
चालू घडामोडी | 'तारा' (TARA) प्रणाली काय आहे ?
'तारा' (TARA) प्रणाली काय आहे ?
What is TARA System ?
📚 Subject : GS - संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) DRDO आणि भारतीय हवाई दलाने ओडिसाच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी केलेले 'तारा' (TARA) हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शस्त्र किंवा तंत्रज्ञान आहे ?
- क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली (Anti-Missile System)
- नवीन लढाऊ विमानाचे इंजिन
- स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली (Indigenous Glide Weapon System)
- अत्याधुनिक पाणबुडी (Submarine)
उत्तर : स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली (Indigenous Glide Weapon System)
📰 बातमी काय ?
• संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दल (IAF) यांनी ओडिसाच्या किनारपट्टीवर 'तारा' (TARA) या अत्याधुनिक शस्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी (Maiden Flight-Trial) पूर्ण केली आहे.
• स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

🧐 'तारा' (TARA) प्रणाली काय आहे ?
🧐 What is TARA System ?
1) TARA चे पूर्ण नाव - Tactical Advanced Range Augmentation (टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन).
2) स्वरूप - हे भारताचे पहिले स्वदेशी 'ग्लाइड वेपन सिस्टम' (Glide Weapon System) आहे.
हा एक मॉड्युलर रेंज एक्स्टेंशन किट (Range extension kit) आहे, जो पारंपरिक अनगाईडेड वॉरहेड्स (सर्वसामान्य गुरुत्वीय बॉम्ब - Gravity Bombs) चे रूपांतर अत्यंत अचूक मारा करणाऱ्या 'प्रिसिजन-गाईडेड' (Precision-guided) शस्त्रांमध्ये करते.
3) विकास करणारी संस्था - या प्रणालीचे डिझाईन आणि विकास प्रामुख्याने हैदराबाद येथील 'रिसर्च सेंटर इम्रत' (RCI - Research Centre Imarat) या DRDO च्या प्रयोगशाळेने इतर प्रयोगशाळांच्या सहकार्याने केले आहे.
🚀 ग्लाईड वेपन सिस्टम' (Glide Weapon System) म्हणजे काय ?
• सोप्या शब्दांत सांगायचे तर "पंख असलेला आणि रिमोट कंट्रोलने चालणारा आधुनिक बॉम्ब" होय.
• यामध्ये कोणत्याही रॉकेट इंजिनचा वापर केला जात नाही, तरीही हे शस्त्र शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करते.
🧐 ‘ग्लाईड वेपन सिस्टम’ हे शस्त्र काम कसे करते ?
1) लढाऊ विमानातून सोडणे - सुरुवातीला हवाई दलाचे लढाऊ विमान (Fighter Jet) हा बॉम्ब घेऊन आकाशात खूप उंचावर जाते आणि तिथून तो खाली सोडते (Drop करते)
2) पंखांचा वापर (Gliding) -
विमानातून सुटताच या बॉम्बला जोडलेले छोटे घडीचे पंख (Wings) हवेत उघडतात.
इंजिन नसूनही हा बॉम्ब हवेच्या प्रवाहाचा (Air Pressure) वापर करून पक्षासारखा तरंगत, म्हणजेच 'ग्लाईड' (Glide) होत पुढे सरकतो
3) अचूक दिशा दिग्दर्शन (GPS/Navigation) -
या यंत्रणेवर बसवलेले संगणकीय किट (Navigation System) GPS च्या मदतीने शत्रूच्या तळाचा अचूक माग काढते.
हवेत तरंगत असताना हा बॉम्ब स्वतःहून आपली दिशा बदलून शत्रूच्या बंकरवर किंवा तळावर अचूक जाऊन आदळतो.
🤝 याचे मुख्य फायदे काय आहेत ?
1) विमानाचे रक्षण (Stand-off Range) -
• पारंपरिक बॉम्ब टाकण्यासाठी विमानाला शत्रूच्या अगदी डोक्यावर जावे लागायचे, ज्यामुळे शत्रूची अॅन्टी-एअरक्राफ्ट गन विमानाला पाडू शकत असे.
• परंतु, 'ग्लाईड वेपन' विमानाला शत्रूच्या टप्प्यापासून खूप दूर अंतरावरूनच डागता येते, ज्यामुळे आपले विमान सुरक्षित राहते.
2) कमी खर्च, जास्त फायदा -
• नवीन महागडे क्षेपणास्त्र (Missile) बनवण्याऐवजी, आपल्याकडे आधीपासूनच गोदामात पडून असलेल्या साध्या, स्वस्त जुन्या बॉम्बला हे 'TARA' सारखे ग्लाईड किट जोडले की त्याचे रूपांतर अत्याधुनिक आणि अचूक शस्त्रात होते.
🔍 प्रमुख वैशिष्ट्येआणि महत्त्व :
1) बहु-उद्देशीय वापर (Operational Flexibility) - 'तारा' ही ग्लाइड शस्त्र प्रणाली भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील एकापेक्षा जास्त प्रकारच्या लढाऊ विमानांमधून (Fighter Aircraft) डागली जाऊ शकते, ज्यामुळे लष्कराची लवचिकता वाढणार आहे.
2) किफायतशीर तंत्रज्ञान (Cost-Effectiveness) - उच्च दर्जाची अचूकता राखताना अत्यंत कमी खर्चाच्या अत्याधुनिक प्रणालींचा वापर करणारे हे देशातील पहिलेच ग्लाइड शस्त्र आहे, ज्यामुळे युद्धाच्या काळात आर्थिकदृष्ट्या हे अत्यंत शाश्वत ठरेल.
3) आत्मनिर्भर भारत - या प्रकल्पात खाजगी भारतीय उद्योग आणि 'डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर्स' (DcPP) यांना मोठ्या प्रमाणावर सामील करून घेण्यात आले असून, देशांतर्गत उत्पादनही सुरू झाले आहे.
4) सामरिक महत्त्व (Strategic Significance)
परकीय अवलंबित्व कमी करणे - या यशस्वी चाचणीमुळे भारताचे धोरणात्मक स्वायत्तता (Strategic Autonomy) वाढणार असून, परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या महागड्या 'प्रिसिजन-गाईडेड म्युनिशन्स' (PGMs) वरील भारताचे अवलंबित्व कमालीचे कमी होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• TARA → भारताची पहिली स्वदेशी 'ग्लाइड वेपन सिस्टम' (प्रिसिजन-गाईडेड शस्त्र).
• TARA चे पूर्ण नाव → Tactical Advanced Range Augmentation.
• चाचणीचे ठिकाण → ओडिसाची किनारपट्टी
• प्रमुख कार्य → विना-मार्गदर्शित पारंपरिक बॉम्बना अचूक लक्ष वेधणाऱ्या गाईडेड बॉम्बमध्ये रूपांतरित करणे.
• विकासक संस्था → रिसर्च सेंटर इम्रत (RCI), हैदराबाद (DRDO ची प्रयोगशाळा).





























