
चालू घडामोडी | अंदमान आणि निकोबार बेटांनी वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केले
Andaman & Nicobar Islands Set World Records
📚 Subject : GS - भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भौगोलिक रचनेनुसार '10 डिग्री चॅनल' (Ten Degree Channel) खालीलपैकी कोणत्या दोन भागांना एकमेकांपासून वेगळे करते ?
- भारत आणि श्रीलंका
- अंदमान बेटे आणि निकोबार बेटे
- भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर
- लक्षद्वीप आणि मालदीव
उत्तर : अंदमान बेटे आणि निकोबार बेटे
📰 बातमी काय ?
• अंदमान आणि निकोबार बेटांवरील प्रसिद्ध 'स्वराज द्वीप' येथे दोन जागतिक विक्रम (World Records) रचण्यात आले आहेत.

🧐 दोन मोठे विक्रम कोणते ?
1) सर्वात मोठा ध्वज - राधा नगर बीचजवळ (Radha Nagar Beach) पाण्याखाली 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद (60m x 40m) असलेला 'भारताचा सर्वात मोठा राष्ट्रध्वज' फडकवण्यात आला.
2) मानवी मनोरा - लाईटहाऊस परिसराजवळ स्कुबा डायव्हर्सनी (Scuba Divers) पाण्याखाली 10 मीटर उंच मानवी मनोरा (Tallest Human Stack Underwater) तयार करून दुसरा जागतिक विक्रम रचला.
🎯 उद्देश: अंदमान आणि निकोबार बेटांना जागतिक स्तरावर 'अॅडव्हेंचर टुरिझम' (साहसी पर्यटन) चे मुख्य केंद्र म्हणून प्रस्थापित करणे.

🧐 अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशा बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
1) राजकीय स्वरूप - अंदमान आणि निकोबार हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश असून यामध्ये बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) स्थित एकूण 836 बेटे, उपबेटे आणि खडक समाविष्ट आहेत.
2) राजधानी - पोर्ट ब्लेअर (Port Blair) ही आहे.
3) स्वराज द्वीप -
• रिचीझ आर्किपेलागोचा (Ritchie’s Archipelago) भाग असलेल्या या बेटाचे जुने नाव 'हॅवलॉक बेट' (Havelock Island)होते.
• भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा सन्मान करण्यासाठी 2018 मध्ये 'हॅवलॉक बेटा'चे नाव बदलून 'स्वराज द्वीप' करण्यात आले.
4) 10 डिग्री चॅनल (Ten Degree Channel) -
• 10° उत्तर अक्षांशाजवळ असलेली ही महत्त्वाची सामुद्रधुनी अंदमान द्वीपसमूहाला निकोबार द्वीपसमूहापासून वेगळी करते (आयोगाचा अत्यंत आवडता प्रश्न).
5) ग्रेट निकोबार आणि इंदिरा पॉईंट -
• निकोबार समूहातील 'ग्रेट निकोबार' हे सर्वात मोठे बेट (सुमारे 910 चौ. किमी) असून, या बेटावर असलेले 'इंदिरा पॉईंट' (Indira Point) हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.
6) सामरिक महत्त्व :
• हा प्रदेश जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापारी मार्ग असलेल्या 'मलाक्का सामुद्रधुनी'च्या (Strait of Malacca) अगदी जवळ आहे. तसेच येथे भारताचे एकमेव 'एकत्रित त्रि-सेवा कमांड' (Tri-service Command) म्हणजेच लष्कर, नौदल आणि हवाई दल एकत्रित कार्यरत आहे.
🏹 विशेष असुरक्षित आदिवासी गट (PVTGs) -
• अंदमान आणि निकोबार हे जैवविविधतेसोबतच प्राचीन मानवी संस्कृतीचे केंद्र आहे.
येथे पुढील 5 विशेष असुरक्षित आदिवासी गट (Particularly Vulnerable Tribal Groups) राहतात:
• ग्रेट अंदमानीज (Great Andamanese)
• जरावा (Jarwa)
• ओंगे (Onge)
• शॉम्पेन (Shompen)
• सेंटीनेलीज (Sentinelese)
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : अंदमान आणि निकोबार
• राजधानी → पोर्ट ब्लेअर (Port Blair)
• 10° Channel → अंदमान आणि निकोबार बेटांना एकमेकांपासून वेगळे करते.
• भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक → इंदिरा पॉईंट (ग्रेट निकोबार बेट)
• 5 विशेष असुरक्षित आदिवासी गट (PVTGs) → ग्रेट अंदमानीज, जरावा, ओंगे, शॉम्पेन आणि सेंटीनेलीज.
• सामरिक महत्त्व → भारताचे एकमेव 'त्रि-सेवा कमांड' (Tri-service Command) येथे आहे.





























