
चालू घडामोडी | जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026: भारत 157 व्या स्थानावर | MPSC Current Affairs
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण
World Press Freedom Index 2026
📚 Subject : GS -जागतिक रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सर्वात वेगाने घसरलेलादाऊट बॉर्डर्स' या संस्थेद्वारे जाहीर झालेल्या 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026' मध्ये भारत 180 देशांमध्ये कितव्या स्थानावर आहे ?
- 105
- 122
- 136
- 157
उत्तर : 157
📰 बातमी काय ?
• 2026 च्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 180 देशांमध्ये 157 व्या स्थानावर घसरला आहे.
🧐 जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक कोण जाहीर करते ?
• जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक (World Press Freedom Index) 'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' (Reporters Without Borders - RSF) ही पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय ना-नफा आणि गैर-सरकारी (NGO) संस्था दरवर्षी जाहीर करते.
• फ्रेंच नाव (RSF): या संस्थेचे मूळ फ्रेंच भाषेतील अधिकृत नाव 'रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटियर्स' (Reporters Sans Frontières) असे आहे.
🚨मूल्यमापनाचे 5 मुख्य संकेतक (Five Key Indicators):
हा निर्देशांक देशांमधील खालील प्रमुख घटकांचा अभ्यास करून ठरवला जातो -
• राजकीय परिस्थिती (Political Condition)
• कायदेशीर चौकट (Legal Framework)
• आर्थिक संदर्भ (Economic Context)
• सामाजिक-सांस्कृतिक घटक (Socio-Cultural Factors)
• सुरक्षा व्यवस्था (Security Conditions)
🇮🇳 जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची कामगिरी (India's Rank):
• या निर्देशांकात भारत 180 देशांमध्ये 157 व्या स्थानावर घसरला आहे.
• वर्ष 2025 मध्ये भारत 151 व्या स्थानावर होता, म्हणजेच भारताच्या क्रमवारीत 6 स्थानांची घसरण झाली आहे.
📢 जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात भारतातील घसरणीची कारणे :
'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' (RSF) च्या अहवालानुसार -
• पत्रकारांविरुद्ध वाढती हिंसाचार,
• प्रसारमाध्यमांची मालकी मोजक्याच लोकांच्या हातात असणे (Highly Concentrated Media Ownership)
• राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांचा वाढता वापर यामुळे पत्रकारांवरील दबाव वाढला असून भारताचा समावेश "अतिशय गंभीर" (Very Serious) श्रेणीत करण्यात आला आहे.
🧐 निर्देशांकातील प्रमुख जागतिक कल (Global Trends) :
• 2026 च्या या निर्देशांकात एकूण 180 देशांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
• जागतिक संकट - जगातील 52.2 % देशांमध्ये पत्रकारितेची परिस्थिती "कठीण" (Difficult) किंवा "अतिशय गंभीर" (Very Serious) श्रेणीत पोहोचली आहे, जे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा ढासळता स्तर दर्शवते.
• कायदेशीर घटकात घसरण - पत्रकारितेचे वाढते गुन्हेगारीकरण आणि कायद्यांचा गैरवापर यामुळे 'कायदेशीर संकेतकांमध्ये' (Legal Indicator) जगभरात सर्वाधिक घसरण झाली आहे.
• सर्वात धोकादायक प्रदेश - पूर्व युरोप (Eastern Europe) आणि पश्चिम आशिया (West Asia) हे प्रदेश पत्रकारांसाठी जगातील सर्वात धोकादायक भाग म्हणून नोंदवले गेले आहेत
🟢 🗞️ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकातील पहिले 5 देश :
• नॉर्वे 🇳🇴 (सलग 10 व्या वर्षी प्रथम स्थानावर)
• नेदरलँड्स 🇳🇱
• एस्टोनिया 🇪🇪
• डेन्मार्क 🇩🇰
• स्वीडन 🇸🇪
🔴 🗞️ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकातील शेवटचे 5 देश :
• इरिट्रिया 🇪🇷(180 वे स्थान)
• उत्तर कोरिया 🇰🇵
• चीन 🇨🇳
• इराण 🇮🇷
• सौदी अरेबिया 🇸🇦
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक (2026)
• अहवाल जारी करणारी संस्था → रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF), पॅरिस.
• एकूण समाविष्ट देश → 180 देश.
• भारताचे स्थान 2026 → 157 वे स्थान (अतिशय गंभीर श्रेणी)
• प्रथम क्रमांकाचा देश → नॉर्वे (सलग 10 वे वर्ष).
• अंतिम क्रमांकाचा देश (180 वा) → इरिट्रिया (Eritrea)
• सर्वात वेगाने घसरलेला इंडिकेटर → लीगल इंडिकेटर (Legal Indicator).






















