
चालू घडामोडी | रु-सोम : स्वदेशी अभियांत्रिकी वारसा
Ru-Soam : Indigenous Engineering Heritage
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच चर्चेत आलेली 'रु-सोम' (Ru-Soam) ही पारंपरिक बांबू पूल निर्मितीची अभियांत्रिकी पद्धत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आदिवासी समुदायाशी संबंधित आहे ?
- आसाम
- केरळ
- सिक्कीम
- नागालँड
उत्तर : सिक्कीम
📰 बातमी काय ?
• युनेस्को (UNESCO) आणि सिक्कीम सरकारने संयुक्तपणे सिक्कीममधील 'लेपचा' (Lepcha) समुदायाच्या 'रु-सोम' (Ru-Soam) या पारंपारिक आणि स्वदेशी अभियांत्रिकी पद्धतीचे पद्धतशीर दस्तऐवजीकरण (Documentation) करण्यासाठी भागीदारी केली आहे.
🧐 'रु-सोम' अभियांत्रिकी म्हणजे काय?
🧐 What is Ru-Soam?
1) स्वरूप - 'रु-सोम' म्हणजे सिक्कीममधील लेपचा समुदायाद्वारे स्थानिक पातळीवर उपलब्ध बांबू आणि वेताचा (Cane and Bamboo) वापर करून तयार केलेले पारंपारिक पूल (Footbridges) होय.
2) उगम - या अभियांत्रिकीचा उगम दुर्गम 'झोंगु' (Dzongu) प्रदेशातील प्राचीन रहिवासी असलेल्या लेपचा लोकांकडून झाला आहे.
3) ठिकाण - हे पूल प्रामुख्याने सिक्कीममधील 'कांचनजंगा बायोस्फीअर रिझर्व्ह' (Khangchendzonga Biosphere Reserve) परिसरात पाहायला मिळतात
4) उद्देश: या पुलांमागील पर्यावरणीय आणि अभियांत्रिकी तत्वांचा अभ्यास करून, हवामान बदलाच्या काळात आपत्ती-प्रवण भागात अशा प्रकारच्या लवचिक पायाभूत सुविधांचा वापर कसा करता येईल, हे तपासणे.

🌴'रु-सोम' पुलांची वैशिष्ट्ये (Structural Features):
1) हरित पोलाद (Green Steel) -
• हे पूल पूर्णपणे स्थानिक वेत आणि 'महलू' व 'पॉडियांग' नावाच्या बांबूच्या प्रजातींपासून बनवले जातात.
• बांबूची ताणण्याची क्षमता (Tensile Strength) खूप जास्त असल्याने त्याला 'हरित पोलाद' म्हटले जाते.
2) आधुनिक सिद्धांतावर आधारित -
• हे पूल सिमेंट, लोखंड किंवा काँक्रीटचा वापर न करता हुबेहूब आधुनिक सस्पेन्शन ब्रिज (लटकते पूल) सारखे काम करतात.
3) क्षमता -
• हे पूल 100 मीटर लांबीपर्यंत पसरू शकतात आणि एकाच वेळी 2 ते 3 लोकांचे वजन सहज पेलू शकतात.
⛳️ 'रु-सोम' पुलाचे प्रमुख भाग :
1) सोमग्यांग (Soamgyang) -
• पुलाच्या दोन्ही बाजूला असणारे मोठे वेत, जे मुख्य केबलसारखे वजन पेलतात आणि दोन्ही काठांवरील मोठ्या झाडांना बांधलेले असतात.
2) अहुल (Ahool) -
• मुख्य केबल आणि चालण्याच्या भागाला जोडणारे वेताचे लूप्स.
3) सोमगुर (Soamgur):
• बांबूपासून बनवलेली चालण्याची मुख्य जागा (Deck)
🎋 'रु-सोम' पुल बांधणी पद्धतीचे महत्त्व (Significance) :
1) शून्य कार्बन उत्सर्जन -
• सिमेंट आणि स्टीलच्या तुलनेत बांबू आणि वेतामुळे निसर्गाला कोणतीही हानी पोहोचत नाही. तसेच बांबू अवघ्या 3 ते 5 वर्षांत पुन्हा उगवतो.
2) भूकंप रोधक -
• हे पूल वजनाने हलके आणि अत्यंत लवचिक असतात. त्यामुळे भूकंपाचे धक्के (Seismic Waves) बसल्यावर सिमेंटचे पूल कोसळतात, परंतु बांबूचे पूल न तुटता केवळ हेलकावे घेतात
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• रु-सोम (Ru-Soam) - सिक्कीममधील पारंपारिक बांबू आणि वेताचे पूल
• भागीदारी - युनेस्को (UNESCO) आणि सिक्कीम सरकार.
• संबंधित समुदाय - लेपचा (Lepcha) आदिवासी समुदाय.
• बांबूला दिलेली उपमा - 'ग्रीन स्टील'
• पर्यावरणीय फायदा - हलक्या व लवचिक स्वरूपामुळे भूकंप रोधक आणि पर्यावरणपूरक















