
चालू घडामोडी | 'ऑपरेशन नेत्रा १.०'

Op Netra 1.0
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय लष्कराने दुर्गम भागातील नागरिकांना प्रगत नेत्र उपचार पुरवण्यासाठी 'ऑपरेशन नेत्रा 1.0' (Op Netra 1.0) चे आयोजन खालीलपैकी कोठे केले होते ?
- लेह, लडाख
- श्रीनगर, जम्मू-काश्मीर
- तवांग, अरुणाचल प्रदेश
- शिमला, हिमाचल प्रदेश
उत्तर : लेह, लडाख
📰 बातमी काय ?
• भारतीय लष्कराने लेह (लडाख) येथे 'ऑपरेशन नेत्रा १.०' (Op Netra 1.0) अंतर्गत ४ दिवसांचे अतिउंचावरील(High-Altitude) नेत्र उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

🧐 'ऑपरेशन नेत्रा 1.0' काय आहे ?
(What is Op Netra 1.0?)
• स्वरूप - हे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेच्या (Director General Armed Forces Medical Services) नेतृत्वाखाली लेह येथील '153 जनरल हॉस्पिटल' मध्ये आयोजित केलेले एक प्रगत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर होते.
• या शिबिरात 950 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, दुर्गम भागातील नागरिकांना प्रगत शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार पुरवण्यात आले.
• उद्दिष्ट - लडाखसारख्या अत्यंत दुर्गम आणि अतिउंचावरील क्षेत्रातील नागरिकांना भौगोलिक अडथळ्यांवर मात करून अत्याधुनिक नेत्ररोग वैद्यकीय सेवा पुरवणे हा याचा मुख्य हेतू होता.
🔍 'ऑपरेशन नेत्रा १.०' चे प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features) :
दुर्गम भागातील पोहोच -
• लडाखच्या 7 जिल्ह्यांमधील रुग्णांनी याचा लाभ घेतला.
• यात चुशुल (Chushul), हानले (Hanle), डेमचोक (Demchok) आणि तुरतुक (Turtuk) या अत्यंत दुर्गम आणि सीमावर्ती भागांतील नागरिकांचा समावेश होता.
विशेष शस्त्रक्रिया -
• शिबिरादरम्यान 214 जणांवर विविध प्रगत उपचार करण्यात आले.
• यामध्ये 197 गुंतागुंतीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgeries) आणि 10 विट्रेओ-रेटिनल (Vitreo-Retinal) उपचारांचा समावेश होता.
प्रगत तंत्रज्ञान -
• 'ग्लुड इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन' आणि 'मिनिमली इन्व्हेसिव्ह ग्लोकोमा सर्जरी' (MIGS) सारख्या अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
स्वदेशी 'Op Netra App' -
• रुग्णांच्या नोंदणीसाठी आणि केस रेकॉर्ड्सच्या व्यवस्थापनासाठी लष्कराने 'Op Netra App' लॉन्च केले.
• यामध्ये क्यूआर कोड-आधारित ओळखीचा (QR code-based identification) आणि संपूर्ण डिजिटल डेटा प्रणालीचा वापर करण्यात आला जेणेकरून रुग्णांचे व्यवस्थापन सुरक्षित व स्वयंचलित होईल.
आंतर-सेवा सहकार्य (Inter-Service Cooperation) -
• भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) या मोहिमेसाठी लागणारी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे विमानाद्वारे लेहच्या दुर्गम भागात पोहोचवून मोठी मदत केली.
🎯 'ऑपरेशन नेत्रा 1.0' या मोहिमेचे महत्त्व :
• दृष्टी पुनर्संचयन - या मोहिमेमुळे पूर्णपणे दृष्टिहीन असलेल्या 15 रुग्णांना त्यांची दृष्टी परत मिळाली, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात मोठा सकारात्मक बदल झाला.
• मोठ्या मोहिमेचा भाग - नोव्हेंबर 2025 पासून भारतीय लष्कराने देशभरात राबवलेल्या मोठ्या वैद्यकीय उपक्रमाचा हा भाग आहे, ज्या अंतर्गत आतापर्यंत 2,500 पेक्षा जास्त यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
• नागरी-लष्करी समन्वय - हा उपक्रम लडाख केंद्रशासित प्रदेशातील लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• ऑपरेशन नेत्रा 1.0 → भारतीय लष्कराद्वारे लेह, (लडाख ) येथे राबवलेले प्रगत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर.
• आयोजन स्थळ → 153 जनरल हॉस्पिटल, लेह (लडाख).
• नेतृत्व → डायरेक्टर जनरल, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS).
• ॲपचे नाव → 'Op Netra App' (डिजिटल रेकॉर्ड आणि QR कोड आधारित ओळख).
• फायदा → 950 रुग्णांची तपासणी, 214 शस्त्रक्रिया आणि 15 दृष्टिहीनांना दृष्टी प्राप्त.















