
चालू घडामोडी | लष्करी सराव ‘सिनबॅक्स- II 2026’
EXERCISE CINBAX-II 2026
📚 Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मे 2026 मध्ये पार पडलेला 'CINBAX 2026' हा द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान आयोजित केला जातो ?
- चीन
- कॅनडा
- कंबोडिया
- कझाकस्तान
उत्तर : कंबोडिया
📰 बातमी काय ?
• भारत आणि कंबोडिया या दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान 'CINBAX' (Cambodia-India Bilateral Army Exercise) हा द्विपक्षीय लष्करी सराव पार पडला.

✍️ सीनबॅक्स (CINBAX) सरावा बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• स्वरूप - हा भारत आणि कंबोडिया यांच्यातील भूदलाचा (Army) द्विपक्षीय सराव आहे.
• उद्देश - या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये दहशतवादविरोधी कारवाया, संयुक्त राष्ट्र शांतता अभियान (UN Peacekeeping) आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील परस्पर सहकार्य व तांत्रिक कौशल्ये वाढवणे हा आहे.
🧐 'CINBAX' सरावाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले ?
• मे 2026 मध्ये हा सराव कंबोडिया या देशात आयोजित करण्यात आला होता.
• कंबोडियातील 'तेचो सेन नॉम थॉम मियास' (Techo Sen Phnom Thom Mreas) या प्रगत लष्करी प्रशिक्षण केंद्रात हा सराव पार पडला.
🇮🇳 भारतीय सैन्य तुकडी :
• मे 2026 मध्ये कंबोडियात झालेल्या 2 या आवृत्तीत भारताकडून 120 सैनिकांची तुकडी सहभागी झाली होती.
• मराठा लाईट इन्फंट्री (MLI)- या 120 सैनिकांच्या भारतीय तुकडीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राशी घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध असलेल्या 'मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट'च्या सैनिकांचा समावेश होता.
✍️ पहिली आवृत्ती (Inaugural Edition):
• 'CINBAX' या सरावाची सर्वात पहिली आवृत्ती डिसेंबर 2024 मध्ये पुणे (महाराष्ट्र) येथील औंध मिलिटरी स्टेशनवर पार पडली होती.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स - Exercise CINBAX
• CINBAX पूर्ण नाव → Cambodia-India Bilateral Army Exercise
• सहभागी देश → भारत आणि कंबोडिया
• 2री आवृत्ती (मे 2026) → 'तेचो सेन नॉम थॉम मियास' प्रशिक्षण केंद्र, कंबोडिया
• प्रमुख सहभागी रेजिमेंट → मराठा लाईट इन्फंट्री






















