
चालू घडामोडी | राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
National Technology Day
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
📰 बातमी काय ?
• 11 मे 2026 रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून भारताच्या पंतप्रधानांनी 1998 मधील ऐतिहासिक 'पोखरण अणुचाचण्यांचे' स्मरण केले.
• त्यांनी या चाचण्यांना भारताची वैज्ञानिक उत्कृष्टता, धोरणात्मक क्षमता आणि स्वावलंबनाचे प्रतीक म्हटले आहे.

🧐 ऐतिहासिक पार्श्वभूमी: पोखरण-II आणि 'ऑपरेशन शक्ती'
• दरवर्षी 11 मे हा दिवस भारतात 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.
• हा दिवस 11 मे 1998 रोजी झालेल्या 'ऑपरेशन शक्ती' (पोखरण-II) अणुचाचण्यांच्या यशाची आठवण करून देतो.
🤝 नेतृत्व - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कणखर • नेतृत्वाखाली भारताने राजस्थानच्या पोखरण चाचणी श्रेणीत 5 यशस्वी अणुचाचण्या केल्या होत्या.
• या चाचण्यांनंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी भारताला अधिकृतपणे 'अणुवस्त्र सज्ज देश' (Nuclear-Weapon State) घोषित केले.


⛳️ इतर तांत्रिक यश - 11 मे 1998 याच दिवशी भारताने केवळ अणुचाचणीच केली नाही, तर 'त्रिशूल' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या (Surface-to-air) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.
• तसेच 'हंसा-3' (Hansa-3) या पहिल्या स्वदेशी विमानाचे यशस्वी उड्डाण करून संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात इतिहास रचला होता.
🧐 पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• पोखरण-II च्या अभूतपूर्व यशानंतर, 11 मे 1999 रोजी देशात पहिला 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' साजरा करण्यात आला होता.

🤔 तर मंग पोखरण-I अणु चाचणी केव्हा करण्यात आली होती ?
• यापूर्वी भारताने 18 मे 1974 रोजी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पहिली अणुचाचणी केली होती, ज्याला 'ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा' (Operation Smiling Buddha) असे नाव देण्यात आले होते.


🧐 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• “सर्वसमावेशक विकासासाठी जबाबदार नाविन्यता” (Responsible Innovation for Inclusive Growth) ही 2026 साठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना ची संकल्पना (थीम) आहे.
• उद्देश - आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना नैतिक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञान विकासाला चालना देणे हा या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : National Technology Day
• 11 मे → राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
• कारण → ऑपरेशन शक्ती (पोखरण-II अणुचाचणी - 11 मे 1998)
• पोखरण-II चे प्रमुख शिल्पकार → माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.
• पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन → 11 मे 1999
• थीम 2026 → Responsible Innovation for Inclusive Growth.























