
चालू घडामोडी | सिक्कीम राज्य स्थापना दिन

Statehood Day of Sikkim
📚 Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 16 मे 1975 रोजी सिक्कीम हे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय संघराज्याचे 22 वे अधिकृत राज्य बनले ?
- 24 वी घटनादुरुस्ती
- 31 वी घटनादुरुस्ती
- 36 वी घटनादुरुस्ती
- 42 वी घटनादुरुस्ती
उत्तर : 36 वी घटनादुरुस्ती
📰 बातमी काय ?
• भारताच्या उपराष्ट्रपतींनी 16 मे 2026 रोजी गँगटोक (Gangtok) येथे आयोजित सिक्कीमच्या 51व्या राज्य वर्धापनदिन (51st Statehood Day) सोहळ्याला संबोधित केले.
• 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारतीय संघराज्याचा भाग बनले होते, ज्याला 2026 मध्ये 51 वर्षे पूर्ण झाली आहेत.

🔍 सिक्कीमची ऐतिहासिक पार्श्वभूमी :
1) चोग्याल राजेशाही (Chogyal Monarchy) -
• भारतात विलीन होण्यापूर्वी, सिक्कीम हा एक सार्वभौम हिमालयातील देश होता, जिथे 1642 पासून ते 1975 पर्यंत वंशपरंपरेने 'नामग्याल घराण्याचे' (चोग्याल) राज्य होते.
2) रक्षित राज्य काळ (Protectorate Era: 1947–1974) -
• भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 'भारत-सिक्कीम करार, 1950' नुसार सिक्कीमला भारताचे 'रक्षित राज्य' (Protectorate) घोषित करण्यात आले.
• या अंतर्गत सिक्कीमची अंतर्गत स्वायत्तता कायम राहिली, परंतु त्याचे संरक्षण (Defense), परराष्ट्र व्यवहार (External Affairs) आणि दळणवळण (Communications) ही जबाबदारी भारत सरकारकडे सोपवण्यात आली.
⛳️ संकल्पना - 'सार्वमत' (Referendum) म्हणजे काय ?
• "एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय किंवा राजकीय मुद्द्यावर थेट जनतेचे मत मागवणे" होय.
• यात लोकप्रतिनिधी किंवा सरकार निर्णय घेत नाही, तर देशातील सर्वसामान्य नागरिक थेट 'हो' (Yes) किंवा 'नाही' (No) या स्वरूपात मतदान करून आपला अंतिम निर्णय ठरवतात.
🧐 सिक्कीमच्या भारतातील विलीनीकरणाचा घटनात्मक इतिहास (Constitutional Evolution)
1) 35 वी घटनादुरुस्ती कायदा, 1974 - या दुरुस्तीद्वारे सिक्कीमला भारताचे 'सहयोगी राज्य' (Associate State) म्हणून एक विशेष व तात्पुरता दर्जा देण्यात आला होता.
2) सार्वमत (April 1975 Referendum) - एप्रिल 1975 मध्ये सिक्कीममध्ये एक ऐतिहासिक सार्वमत घेण्यात आले, ज्यामध्ये 97% पेक्षा जास्त मतदारांनी राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आणून भारतात सामील होण्याच्या बाजूने प्रचंड मतदान केले.
3) 36 वी घटनादुरुस्ती कायदा, 1975 - सार्वमतानंतर संसदेने हा कायदा संमत केला.
या ऐतिहासिक पावलामुळे 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22 वे राज्य (22nd State) म्हणून पूर्णपणे समाविष्ट झाले आणि सहयोगी राज्याचा दर्जा रद्द झाला.
4) कलम 371F (Article 371F - विशेष तरतुदी) -
भारतीय संविधानातील कलम 371F अन्वये सिक्कीमला विशेष दर्जा देण्यात आला आहे.
हा अनुच्छेद सिक्कीमच्या जुन्या स्थानिक कायद्यांचे रक्षण करतो, मूळ रहिवाशांशिवाय इतरांना जमीन खरेदीवर निर्बंध घालून स्थानिक लोकसंख्याशास्त्राचे संरक्षण करतो आणि राज्यातील शांतता राखण्यासाठी राज्यपालांना (Governor) विशेष अधिकार देतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• सिक्कीम राज्य वर्धापनदिन → 16 मे (16 मे 1975 रोजी स्थापना)
• भारताचे कितवे राज्य ? → 22 वे राज्य
• 35वी घटनादुरुस्ती (1974) → सिक्कीमला 'सहयोगी राज्य' (Associate State) चा दर्जा दिला.
• 36वी घटनादुरुस्ती (1975) → सिक्कीमचा भारतात पूर्ण विलय (22 वे पूर्ण राज्य बनले).
• पूर्वीचे राजघराणे → नामग्याल घराणे (चोग्याल राजेशाही - 1642 ते 1975).

















