
चालू घडामोडी | 'युनेस्को/गिलेर्मो कानो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार'
UNESCO/Guillermo Cano World Press Freedom Prize
📚 Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) युनेस्कोने (UNESCO) 2026 चा प्रसिद्ध 'गिलेर्मो कानो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार' खालीलपैकी कोणत्या देशातील पत्रकार संघटनेला जाहीर केला आहे ?
- युक्रेन
- अफगाणिस्तान
- इराण
- सुदान
उत्तर : सुदान
📰 बातमी काय ?
• युनेस्कोने (UNESCO) वर्ष 2026 चा प्रतिष्ठित 'युनेस्को/गिलेर्मो कानो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार' (UNESCO/Guillermo Cano World Press Freedom Prize) सुदानमधील 'सुदानीज जर्नलिस्ट्स सिंडिकेट' (Sudanese Journalists Syndicate - SJS) या स्वतंत्र पत्रकार संघटनेला जाहीर केला आहे

सुदानमधील संघटनेला पुरस्कार का जाहीर झाला ?
• सुदानमध्ये सुरू असलेल्या भीषण गृहयुद्धाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवल्याबद्दल 'सुदानीज जर्नलिस्ट्स सिंडिकेट' (Sudanese Journalists Syndicate - SJS) या संघटनेला हा बहुमान देण्यात आला आहे.
🔍 सुदानमधील परिस्थिती आणि संघटनेचे कार्य :
1) परिस्थिती -
• 2023 मध्ये सुदानमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून देशातील 90% माध्यमांच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत.
• सुदान हा सध्या पत्रकारांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक बनला आहे.
2) संघटनेची कामगिरी -
• या कठीण परिस्थितीतही सुदानीज जर्नलिस्ट्स सिंडिकेटने 32 पत्रकारांचा मृत्यू आणि 556 पेक्षा जास्त माध्यम कर्मचाऱ्यांवर झालेल्या अत्याचारांचे दस्तऐवजीकरण (Documentation) केले आहे.
• तसेच जनतेला संकट काळात जीवनरक्षक आणि अचूक माहिती पुरवण्याचे काम सुरू ठेवले आहे.
🧐 'गिलेर्मो कानो' पुरस्कार काय आहे ?
1) स्वरूप - हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा जागतिक पुरस्कार असून, कठीण आणि धोकादायक परिस्थितीत वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण व प्रसार करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना तो दिला जातो.
2) संयुक्त राष्ट्रांची मान्यता - वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी दिला जाणारा हा संयुक्त राष्ट्रांची (UN) मान्यता असलेला एकमेव पुरस्कार आहे.
3) स्थापना व वारसा - या पुरस्काराची स्थापना 1997 मध्ये करण्यात आली.
कोलंबियाचे निर्भीड पत्रकार 'गिलेर्मो कानो इसाझा' (Guillermo Cano Isaza) यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे, ज्यांची त्यांच्या 'एल् एस्पेक्टाडोर' वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती.
4) निवड प्रक्रिय - आंतरराष्ट्रीय माध्यम व्यावसायिकांच्या एका स्वतंत्र ज्युरीच्या (Independent Jury) शिफारशीवरून 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचे' (3 मे) औचित्य साधून हा पुरस्कार दिला जातो.
🎯 या पुरस्काराचे महत्त्व (Significance)
1) लोकशाही मूल्यांचे रक्षण - संकट काळात किंवा युद्धाच्या छायेत स्वतंत्र माध्यम आणि निष्पक्ष पत्रकारिता लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी किती आवश्यक आहे, हे या पुरस्कारातून अधोरेखित होते.
2) जागतिक धोक्यांकडे लक्ष - जगभरात पत्रकारांवर होणारे हिंसक हल्ले, सेन्सॉरशिप (Censorship) आणि फेक न्यूज/प्रोपोगंडा (Disinformation) यांसारख्या वाढत्या आव्हानांकडे हा पुरस्कार जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• पुरस्काराचे नाव → युनेस्को/गिलेर्मो कानो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार 2026
• विजेती संस्था → सुदानीज जर्नलिस्ट्स सिंडिकेट
• पुरस्कार देणारी संस्था → युनेस्को (UNESCO).
• पुरस्काराची सुरुवात → 1197 पासून (वार्षिक स्वरूप).
• नामकरण संदर्भ → कोलंबियाचे दिवंगत पत्रकार गिलेर्मो कानो इसाझा यांच्या नावावरून.
























