
चालू घडामोडी | देशातील पहिले 'लो-एमिशन झोन'
India’s First Low Emission Zone
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) शहरी भागातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि 'BS-3' पेक्षा जुन्या वाहनांवर निर्बंध आणण्यासाठी भारतातील पहिले 'लो एमिशन झोन' (Low Emission Zone) खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन केले जात आहे ?
- नवी दिल्ली
- मुंबई
- पुणे
- चेन्नई
उत्तर : पुणे
📰 बातमी काय ?
• वाढत्या वाहन प्रदूषणामुळे ढासळणारी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुणे हे देशातील पहिले 'लो एमिशन झोन' (Low Emission Zone - LEZ) अधिकृतपणे लागू करणारे भारतातील पहिले शहर बनणार आहे.
🧐 'लो एमिशन झोन' (LEZ) म्हणजे काय ?
• कमी उत्सर्जन झोन (लो एमिशन झोन) हा शहराचा असा एक ठराविक किंवा संवेदनशील भाग असतो, जेथे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी जास्त प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांच्या प्रवेशावर कडक निर्बंध लादले जातात किंवा त्यांच्यावर दंड (पर्यावरण शुल्क) आकारले जाते.
⛳️ देशातील पहिले 'लो एमिशन झोन' कुठे लागू होणार ?
• हा पथदर्शी (Pilot) प्रकल्प पुण्याच्या मध्यवर्ती भागातील (Central Business District) "शिवाजीनगर" या परिसरात लागू केला जाईल.
• क्षेत्र व्याप्ती - हा लो-एमीशन झोन शिवाजीनगरच्या आसपासच्या पुणे शहराच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 7 ते 10% भाग व्यापणार आहे.
🔍 वाहनांवरील निर्बंध आणि अंमलबजावणी संस्था (Restrictions & Agencies) :
वाहनांचे निकष - जुनी आणि जास्त प्रदूषण करणारी वाहने, विशेषतः 'भारत स्टेज-III' (Bharat Stage-III / BS-3) आणि त्यापेक्षा जुन्या मानकांच्या वाहनांना या क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी असेल किंवा त्यांच्याकडून पर्यावरण शुल्क (Environmental Fee) वसूल केले जाईल.
✍️🤝 अंमलबजावणी करणाऱ्या संस्था - हा उपक्रम पुणे महानगरपालिका (PMC) आणि 'आयटीडीपी इंडिया' (ITDP India) यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 3 वर्षांच्या नियोजनातून विकसित करण्यात आला आहे.
🏛️ धोरणात्मक आधार - या उपक्रमाला 'महाराष्ट्राचे 2021 चे इलेक्ट्रिक वाहन धोरण' (Maharashtra's 2021 EV Policy) अंतर्गत पाठबळ मिळाले आहे.
🎯 मुख्य उद्दिष्ट -
• हवेतील अतिसूक्ष्म घातक कण म्हणजेच PM2.5 आणि नायट्रोजन ऑक्साइड्स (NOx) चे प्रमाण कमी करणे,
नागरिकांचे आरोग्य सुधारणे
• ई-वाहने व सार्वजनिक वाहतुकीला (Cleaner Transport) प्रोत्साहन देणे - हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भारतातील पहिले लो एमिशन झोन (LEZ) → पुणे (महाराष्ट्र).
• पुण्यातील अचूक ठिकाण → शिवाजीनगर परिसर (एकूण शहराचा सुमारे 7 ते 10% भाग).
• प्रतिबंधित वाहनांचा वर्ग → भारत स्टेज-III (BS-3) आणि त्याहून जुनी वाहने.
• सहयोगी संस्था → पुणे महानगरपालिका (PMC) आणि ITDP India.
• संबंधित शासकीय धोरण → महाराष्ट्राचे 2021 चे इलेक्ट्रिक वाहन धोरण.
• नियंत्रित केले जाणारे मुख्य प्रदूषक → PM2.5 आणि नायट्रोजन ऑक्साइड्स (NOx).






















