
चालू घडामोडी | 🌳 'कावू रोपवाटिका' म्हणजे काय ?
Kavu Nurseries
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतीच जैवविविधता पुनरुज्जीवनासाठी 'कावू रोपवाटिका' (Kavu Nurseries) ही विशेष मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
1. महाराष्ट्र
2. कर्नाटक
3. केरळ
4. तामिळनाडू
उत्तर : केरळ
📰 बातमी काय ?
• केरळ सरकारने राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये 'कावू' (Kavu) म्हणजेच तिथल्या पारंपारिक पवित्र वनांचे (Sacred Groves) पुनरुज्जीवन करण्यासाठी एका प्रायोगिक कार्यक्रमांतर्गत 'कावू रोपवाटिका' (Kavu Nurseries) उपक्रम सुरू केला आहे.
🌳 'कावू रोपवाटिका' म्हणजे काय ?
आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे देवाच्या नावाने राखलेली जंगले असतात, ज्यांना आपण 'देवराई' म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे केरलमध्ये त्यांना 'कावू' (Kavu) म्हटले जाते.
उद्देश - या रोपवाटिकांच्या माध्यमातून स्थानिक, दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींची पैदास करून ती पुन्हा या देवरायांमध्ये लावली जातील.
🌳 'कावू' रोपवाटिकांची मुख्य वैशिष्ट्ये (Key Features) :
1) स्थानिक प्रजातींचे संवर्धन -
या देवरायांमध्ये आढळणाऱ्या 100 पेक्षा जास्त स्थानिक आणि औषधी वनस्पतींच्या प्रजातींची लागवड केली जाईल.
पहिल्या टप्प्यात खराब झालेल्या किंवा नष्ट झालेल्या देवरायांमध्ये लावण्यासाठी अंदाजे 3,000 पेक्षा जास्त रोपे (Saplings) तयार करण्याचे नियोजन आहे.
2) परदेशी वनस्पतींवर नियंत्रण -
देवरायांमध्ये वाढलेली तण किंवा उपद्रवी परदेशी वनस्पती (Invasive Species) काढून टाकून तिथे मूळ भारतीय पर्यावरणपूरक झाडे लावली जातील.
3) लोकसहभाग (Community-Based) -
या योजनेचे नियंत्रण स्थानिक 'जैवविविधता व्यवस्थापन समित्या' (Biodiversity Management Committees - BMC) करणार आहेत, ज्यामुळे स्थानिक लोकांचा सहभाग वाढेल.
'कावू रोपवाटिका' या उपक्रमाचे महत्त्व (Significance) :
जैवविविधतेचे रक्षण - या पारंपारिक वनांमुळे अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींचे रक्षण होते.
पर्यावरणीय फायदा - देवरायांमुळे जमिनीची सुपीकता वाढते, भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि स्थानिक हवामान (Micro-climate) नियंत्रित राहते.
सांस्कृतिक वारसा - यामुळे निसर्ग पूजेची जुनी संस्कृती आणि आधुनिक विज्ञानाचा ताळमेळ साधला जातो.
✍️ देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये देवराईला वेगवेगळी नावे आहेत, (ज्यावर स्पर्धा परीक्षेत जोड्या लावा किंवा थेट प्रश्न विचारले जातात:)
• केरल: कावू (Kavu)
• महाराष्ट्र: देवराई / राई
• कर्नाटक: देवराकाडू (Devarakadu) किंवा 'कान'
• राजस्थान: ओरण (Oran)

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• कावू (Kavu) - केरळ राज्यातील पारंपारिक 'देवराई'
• कावू रोपवाटिका - देवराईतील स्थानिक आणि दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी सुरू झालेली विशेष रोपवाटिका.
• प्रमुख कार्य - 100 हून अधिक स्थानिक प्रजातींचे संवर्धन आणि सुमारे 3000 रोपांची पुनर्लागवड.
• पर्यावरणीय महत्त्व - आक्रमक प्रजातींचे नियंत्रण, जलसंधारण आणि सूक्ष्म-हवामान स्थिरता.
• व्यवस्थापन - लोकसहभागातून अंमलबजावणी.



















