
चालू घडामोडी | वाडिनार जहाज दुरुस्ती सुविधेला मंजुरी
Cabinet approves Ship Repair Facility at Vadinar
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने मे 2026 मध्ये 1,570 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक 'जहाज दुरुस्ती सुविधेला' (Ship Repair Facility) मंजुरी दिली आहे, हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जात आहे ?
- महाराष्ट्र
- गुजरात
- केरल
- तामिळनाडू
उत्तर : गुजरात
बातमी काय ?
• केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA - Cabinet Committee on Economic Affairs) गुजरातच्या वाडिनार (Vadinar) येथे एका अत्याधुनिक 'जहाज दुरुस्ती केंद्राच्या' (Ship Repair Facility) उभारणीला मंजुरी दिली आहे.

🧐 वाडिनार जहाज दुरुस्ती केंद्र बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
1) स्वरूप - हा एक उच्च क्षमतेचा 'ब्राउनफिल्ड' सागरी पायाभूत सुविधा प्रकल्प (Brownfield Maritime Project) आहे.
याद्वारे मोठ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या (Foreign-flagged) जहाजांना जागतिक दर्जाची दुरुस्ती सेवा दिली जाईल.
• 'ब्राउनफिल्ड' (Brownfield) सागरी प्रकल्प म्हणजे आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या बंदरांचा किंवा सागरी पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करणे होय.
2) स्थान आणि भौगोलिक फायदा - हा प्रकल्प गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवरील 'वाडिनार' (Vadinar) येथे उभारला जात आहे.
• हा भाग मुंद्रा आणि कांडला या प्रमुख बंदरांच्या आणि मुख्य सागरी व्यापारी मार्गांच्या जवळ आहे.
• तसेच येथे मोठ्या जहाजांसाठी आवश्यक असलेला नैसर्गिक खोल ड्राफ्ट (Natural Deep Draft) उपलब्ध आहे.
3) भागीदारी - हा प्रकल्प दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी (DPA) आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) यांच्यातील धोरणात्मक सहकार्यातून साकारला जात आहे.
4) गुंतवणूक - या भव्य प्रकल्पासाठी 1,570 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, याद्वारे मोठ्या व्यावसायिक जहाजांची देशांतर्गत दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
5) उद्दिष्ट - 300 मीटरपर्यंत लांबी असलेल्या अवाढव्य जहाजांना भारतातच दुरुस्तीची सोय उपलब्ध करून देऊन भारताला जागतिक स्तरावर 'शिप-रिपेअर हब' बनवणे हे याचे मुख्य ध्येय आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features) :
1) पायाभूत सुविधा - या केंद्रात 650 मीटर लांबीची जेट्टी (Jetty), आधुनिक कार्यशाळा (Workshops) आणि विशेष सागरी पायाभूत सुविधा असतील.
2) फ्लोटिंग ड्राय डॉक्स (Floating Dry Docks) - यामध्ये दोन मोठे तरंगते ड्राय डॉक्स समाविष्ट असतील, जे सध्याच्या २३० मीटरच्या देशांतर्गत मर्यादेपेक्षा मोठ्या जहाजांची दुरुस्ती हाताळण्यास सक्षम असतील.
3) MSME क्षेत्राला चालना - या प्रकल्पामुळे गुजरात परिसरातील सागरी क्षेत्राशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSMEs) वाढीला मोठी गती मिळेल.
4) दूरदृष्टी (Vision) - हा प्रकल्प भारत सरकारच्या 'मॅरिटाईम इंडिया व्हिजन 2030' आणि 'मॅरिटाईम अमृत काळ व्हिजन 2047' च्या उद्दिष्टांशी जोडलेला आहे.
🎯 या प्रकल्पाचे महत्त्व (Significance) :
1) परकीय चलनाची बचत - सध्या भारतातील मोठ्या जहाजांच्या मालकांना दुरुस्ती आणि देखभालीसाठी जहाजे परदेशात पाठवावी लागतात.
• वाढिनार या केंद्रामुळे परकीय चलनाची होणारी घसरण (Foreign Exchange Outflow) थांबेल आणि दुरुस्तीचा खर्च कमालीचा कमी होईल.
2) रोजगार निर्मिती - या प्रकल्पामुळे थेट 290 जणांना, तर लॉजिस्टिक्स आणि जहाज दुरुस्ती क्षेत्रातील पूरक उद्योगांमध्ये सुमारे 1.100 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Vadinar Ship Repair Facility
• प्रकल्पाचे नाव → वाडिनार जहाज दुरुस्ती केंद्र
• स्थान → वाढिनार, गुजरात (पश्चिम किनारपट्टी)
• एकूण गुंतवणूक → 1,570 कोटी रुपये
• सहभागी संस्था → दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी (DPA) आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL).
• दुरुस्ती क्षमता → कमाल 300 मीटर लांबीची अवाढव्य व्यावसायिक जहाजे.
• संबंधित धोरण → मॅरिटाईम इंडिया व्हिजन 2030 आणि मॅरिटाईम अमृत काळ व्हिजन 2047.
• आर्थिक फायदा → देशांतर्गत दुरुस्तीमुळे परकीय चलनाची मोठी बचत आणि स्थानिक रोजगार निर्मिती.



















