
चालू घडामोडी | कोणता देश OPEC आणि OPEC+ संघटनेतून बाहेर पडला ?
UAE's Exit from OPEC and OPEC+
📚 Subject : GS - जागतिक घडामोडी, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणता देश 'OPEC' या आंतरराष्ट्रीय तेल संघटनेचा सदस्य नाही ?
- कतार
- भारत
- सौदी अरेबिया
- इराण
उत्तर : भारत
📰 बातमी काय ?
• संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 1 मे 2026 पासून खनिज तेल उत्पादक देशांची जागतिक संघटना 'OPEC' (Organization of the Petroleum Exporting Countries) आणि व्यापक 'OPEC+' आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
• जागतिक ऊर्जा भू-राजकारणातील (Global Energy Geopolitics) हा एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल मानला जात आहे, ज्यामुळे या तेल कार्टेलच्या (मागणी-पुरवठा नियंत्रित करणारी युती) मक्तेदारीला मोठा धक्का बसू शकतो.
🧐🛢️ OPEC म्हणजे काय ?
• OPEC (Organization of the Petroleum Exporting Countries) ही तेल निर्यात करणाऱ्या देशांची स्थायी आंतर-सरकारी संघटना आहे.
• OPEC ची स्थापना - 1960 मध्ये बगदाद परिषदेत इराण, इराक, कुवेती, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या 5 देशांनी मिळून ओपेकची (OPEC) स्थापना केली होती.
• UAE या संघटनेत 1967 मध्ये सामील झाला होता.
• सध्याची सदस्य संख्या: UAE च्या बाहेर पडल्यानंतर ओपेकमध्ये (OPEC) आता 11 सक्रिय सदस्य उरले आहेत.(अल्जीरिया, काँगो, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला).
• मुख्यालय - व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
✍️ मुख्य उद्देश -
• सदस्य देशांच्या पेट्रोलियम धोरणात समन्वय साधणे
• जागतिक तेल बाजार स्थिर ठेवणे
• तेलाच्या पुरवठा व किंमतींवर नियंत्रण ठेवणे

🤝 OPEC+ काय आहे ?
• स्थापना - 2016 मध्ये ओपेक (OPEC) आणि इतर 10 तेल उत्पादक देशांनी मिळून 'OPEC+' ची स्थापना केली होती.
• अमेरिकेतील 'शेल ऑईल'च्या वाढत्या उत्पादनामुळे घसरणाऱ्या किमती रोखणे हे याचे उद्दिष्ट होते.
• OPEC+ जगातील सुमारे - 40% कच्चे तेल (Crude Oil) उत्पादन करते तसेच 60% आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम व्यापारावर प्रभाव ठेवते.
• OPEC संघटनेच्या बाहेर असणारे, पण OPEC+ या युतीचा भाग असलेले 10 देश -
🤝 रशिया, ओमान, कझाकस्तान, मलेशिया, मेक्सिको, बहरीन, ब्रुनई, अझरबैजान, सुदान, दक्षिण सुदान
🧐 'OPEC' आणि OPEC+ मधून बाहेर पडण्याची UAE ची प्रमुख कारणे कोणती ?
1) उत्पादन कोट्याची मर्यादा (Production Quotas) -
• ओपेकच्या नियमांमुळे देशांना तेल उत्पादनावर मर्यादा पाळाव्या लागतात.
• UAE ची तेल उत्पादन क्षमता मोठी असून त्यांना 2027 पर्यंत दररोज 50 लाख (5 Million) बॅरल उत्पादनाचा टप्पा गाठायचा आहे, ज्यामध्ये ओपेकचे नियम अडथळा ठरत होते.
2) ऊर्जा संक्रमण रणनीती (Energy Transition Strategy) -
• जग हळूहळू अक्षय/अपारंपरिक ऊर्जेकडे (Renewables) वळत आहे, त्यामुळे भविष्यात तेलाची मागणी कमी होण्यापूर्वी उपलब्ध साठ्यातून जास्तीत जास्त महसूल (Revenue) कमावण्याचा UAE चा विचार आहे.
3) भू-राजकीय मर्यादा -
• ओपेकमध्ये इराणसारख्या देशांच्या उपस्थितीमुळे आणि सर्वसंमतीने निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे UAE ला स्वतंत्रपणे जागतिक बाजारातील घडामोडींना प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र धोरण राबवण्यात अडचणी येत होत्या.
🤔 भारतावर होणारा परिणाम (Impact on India)-
• भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे
• UAE ओपेकमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन करणार असल्याने जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढेल.
• पुरवठा वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रित राहण्यास मदत होईल, ज्यामुळे भारताचे आयात बिल कमी होईल आणि देशांतर्गत महागाई रोखण्यास मदत मिळू शकते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स
• 1 मे 2026 → UAE ने OPEC व OPEC+ सोडले
• OPEC स्थापना → 1960, बगदाद परिषद
• संस्थापक देश → इराण, इराक, कुवैत, सौदी अरेबिया, व्हेनेझुएला
• मुख्यालय → व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
• OPEC+ संघटना→ OPEC आणि इतर 10 तेल उत्पादक देश
























