
चालू घडामोडी | किम्बरले प्रोसेस (KP) अंतर-सत्रीय बैठक 2026
Kimberley Process Intersessional Meeting 2026
📚 Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक पातळीवर बेकायदेशीर 'रक्त रंजित हिऱ्यांच्या' (Conflict Diamonds) व्यापाराला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'किम्बरले प्रोसेस'चे (Kimberley Process) वर्ष २०२६ चे अध्यक्षपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे ?
- भारत
- दक्षिण आफ्रिका
- बेल्जियम
- संयुक्त अरब अमिराती (UAE)
उत्तर : भारत
📰 बातमी काय ?
• भारताच्या अध्यक्षतेखाली 'किम्बरले प्रोसेस (KP) अंतर-सत्रीय बैठक 2026' (Kimberley Process Intersessional Meeting 2026) मुंबई येथे यशस्वारीत्या पार पडली.
• या 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक हिरे व्यापाराचे नियमन आणि 'रक्त रंजित हिऱ्यांच्या' (Conflict Diamonds) प्रवेशावर बंदी घालण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
• ✍️ अध्यक्ष - भारताचे ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी सुचिंद्र मिश्रा (Suchindra Misra) यांनी वर्ष 2026 साठी 'किम्बरले प्रोसेसचे अध्यक्ष' (KP Chair 2026) म्हणून या बैठकीचे संचालन केले.

✍️ भारताचे अध्यक्षपद - भारताने 1 जानेवारी 2026 रोजी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. भारताने अध्यक्षपद भूषवण्याची ही तिसरी वेळ आहे.
💰 भारताचे आर्थिक महत्त्व - भारत हा हिरे कटिंग आणि पॉलिशिंगच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा केंद्र आहे.
जगातील तब्बल 90% कच्च्या हिऱ्यांचे (Rough Diamonds) प्रोसेसिंग एकट्या भारतात (मुख्यत्वे सुरत आणि मुंबई) होते.

🤝 मुंबई बैठकीचे मुख्य मुद्दे आणि '3Cs' फ्रेमवर्क
3C धोरण (3Cs Framework): भारताच्या अध्यक्षतेखालील 2026 च्या मोहिमेची मध्यवर्ती संकल्पना '3Cs' वर आधारित आहे:
1) Credibility (विश्वासार्हता)
2) Compliance (अनुपालन/नियमांचे पालन)
3) Consumer Confidence (ग्राहक आत्मविश्वास)
✍️ मुंबई बैठकीतील प्रमुख सुधारणा आणि आव्हाने (Key Reforms) :
1) व्याख्येचे आधुनिकीकरण -
• 'कॉन्फ्लिक्ट डायमंड' या संज्ञेची सध्याची व्याख्या केवळ बंडखोरांच्या हिंसेपुरती मर्यादित आहे.
• बदलत्या भू-राजकीय (Geopolitical) परिस्थितीनुसार यात सरकारी छळ किंवा मानवाधिकार उल्लंघनाचाही समावेश करण्यासाठी व्याख्या अपडेट करण्यावर चर्चा झाली.
2) डिजिटल तंत्रज्ञान (Blockchain)-
• हिऱ्यांचा मार्ग ट्रॅक करण्यासाठी आणि बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) आणि डिजिटल पडताळणी साधनांचा वापर वाढवण्यावर भारताने भर दिला.
3) शिल्पकार खाण कामगारांचे कल्याण -
• विकसनशील देशांमधील पारंपारिक आणि छोट्या प्रमाणावर हिरे काढणाऱ्या (Artisanal and alluvial miners) कामगारांचे सामाजिक-आर्थिक कल्याण आणि त्यांचे कायदेशीरकरण करण्यावर चर्चा झाली.
'किम्बरले प्रोसेस' (KPCS) म्हणजे काय ?
• 🤝 ही आंतरराष्ट्रीय सरकारे, हिरे उद्योग (उदा. वर्ल्ड डायमंड काउन्सिल) आणि नागरी संस्था (Civil Society) यांच्यातील एक त्रिराष्ट्रीय सहकार्य व्यवस्था (Tripartite Initiative) आहे.
• 🎯 उद्दिष्ट - विद्रोही किंवा बंडखोर संघटनांनी वैध सरकारांविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने खाणकाम केलेल्या बेकायदेशीर हिऱ्यांच्या म्हणजेच 'कॉन्फ्लिक्ट डायमंड्स' (किंवा ब्लड डायमंड्स) च्या व्यापाराला जागतिक पुरवठा साखळीतून पूर्णपणे हद्दपार करणे.
• 🏛️ स्थापना - वर्ष 2000 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ठराव 55/56 नुसार या प्रक्रियेची पायाभरणी करण्यात आली होती.
• 👨💼 सदस्य संख्या - सध्या किम्बरले प्रोसेसमध्ये 60 सहभागी (Participants) सदस्य आहेत, जे जगातील 86 देशांचे प्रतिनिधित्व करतात.(यात युरोपियन युनियन आणि त्याचे सर्व सदस्य देश मिळून एकच गट/ब्लॉक म्हणून सहभागी होतात)
हे सदस्य जागतिक पातळीवरील 99.8% कच्च्या हिऱ्यांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Kimberley Process Intersessional Meeting 2026
• किम्बरले प्रोसेस अंतर-सत्रीय बैठक 2026 → मुंबई
• 2026 चे अध्यक्षपद → भारत (तिसऱ्यांदा)
• भारताची मुख्य थीम (3Cs) → Credibility, Compliance, Consumer Confidence.
• KPCS चे मुख्य उद्दिष्ट → 'कॉन्फ्लिक्ट डायमंड्स' (रक्त रंजित हिरे) च्या बेकायदेशीर व्यापारावर बंदी आणणे.
• सदस्य संख्या → 60 सदस्य (86 देशांचे प्रतिनिधित्व).



























