
चालू घडामोडी | मुंबई वॉटर मेट्रो
Mumbai Water Metro
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, महाराष्ट्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) मुंबई महानगर प्रदेशात 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्प राबवण्यासाठी आणि जहाजबांधणी कारखाना उभारण्यासाठी कोणत्या देशाच्या 'हायके एएस' (Hyke AS) या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे ?
- फिनलंड
- जर्मनी
- नॉर्वे
- जपान
उत्तर : नॉर्वे
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्र सागरी मंडळाने 'मुंबई वॉटर मेट्रो' (Mumbai Water Metro) प्रकल्पासाठी नॉर्वे (Norway) देशासोबत महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) केला आहे.

'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्पा बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• 🏛️ सहभागी संस्था - महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) आणि नॉर्वे येथील 'हायके एएस' (Hyke AS)ही मरीन टेक्नॉलॉजी कंपनी.
• 🎯 उद्देश - मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि रस्त्यांवरील भार कमी करण्यासाठी अत्याधुनिक, हायब्रीड/इलेक्ट्रिक बोटी (Vessels) उपलब्ध करणे.
'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये :
1) प्रेरणा (Model) - हा प्रकल्प केरळमधील यशस्वी 'कोची वॉटर मेट्रो' (Kochi Water Metro) च्या धर्तीवर विकसित केला जात आहे.
2) व्याप्ती - मुंबई महानगर प्रदेशात (MMR) एकूण 31 जलमार्ग (Routes) आणि 45 प्रवासी टर्मिनल्स विकसित करण्याचे नियोजन आहे.
3) तंत्रज्ञान - नॉर्वेच्या 'हायके एएस' कंपनीकडून हाय-टेक, बॅटरीवर चालणाऱ्या आणि शून्य-उत्सर्जन (Zero Emission) करणाऱ्या बोटींचे तंत्रज्ञान मिळेल.
4) प्रकल्प अहवाल - या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल 'कोची मेट्रो रेल लिमिटेड' (KMRL) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे.
5) 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत जहाजबांधणी - या करारानुसार नॉर्वेची कंपनी महाराष्ट्रातच 2,500 कोटी रुपये गुंतवून जलवाहतुकीच्या बोटी तयार करण्यासाठी जहाजबांधणी कारखाना (Shipyard) सुरू करणार आहे.
✍️ 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्पाच फायदा -
• यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वॉटर मेट्रो प्रकल्पाला बोटींचा पुरवठा करणे सोपे होईल, वाहतूक खर्च वाचेल आणि स्थानिक भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.
• आत्मनिर्भरता - हा प्रकल्प 'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन महाराष्ट्र' संकल्पनेला मोठी गती देईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• प्रकल्पाचे नाव → मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प.
• करार करणारे → महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे ची 'Hyke AS मरीन टेक्नॉलॉजी कंपनी
• प्रेरणा → केरळमधील 'कोची वॉटर मेट्रो'च्या धर्तीवर आधारित
• विस्तृत प्रकल्प अहवाल मार्गदर्शक → कोची मेट्रो रेल लिमिटेड (KMRL)
• 'मेक इन महाराष्ट्र' अंतर्गत जहाजबांधणी → 2,500 कोटी रुपये गुंतवणूक




















