
चालू घडामोडी | व्हिटली पुरस्कार जिंकणाऱ्या 2 भारतीय महिला कोण ?
Whitley Award
📚 Subject : GS - पर्यावरण, पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) डॉ. बर्खा सुब्बा यांना पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा 'व्हिटली पुरस्कार 2026' हा खालीलपैकी कोणत्या दुर्मिळ प्राण्याच्या संरक्षणासाठी देण्यात आला ?
1. ग्रेटर अॅडजुटंट स्टॉर्क
2. हिमालयीन सॅलामँडर
3. इंडियन स्किमर पक्षी
4. रेड पांडा
उत्तर : हिमालयीन सॅलामँडर
📰 बातमी काय ?
• वैश्विक गौरव (2026): पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा 'व्हिटली पुरस्कार 2026' (Whitley Awards) नुकताच जाहीर झाला आहे.
• भारतीय महिलांची कामगिरी: या वर्षी जगभरातून निवडण्यात आलेल्या 6 प्रमुख विजेत्यांमध्ये भारतातील दोन महिला संवर्धनशास्त्रज्ञांचा (Conservationists) समावेश आहे.
• परवीन शेख आणि डॉ. बर्खा सुब्बा अशी या दोन विजेत्यांची नावे असून, लंडन येथे युनायटेड किंगडमच्या (UK) राजकुमारी प्रिन्सेस अॅन (Princess Anne) यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🧐 व्हिटली पुरस्कार (Whitley Award)
• 🌳 'ग्रीन ऑस्कर' - हा पुरस्कार पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो. याला जागतिक स्तरावर 'ग्रीन ऑस्कर' (Green Oscars) म्हणून ओळखले जाते.
🏛️ स्थापना व संस्था - या पुरस्काराची स्थापना यूके (UK) मधील 'व्हिटली फंड फॉर नेचर' (Whitley Fund for Nature - WFN) या धर्मादाय संस्थेद्वारे करण्यात आली आहे.
• 🎯 उद्देश - आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसारख्या विकसनशील देशांमधील तळागाळातील (Grassroots) पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धकांनो आर्थिक बळ देणे.
• 🏆 पुरस्काराचे स्वरूप - या पुरस्कारांतर्गत विजेत्यांना त्यांच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी 1 वर्षासाठी 50,000 पाउंड्स (£50,000) चा निधी, विशेष प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय ओळख दिली जाते.
🏆 'व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2026' कोणाला देण्यात आला ?
• या वर्षीचा मुख्य 'व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2026' हा इंडोनेशियाच्या फारविझा फरहान (Farwiza Farhan) यांना देण्यात आला आहे.

🇮🇳 भारतीय विजेते आणि त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
1) परवीन शेख (Parveen Shaikh) -
• प्रकल्प विषय - 'स्किमर गार्डियन्स: प्रोटेक्टिंग रिव्हरिन बर्ड्स अँड देअर हॅबिटॅट' (Skimmer guardians: protecting riverine birds and their habitats).
• योगदान - परवीन शेख या अत्यंत दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेल्या 'इंडियन स्किमर' (Indian Skimmer) या नदीकाठच्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. जगभरातील एकूण 'इंडियन स्किमर' पैकी 90% पेक्षा जास्त लोकसंख्या केवळ भारतात आढळते.
• कामगिरी - त्यांनी चंबळ नदी खोऱ्यात स्थानिक लोकांना एकत्र करून 'गार्डियन्स ऑफ द स्किमर' ही मोहीम सुरू केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे चंबळमधील या पक्ष्यांची संख्या 2017 मधील 400 वरून 2025 पर्यंत जवळपास 1,000 झाली आहे.

2) डॉ. बर्खा सुब्बा (Dr. Barkha Subba)
• प्रकल्प विषय - 'सर्व्हायव्हर ऑफ अ लॉस्ट वर्ल्ड: सेविंग द हिमालयन सॅलामँडर अँड इट्स वेटलँड्स' (Survivor of a lost world: saving the Himalayan salamander and its wetlands).
• योगदान - डॉ. बर्खा सुब्बा या फेडरेशन ऑफ सोसायटीज फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन (FSEP) या संस्थेच्या माध्यमातून दार्जिलिंग टेकड्यांमध्ये (पश्चिम बंगाल) अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा 'हिमालयीन सॅलामँडर' (Himalayan Salamander) या उभयचर (Amphibian) प्राण्याच्या आणि त्याच्या पाणथळ जागांच्या (Wetlands) संरक्षणासाठी काम करत आहेत.
• कामगिरी - दार्जिलिंग परिसरातील पाणथळ जागांचे होणारे प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी त्यांनी स्थानिक चहाच्या बागांचे व्यवस्थापक आणि नागरिकांना एकत्र करून संवर्धनाचे मॉडेल उभे केले.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : व्हिटली पुरस्कार
• पुरस्काराचे टोपणनाव → 'ग्रीन ऑस्कर' (Green Oscars)
• पुरस्कार देणारी संस्था → व्हिटली फंड फॉर नेचर (WFN), युनायटेड किंगडम.
• पुरस्कार निधी रक्कम → 50,000 पाउंड्स (£50,000).
• भारतीय विजेते 2026 → परवीन शेख आणि डॉ. बर्खा सुब्बा.
• परवीन शेख यांचे कार्यक्षेत्र → इंडियन स्किमर पक्षी संवर्धन
• डॉ. बर्खा सुब्बा यांचे कार्यक्षेत्र → हिमालयीन सॅलामँडर आणि पाणथळ जागा संवर्धन
• 2026 चा व्हिटली गोल्ड अवॉर्ड विजेता → फारविझा फरहान (इंडोनेशिया)

















