
चालू घडामोडी | सोने आणि चांदीवरील आयात करात वाढ
Hike in Import Tax on Gold and Silver
📚 Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने मे 202 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सोने आणि चांदीवरील एकूण प्रभावी आयात शुल्क (Effective Import Duty) सुमारे 9.2% वरून वाढवून किती टक्के केले आहे ?
- 12.5%
- 15%
- 18.4%
- 22.5%
उत्तर : 18.4%
📰 बातमी काय ?
• भारत सरकारने परकीय चलन साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पश्चिम आशियातील (West Asia) वाढत्या भू-राजकीय संकटामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क (Effective Import Duty) 9.2% वरून थेट 18.4% म्हणजेच दुप्पट केले आहे.
• पार्श्वभूमी - हा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर 13 मे रोजी अधिकृत अधिसूचनेद्वारे हे नवीन दर त्वरित लागू करण्यात आले.

🧐 आयात शुल्क रचनेतील बदल (Revised Tax Structure) :
सोन्या-चांदीवरील एकूण करांचा बोजा (Effective Tax Burden) खालील बदलांमुळे वाढला आहे :
1) मूळ सीमाशुल्क (Basic Customs Duty) - सरकारने सोन्या आणि चांदीवरील मूळ सीमाशुल्क 5% वरून वाढवून 10% केले आहे.
2) कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) - हा उपकर (Cess) 1% वरून वाढवून 5% करण्यात आला आहे.
3) (IGST) - मूल्यमापन केलेल्या मूल्यावर (Assessable Value) लागणारा 'एकात्मिक वस्तू आणि सेवा कर' (IGST) पूर्वीप्रमाणेच 3% वर कायम ठेवण्यात आला आहे.
🤔 एकूण परिणाम - सीमाशुल्क, उपकर (Cess), विमा, वाहतूक खर्च आणि आयजीएसटी या सर्वांचा एकत्रित विचार करता एकूण कर बोजा 18.4% झाला आहे.
🧐 आयात शुल्क वाढवण्यामागची कारणे (Economic Reasons) :
• भारत सरकारने देशाच्या मॅक्रोइकॉनॉमिक (स्थूल अर्थशास्त्र) संतुलनाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे:
1) चालू खात्यातील तूट (CAD - Current Account Deficit) -
• सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन (डॉलर) देशाबाहेर जाते.
• सोन्याची आयात कमी झाल्याने देशाची व्यापारी तूट नियंत्रणात राहील आणि पर्यायाने 'चालू खात्यातील तूट' मर्यादित ठेवण्यास थेट मदत होईल.
2) परकीय चलन साठ्याचे जतन (Forex Conservation):
• भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात भारतीय रुपयाची स्थिरता राखणे आणि परकीय चलनाचे (Forex Reserves) जतन करणे हे मुख्य ध्येय आहे.
3) पश्चिम आशिया संकट (West Asia Crisis) -
• या प्रादेशिक संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि सागरी वाहतूक मार्ग धोक्यात आले आहेत.
भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
4) आयातीचे प्राधान्यक्रम (Import Prioritisation) -
✍️ सोन्यासारख्या चैनीच्या वस्तूऐवजी देशाच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील धोरणात्मक व जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी परकीय चलन राखून ठेवणे हे सरकारचे ध्येय आहे -
• खनिज तेल (Crude Oil) आणि खते (Fertilisers)
• औद्योगिक कच्चा माल आणि भांडवली वस्तू (Capital Goods)
• संरक्षण क्षेत्राची गरज (Defence Requirements) आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान
🚨 संभाव्य परिणाम आणि तोटे (Challenges) :
• तस्करीचा धोका (Smuggling) - अतिशय उच्च आयात शुल्कामुळे देशात सोन्याची तस्करी (Smuggling) वाढण्याची भीती असते.
• बाजारपेठेवर परिणाम - यामुळे देशांतर्गत सराफा बाजार विस्कळीत होऊ शकतो आणि सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीला फटका बसू शकतो
🤝 दीर्घकालीन उपाय -
• तज्ज्ञांच्या मते, केवळ शुल्क वाढवण्याऐवजी डिजिटल सोने (Digital Gold) किंवा सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) सारख्या वित्तीय पर्यायांना प्रोत्साहन देणे दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• नवा प्रभावी कर दर → 18.4%
• अंमलबजावणी तारीख → 13 मे
• मुख्य उद्दिष्ट → चालू खात्यातील तूट (CAD) कमी करणे आणि परकीय चलन (Forex) वाचवणे.
• परकीय चलन कशासाठी ? → कच्चं तेल, खते, संरक्षण साहित्य आणि औद्योगिक कच्चा माल.

















