
चालू घडामोडी | PaRRVA एजन्सी म्हणजे काय ?
What is PaRRVA Agency ?
📚 Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वित्तीय बाजारातील फसव्या जाहिराती आणि परताव्याचे खोटे दावे रोखण्यासाठी 'सेबी' (SEBI) ने मे 2026 मध्ये खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली आहे ?
- IRDAI
- AMFI
- SIDBI
- PaRRVA
उत्तर : PaRRVA (Past Risk and Return Verification Agency)
📰 बातमी काय ?
• भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ने PaRRVA (Past Risk and Return Verification Agency) ही नवीन एजन्सी 4 मे 2026 पासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली आहे.
• एका यशस्वी प्रायोगिक तत्त्वावरील (Pilot Phase) चाचणीनंतर ही यंत्रणा पूर्णपणे लागू करण्यात आली आहे.
🧐 PaRRVA म्हणजे नेमके काय ?
1) एजन्सीचे नाव -
• PaRRVA - Past Risk and Return Verification Agency (मागील जोखीम आणि परतावा पडताळणी संस्था).
2) कोणी सुरू केली ? -
• ही एजन्सी Securities and Exchange Board of India (SEBI) या भारताच्या शेअर बाजार नियंत्रक संस्थेने सुरू केली आहे.
3) कामाचे स्वरूप -
• शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी "आम्ही भूतकाळात एवढा परतावा (Return) दिला" असे मोठे दावे करतात.
• उदा. — “आमच्या सल्ल्याने 50% Return मिळाला” असे दावे केले जात, पण त्यांची सत्यता पडताळणे कठीण होते.
या दाव्यांची सत्यता आणि पडताळणी (Verification) करण्याचे काम PaRRVA ही एजन्सी करेल.
4) अधिकृत संस्था -
• सेबीने 'केअर रेटिंग्स लिमिटेड' (CARE Ratings Limited) या संस्थेला अधिकृत 'PaRRVA एजन्सी' म्हणून मान्यता दिली आहे.
5) डेटा सेंटर -
• राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange - NSE) हा या एजन्सीचे मुख्य डेटा सेंटर (PaRRVA Data Centre - PDC) म्हणून काम करेल.
🎯 PaRRVA एजन्सीची मुख्य वैशिष्ट्ये (Key Features) :
1) पडताळणीची व्याप्ती (Scope) -
• ही एजन्सी प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी (गुंतवणूक सल्लागार), रिसर्च सर्व्हिस (संशोधन सेवा) आणि अल्गोरिदमिक ट्रेडिंग (Algorithmic Trading) करणाऱ्या संस्थांच्या दाव्यांची पडताळणी करेल.
2) जाहिरातींमध्ये वापर -
• शेअर बाजारातील मध्यस्थ संस्थांना आता त्यांच्या जाहिरातींमध्ये केवळ PaRRVA एजन्सीने पडताळलेला (Verified) डेटाच वापरता येईल.
• यामुळे खोट्या किंवा वाढवून सांगितलेल्या जाहिरातींवर बंदी येईल.
3) प्रमाणित डेटा -
• सर्व आर्थिक संस्थांना त्यांचा परतावा दाखवण्यासाठी आता एकच प्रमाणित आणि विश्वासार्ह फॉरमॅट वापरावा लागेल.
🤔 PaRRVA या एजन्सीचे महत्त्व (Significance) काय ?
1) गुंतवणूकदारांचे संरक्षण -
• सामान्य नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना आता कोणत्याही फसवणुकीशिवाय अधिकृत आणि खरी माहिती मिळेल, ज्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेता येईल.
2) पारदर्शकता -
• आर्थिक बाजारातील खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना चाप बसेल आणि बाजारातील मध्यस्थांची जबाबदारी (Accountability) निश्चित होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• PaRRVA लॅान्च → 4 मे 2026
• पूर्ण नाव → Past Risk and Return Verification Agency
• सुरू करणारी संस्था → SEBI
• उद्देश → वित्तीय बाजारातील फसव्या जाहिराती आणि परताव्यांची पडताळणी



















