कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करते.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : आंतरराष्ट्रीय कामगार दिन
• 1 मे → आंतरराष्ट्रीय कामगार दिन
• संदर्भ → अमेरिकेतील शिकागो येथील 'हेमार्केट स्क्वेअर' घटना
• भारतात पहिल्यांदाच साजरा → 1 मे 1923, मद्रास
• नेतृत्व → मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार
• ऐतिहासिक महत्त्व → पहिल्यांदाच 'लाल झेंडा' (Red Flag) फडकवण्यात आला























