
चालू घडामोडी | क्लॉड मिथॉस नेमकं काय आहे ?
Claude Mythos
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - सायबर सुरक्षा
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकतेच आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रासाठी सायबर धोक्याचे कारण ठरलेले 'क्लॉड मिथॉस - Claude Mythos' (Claude Mythos) हे प्रगत AI मॉडेल खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले आहे ?
- ओपन एआय (OpenAI)
- गुगल (Google)
- अँथ्रोपिक (Anthropic)
- मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
उत्तर : अँथ्रोपिक (Anthropic)
📰 बातमी काय ?
• भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने (Department of Financial Services) देशातील बँकांना एका नवीन आणि अत्यंत शक्तिशाली AI मॉडेलमुळे निर्माण होणाऱ्या सायबर धोक्यांविषयी (Cyber Security Risks) सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
🧐 धोका काय आहे ?
• 'अँथ्रोपिक मिथॉस' (किंवा क्लॉड मिथॉस - Claude Mythos) नावाचे हे प्रगत AI मॉडेल सॉफ्टवेअरमधील सुप्त त्रुटी (Bugs) शोधण्यात मानवी तज्ज्ञांपेक्षाही अधिक सक्षम आहे.
अँथ्रोपिक मिथॉस (Anthropic Mythos) मॉडेल नेमके काय आहे ?
🧐 कोणी तयार केले ?
• हे अमेरिकेतील प्रसिद्ध 'अँथ्रोपिक' (Anthropic) या आघाडीच्या AI कंपनीने त्यांच्या क्लॉड (Claude AI) सिस्टीम अंतर्गत विकसित केलेले एक अत्याधुनिक एआय मॉडेल आहे.
• हे मॉडेल विशेषतः सायबर सुरक्षेच्या कामांसाठी डिझाइन केलेले आहे.
• जुन्या सॉफ्टवेअर प्रणाल्यांमधील सुप्त त्रुटी (Dormant bugs) आणि त्रुटींचे शोषण (Exploits) शोधण्यात या मॉडेलने मानवी तज्ज्ञांपेक्षाही जास्त क्षमता दाखवली आहे.
⚔️ दुहेरी स्वरूप (Dual-use Technology) -
1) संरक्षक म्हणून - हे मॉडेल सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्याचे काम करू शकते.
2) हॅकर म्हणून - जर हे मॉडेल चुकीच्या किंवा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या हाती लागले, तर ते कोणत्याही बँकेच्या किंवा सरकारी यंत्रणेच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा वापर करून मोठी हॅकिंग (Cyber Attack) करू शकते
🤔 'प्रोजेक्ट ग्लासविंग' (Project Glasswing) काय आहे ?
• प्रोजेक्ट ग्लासविंग हा अँथ्रोपिक मिथॉस (Anthropic Mythos) या मॉडेलचा चुकीचा वापर रोखण्यासाठी अँथ्रोपिक कंपनीने एक मर्यादित मोहीम सुरू केली आहे.
• याअंतर्गत केवळ Amazon, Google, Microsoft, Nvidia आणि Crowdstrike सारख्या जगातील 40 महत्त्वपूर्ण संस्थांनाच याचा अॅक्सेस देण्यात आला आहे, जेणेकरून जागतिक सॉफ्टवेअर सुरक्षित ठेवता येतील.
🧐 बँकिंग क्षेत्रावरील संभाव्य धोके आणि जागतिक चिंता :
✍️ सिस्टेमिक आणि कॅस्केडिंग जोखीम (Cascading Risks) -
• आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक मध्यवर्ती बँकर्सनी या मॉडेलला 'अननोन अननोन' (Unknown Unknown - म्हणजेच ज्याच्या धोक्याचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे असा धोका) म्हणून संबोधले आहे.
• आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालींची सुरक्षा यामुळे धोक्यात येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
⛓️ साखळी पद्धतीचा धोका -
• वित्तीय संस्था एकमेकांशी डिजिटल पद्धतीने जोडलेल्या असल्याने, एका बँकेत झालेली यशस्वी सायबर चोरी जागतिक अर्थव्यवस्थेला साखळी पद्धतीने (Cascading Failure) खिळखिळी करू शकते, ज्यामुळे देशाच्या आर्थिक स्थिरतेला थेट धोका निर्माण होतो.
🇨🇳चीनचे 'किहू 360' (Qihoo 360) काय आहे ?
• चीनने देखील मिथॉस सारखीच स्वतःची AI प्रणाली विकसित केली असून तिचे नाव 'किहू 360' आहे.
• ही एक व्हल्नरेबिलिटी डिस्कव्हरी एजंट (Vulnerability Discovery Agent) प्रणाली असून तिने आतापर्यंत सुमारे 1,000 सॉफ्टवेअर त्रुटी शोधल्याचे अहवाल आहेत, ज्यामुळे जागतिक चिंता वाढली आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• क्लॉड मिथॉस → अँथ्रोपिक कंपनीने सायबर सुरक्षेसाठी विकसित केलेले प्रगत AI मॉडेल.
• IMF ची संज्ञा → या AI मॉडेलला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 'Unknown Unknown' धोका म्हटले आहे.
• Project Glasswing → 'मिथॉस' च्या सुरक्षित वापरासाठी अँथ्रोपिकने प्रमुख 40 जागतिक टेक कंपन्यांसोबत (Google, Microsoft इ.) सुरू केलेला नियंत्रित उपक्रम.






















