
चालू घडामोडी | 'प्रोजेक्ट फ्रीडम'
Project Freedom
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मे 2026 मध्ये हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) इराणची नाकेबंदी उठवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी कोणत्या देशाने/ संघटनेने 'प्रोजेक्ट फ्रीडम' (Project Freedom) सुरू केला होता ?
- भारत
- युनायटेड किंगडम
- अमेरिका
- संयुक्त राष्ट्र संघ
उत्तर : अमेरिका
📰 बातमी काय ?
• अमेरिकेने आपल्या 'प्रोजेक्ट फ्रीडम' (Project Freedom) या लष्करी आणि मानवतावादी मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.
• इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षावर अंतिम तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या राजनैतिक चर्चेला (Diplomatic Negotiations) वाव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
🧐 'प्रोजेक्ट फ्रीडम' काय आहे ?
What is Project Freedom ?
1) स्वरूप -
• इराणने घातलेल्या सागरी कोंडीमुळे (Blockade) हॉरमुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) अडकलेल्या हजारो व्यापारी जहाजांची सुटका करण्यासाठी आणि हा मार्ग पुन्हा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अमेरिकेने मे 2026 मध्ये ही विशेष मोहीम सुरू केली होती.
2) सुरक्षा कवच (Defensive Overwatch) -
• अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) ओमानच्या सागरी हद्दीतून (हॉरमुझच्या दक्षिण बाजूने) एक 'एन्हान्स सिक्युरिटी एरिया' (Enhanced Security Area) तयार केला आहे.
• याद्वारे निष्पाप व्यापारी जहाजांना इराणचे ड्रोन, वेगवान बोटी आणि समुद्री सुरुंगांपासून (Mines) सुरक्षा दिली जाते.
🔍 'प्रोजेक्ट फ्रीडम' चे मुख्य उद्दिष्टे :
1) मानवतावादी सुटका (Humanitarian Rescue) -
• पर्शियन आखातात (Persian Gulf) गेल्या अनेक आठवड्यांपासून जहाजांवर अडकून पडलेल्या 87 देशांतील सुमारे 23,000 नागरिकांची सुटका करणे हे या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
2) व्यापार पूर्ववत करणे -
• इराणची आर्थिक कोंडी तोडून जागतिक तेल आणि व्यापारी पुरवठा साखळी पुन्हा सुरू करणे.
हॉरमुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व -
• हा जागतिक व्यापारासाठीचा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे.
• जगातील एकूण खनिज तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% तेलाची वाहतूक एकट्या हॉरमुझच्या सामुद्रधुनीतून होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• प्रोजेक्ट फ्रीडम → अमेरिकेने सुरू केलेली मोहीम.
• कारण → हॉरमुझच्या सामुद्रधुनीतील इराणची सागरी कोंडी तोडण्यासाठी
• भौगोलिक क्षेत्र → हॉरमुझची सामुद्रधुनी आणि पर्शियन आखात
• हॉरमुझचे आर्थिक महत्त्व → जागतिक तेल पुरवठ्याचा 20% व्यापारी मार्ग























