
चालू घडामोडी | भारतातील पहिली शोभिवंत माशांची ब्रूड बँक
India’s First Ornamental Fish Brood Bank
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने'अंतर्गत भारतातील पहिली सजावटीच्या माशांची 'ब्रूड बँक' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहे ?
- ठाणे
- रत्नागिरी
- रायगड
- सिंधुदुर्ग
उत्तर : रायगड
📰 बातमी काय ?
• केंद्रीय मत्स्य सचिवांनी नुकतीच रायगड, महाराष्ट्र येथील भारतातील पहिल्या ‘शोभिवंत मत्स्य प्रजनन बँकेला’ (Ornamental Fish Brood Bank) भेट दिली.
• ही सुविधा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत उभारण्यात आली असून, मत्स्यव्यवसायातील रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यात तिची भूमिका तपासण्यात आली.

🧐 'शोभिवंत माशांची ब्रूड बँक ' म्हणजे काय ?
• रंगीबेरंगी आणि घरांमध्ये/मत्स्यालयात शोभेसाठी पाळल्या जाणाऱ्या (Ornamental/Decorative Fish) माशांचे संवर्धन आणि प्रजनन करणारे केंद्र.
• मत्स्यव्यवसायाच्या भाषेत ज्या प्रौढ माशांचा वापर अंडी घालण्यासाठी आणि नवीन पिल्ले जन्माला घालण्यासाठी केला जातो, त्यांना 'ब्रूडस्टॉक' (Broodstock) किंवा 'नर-मादी मासे' म्हणतात
🧐 ही बँक कशी काम करते ?
1) उच्च दर्जाचे संवर्धन - या बँकेमध्ये वेगवेगळ्या दुर्मिळ आणि महागड्या शोभिवंत माशांच्या (उदा. डिस्कस फिश) उच्च प्रतीच्या नर-मादी माशांना अत्यंत सुरक्षित आणि कृत्रिम वातावरणात वाढवले जाते.
2) अंडी आणि पिल्लांची निर्मिती - या माशांपासून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार अंडी मिळवून, त्यातून माशांची लाखो पिल्ले (Fingerness/Seeds) तयार केली जातात.
3) शेतकऱ्यांना पुरवठा - ही तयार झालेली दर्जेदार पिल्ले नंतर अशा इतर लहान मत्स्यपालक शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरवली जातात.
✅ भारतातील पहिली 'ब्रूड बँक' - रायगड :
• येथे सध्या 25 हून अधिक प्रकारच्या सुशोभित माशांच्या प्रजातींचे जतन आणि प्रजनन केली जाते.
• प्रकल्प प्रणेत्या - या केंद्राची स्थापना यशोधरा संजय खंडागळे यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (PMMSY) अंतर्गत केली आहे.
• त्यांच्या 'सॅम डिस्कस' (Sam Discus) या ब्रँडने भारतात 'डिस्कस माशांचे' (Discus Fish) सर्वोच्च उत्पादक म्हणून नाव कमावले आहे.
💰 उत्पादन, महसूल आणि रोजगार :
• उत्पादन क्षमता - या ब्रूड बँकेने आतापर्यंत 20 वेगवेगळ्या प्रजातींचे सुमारे 7.7 लाख सुशोभित मासे तयार केले आहेत.
• आर्थिक उलाढाल - या अभिनव उपक्रमातून आतापर्यंत सुमारे 1.93कोटी रुपयांचा महसूल (Revenue) मिळाला आहे.
• रोजगार आणि कौशल्य विकास - या केंद्रामुळे स्थानिक पातळीवर 25 ते 30 लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असून, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील कौशल्य विकासाला (Skill Development) मोठी चालना मिळत आहे.
🏛️ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) बद्दल माहिती :
• सुरुवात - ही योजना 10 सप्टेंबर 2020 रोजी भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय • मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे सुरू करण्यात आली होती.
• नोडल एजन्सी - 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ' (NFDB - National Fisheries Development Board) हे या योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण, जनजागृती आणि क्षमता निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुख्य नोडल एजन्सी म्हणून काम करते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भारतातील पहिली सुशोभित मासे ब्रूड बँक → रायगड, महाराष्ट्र.
• संबंधित केंद्रीय योजना → प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
• प्रकल्प संस्थापक → यशोधरा संजय खंडागळे ('सॅम डिस्कस' ब्रँड).
• उत्पादन → 7.7 लाख माशांचे उत्पादन
• महसूल → 1.93 कोटी रूपये























