
चालू घडामोडी | कान्स चित्रपट महोत्सवासाठी 2 मराठी चित्रपटांची निवड
2 Marathi films selected for Cannes Film Festival
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मे 2026 मध्ये फ्रान्स येथे झालेल्या प्रतिष्ठित 'कान्स चित्रपट महोत्सवात' महाराष्ट्रातील कोणत्या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली ?
- कन्नी आणि क्रांतिज्योती विद्यालय
- नटसम्राट आणि कट्यार काळजात घुसली
- जीव आणि एप्रिल मे 99
- एक उनाड दिवस आणि क्रांतिज्योती विद्यालय
उत्तर : जीव आणि एप्रिल मे 99
📰 बातमी काय ?
• फ्रांस येथे होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवाच्या (Cannes Film Festival 2026) 'मार्श द फिल्म' (Marché du Film - फिल्म मार्केट) या विभागात 2 मराठी चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे.
• अधिकृत घोषणा - महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी ही माहिती दिली.

🧐 निवड झालेले दोन मराठी चित्रपट कोणते ?
1) जीव (Jeev - The Creature) :
• दिग्दर्शक - या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र जाधव यांनी केले आहे.
• विषय - हा चित्रपट महाराष्ट्रातील कोकणी आदिवासी जमातीच्या (Tribal Konkani Community) परंपरा, चालीरीती आणि संस्कृतीवर आधारित आहे .
2) एप्रिल मे 99 :
• दिग्दर्शक - या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन मापुसकर यांनी केले आहे.
• विषय - हा चित्रपट मैत्री, प्रेमाची पहिली पायरी, स्वतःचा शोध आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील जुन्या आठवणींवर (Nostalgia) आधारित आहे.

🧐 'मार्श द फिल्म' (Marché du Film) म्हणजे काय?
1) स्वरूप: हा कान्स चित्रपट महोत्सवाचा एक भाग असून, हा जगातील सर्वात मोठा चित्रपट बाजार (Film Market) मानला जातो.
2) व्यावसायिक मंच: ज्याप्रमाणे बाजारामध्ये वस्तूंची खरेदी-विक्री होते, अगदी त्याचप्रमाणे या मंचावर जगभरातील चित्रपटांची खरेदी-विक्री होते.
3) चित्रपटांचे सौदे - येथे जगभरातून आलेले चित्रपट निर्माते (Producers), दिग्दर्शक (Directors), वितरक (Distributors) आणि खरेदीदार (Buyers) एकत्र येतात.
ते आपले चित्रपट वेगवेगळ्या देशांतील सिनेमागृहात किंवा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी व्यावसायिक करार (Business Deals) करतात.
4) याचे महत्त्व काय आहे ? :
नवे चित्रपट दाखवणे (Screening) - ज्या चित्रपटांचे काम अजून पूर्ण झालेले नाही किंवा जे नुकतेच तयार झाले आहेत, अशा चित्रपटांचे खास शो (Screening) येथे केवळ चित्रपट उद्योगातील लोकांसाठी आयोजित केले जातात.
निधी मिळवणे (Funding) - नवीन चित्रपटांसाठी जगभरातून पैसा (फायनान्स) उभा करण्यासाठी हा मंच सर्वोत्तम मानला जातो.
✍️ मराठी चित्रपटांच्या निवडीचे प्रमुख महत्त्व (Significance) :
1) जागतिक व्यासपीठ - मराठी चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला थेट जागतिक पातळीवर (Global Platform) हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
2) आदिवासी संस्कृतीचे दर्शन - 'जीव' चित्रपटामुळे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील कोकणी जमातीची जीवनपद्धती जगासमोर येणार आहे.
3) सांस्कृतिक विकास - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक महामंडळाच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश मानले जात आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• महोत्सवाचे नाव कान्स चित्रपट महोत्सव 2026 (स्थान: फ्रांस)
• विभागाचे नाव 'मार्श द फिल्म' (Marché du Film - जगातील सर्वात मोठे फिल्म मार्केट).
• निवडलेले चित्रपट - 1) जीव 2) एप्रिल मे 99
• 'जीव' चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र जाधव.
• 'एप्रिल मे 99' चे दिग्दर्शक रोहन मापुस्कर.























